ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
सुपरस्टार असूनही सलमान खानचे 10 चित्रपट झाले होते सुपर डुपर फ्लॉप

सुपरस्टार असूनही सलमान खानचे 10 चित्रपट झाले होते सुपर डुपर फ्लॉप

आता तुम्ही ज्या सेलिब्रिटींना सुपरस्टार म्हणून ओळखत असाल तरी त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी अनेक गोष्टींचा सामना केलेला असतो. बरं त्यांच्यासोबत हे सगळे प्रसिद्धी मिळेपर्यंतच होत नाही. तर सुपरस्टार असा टॅग लागल्यानंतरही त्यांना अनेकदा अपयशाला सामोरे जावे लागते. आता दबंग खान सलमान खानचंच उदाहरण घ्या ना, त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले असतील पण त्याच्या फिल्मी करीअरमध्ये त्याने सुपर डुपर फ्लॉप चित्रपटही दिले आहेत. 

कधी काळी या 5 चित्रपटांना दिला होता ऋतिक रोशनने नकार

सुरुवातीच्या काळातील या चित्रपटाने मिळून दिली ओळख

सलमान आता कितीही दबंग आणि भाईजान वाटत असला तरी त्याच्या सुरुवातीच्या काळात तो चॉकलेट हिरो म्हणून फारच प्रसिद्ध होता. रोमान्स, कौटुंबिक अशा चित्रपटांमध्ये त्याने काम केलेली होती. त्यामुळेच तो अल्पावधीत फारच प्रसिद्ध झाला. 1991साली आलेल्या ‘लव’ या चित्रपटाने त्याला चांगलीच ओळख मिळून दिली. त्यानंतर त्याला एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटाच्या ऑफर्स येऊ लागल्या. 1994 साली आलेल्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाने त्याला यशाच्या सर्वोच्च शिखरावर जाऊन पोहोचवले. पण1991 ते 1994 या कालावधीतही सलमानला चित्रपट मिळाले होते. पण त्या काळात केलेल्या सगळ्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर निराशा केली होती. त्याचे सगळे चित्रपट फ्लॉप झाले होते.

पानिपत’मधील या मराठमोळ्या अभिनेत्रीने कोरोना काळात केले लग्न, फोटो व्हायरल

ADVERTISEMENT

हे चित्रपट झाले होते सुपर डुपर फ्लॉप

अंदाज अपना अपना मधील सलमान खान

Instagram

सूर्यवंशी: 1992 साली रिलीज झालेला सलमान खानचा हा चित्रपट आता अनेकांना माहीतसुद्धा नसेल. सस्पेन्स, फॅन्सी आणि थ्रीलर अशी कथा असलेला हा चित्रपट आला कधी गेला कधी कळलेच नाही.  राकेश कुमार दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेत्री शिबा, अमृता सिंह, कादर खान, सईद जाफरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 

जागृति: भाईजानचा हा चित्रपटही 1992 साली जुलै महिन्यात रिलीज झाला. सस्पेन्स आणि थ्रीलर,ड्रामा अशा पटात मोडणारा हा चित्रपट होता. या चित्रपटात सलमान खानसोबत करिश्मा कपूर दिसली होती. मल्टी स्टारर असा हा चित्रपट होता. या चित्रपटात अशोक सराफ, प्रेम चोप्रा, पंकज धीर यांच्या महत्वपूर्ण भूमिका होत्या. पण हा चित्रपटही फार चालला नाही. 

ADVERTISEMENT

निश्चय: मल्टी स्टारर फॅमिली ड्रामा असा हा चित्रपट 1992 साली रिलीज झाला. या चित्रपटातही करिश्मा कपूर सलमानची हिरोईन होती. तर विनोद खन्ना यांनी सलमानच्या भावाची भूमिका साकारली होती. इमोशनल असा चित्रपट त्यावेळी फार चालला नाही. 

एक लडका एक लडकी: अभिनेत्री नीलम कोठारीसोबत केलेला सलमान खानचा हा चित्रपटही फार काही चालला नव्हता.  हा चित्रपटही फॅमिला ड्रामा प्रकारातील होता. एक टिपिकल श्रीमंत मुलीचे कुटुंब आणि फसवणूक करणारी मंडळी आणि त्यांना धडा मिळवण्यासाठी झटणारी नायिका आणि नायक अशी कहाणी असलेला हा चित्रपट 1992 मध्येच रिलीज झाला. पण या चित्रपटानेही फारशी कमाई केली नाही. 

दिल तेरा आशिक:  1993 साली रिलीज झालेला ‘दिल तेरा आशिक’ हा चित्रपटही फारसा चालला नाही. सलमान खान या चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत दिसला होता. हा चित्रपटही फॅमिली ड्रामा  प्रकारातील होता. पण चित्रपटाने फारशी कमाई केली नाही. 

चंद्रमुखी:  बॉलीवूडची चांदनी म्हणजेच श्रीदेवीसोबत सलमान खानने केलेला हा चित्रपट फॅन्टसीवर आधारीत होता. श्रीदेवी अर्था परी तिची हरवलेली जादूची कांडी घेण्यासाठी येते. त्यानंतर काय घडते हे सांगणारा हा चित्रपट आहे. 1993 साली हा चित्रपट रिलीज झाला. 

ADVERTISEMENT

चांद का तुकडा: 1994 साली रिलीज झालेला हा चित्रपट सलमानसाठी फार काही खास ठरला नाही. एनआरआय सलमान खान आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी भारतात येतो ते लग्न करण्यासाठी. फॅमिली ड्रामा असलेला हा चित्रपटही फार काही चालला नव्हता. 

अंदाज अपना अपना:  हा चित्रपट आता कितीही कॉमेडी आणि चांगल्या चित्रपटात येत असला तरी या चित्रपटाने रिलीज झाला तेव्हा फार काही कमाई केली नाही. राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चित्रपटात रवीना टंडन, करिश्मा कपूर आणि आमीर खान होता. 1994 साली रिलीज झालेला हा चित्रपट त्या काळात फार काही चालला नाही. 

संगदिल सनम:  सलमान खानच्या डायहार्ट फॅन्सनाही हा चित्रपट माहीत असेल की, नाही याची फारशी खात्री नाही. हा चित्रपटही 1994 मध्ये रिलीज झाला होता.  मनिषा कोईराला या चित्रपटात सलमानसोबत दिसली होती. फसवणूक, फॅमिली ड्रामा असा हा चित्रपट होता. 

आता तुम्हाला कळले असेलच की, सलमाननेही त्याच्या फिल्मी करीअरमध्ये अनेक फ्लॉप चित्रपट दिले आहेत. 

ADVERTISEMENT

सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, मात्र राजीवची आहे एक अट

19 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT