ADVERTISEMENT
home / Care
घरगुती हेअर मास्कने करा घरच्या घरी हेअर स्पा

घरगुती हेअर मास्कने करा घरच्या घरी हेअर स्पा

सध्या गेले बरेच महिने आपण सगळेच घरी आहोत. त्यात केसांसाठी स्पा करायला जाणंही शक्य नाही. आता काही दिवसांपूर्वी सलॉन सुरू झाली असली तरीही अजून बऱ्याच जणांन सलॉनमध्ये जाण्याचा धीर होत नाहीये. मग अशावेळी घरगुती हेअर मास्कनेच तुम्ही घरच्या घरी हेअर स्पा करू शकता. घरच्या घरी होममेड हेअर मास्क बनवून तुम्ही तुमच्या केसांना अधिक मुलायम, मजबूत आणि निरोगी बनवू शकता. आम्ही तुम्हाला घरच्या घरी हेअर मास्क बनवण्याचा सोपा उपाय सांगत आहोत. हे सोपे उपाय वापरू करा घरच्या घरी हेअर स्पा आणि घ्या केसांची योग्य काळजी. 

कोरड्या केसांसाठी होममेड हेअर मास्क

frizzy hair

shutterstock

कोरड्या केसांसाठी तुम्हाला दोन पद्धतीने हेअर मास्क वापरता येतात. ते कसे वापरायचे जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

पहिली पद्धत 

  • कोणत्याही तेलामध्ये 1 चमचा मध घाला 
  • हे मिश्रण केसांना नीट लावा 
  • साधारण एक तासानंतर शँपू लावा आणि केस नीट धुवा 

दुसरी पद्धत 

  • 1 अंडे घ्या आणि त्यामध्ये 3 चमचे मध घालून व्यवस्थित फेटा 
  • हे मिश्रण तुम्ही स्काल्प आणि केसांना लावा 
  • अर्धा ते एक तास तसंच ठेवा आणि मग शँपू लावा आणि केस नीट धुवा

केसगळती रोखण्यासाठी वापरा घरगुती 5 सोपे हेअर मास्क

मजबूत केसांसाठी होममेड हेअर मास्क

ADVERTISEMENT

Shutterstock

मजबूत केसांसाठीही तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हेअर मास्क बनवू शकता. त्याच्या नक्की काय पद्धती आहेत ते पाहूया 

पहिली पद्धत 

  • लोखंडाच्या भांड्यात आवळ्याचे चूर्ण घ्या. ते पाण्यात भिजवून ठेवा 
  • याचा लेप बनवा आणि तो केसांना लावा
  • यामुळे केस मजबूत आणि काळे होतात 

दुसरी पद्धत 

ADVERTISEMENT
  • कडू परवराची पानं घेऊन त्याचा रस काढा आणि केसांना लावा 
  • 2-3 महिने तुम्ही हा प्रयोग केल्यास, तुमचे केस मजबूत होतील आणि केस गळणार नाहीत

तिसरी पद्धत 

  • आवळा, मुलतानी माती, दही, शिकेकाई, रीठा आणि बेसन याचं मिश्रण करून घ्या
  • हे मिश्रण केसांना व्यवस्थित लावा आणि काही वेळ तसंच ठेवा आणि मग केस धुवा 
  • यामुळे केस मजबूत होतात

कढीपत्त्याचा हेअर मास्क तयार करून मिळवा सुंदर केस

चमकदार केसांसाठी होममेड हेअर मास्क

Shutterstock

ADVERTISEMENT

चमकदार केसांसाठी कोणती पद्धत वापरता येते ते पाहूया 

पहिली पद्धत 

  • पाण्यामध्ये लिंबाचा रस मिसळा आणि त्या पाण्याने केस धुवा. यामुळे केस चमकदार होतात

दुसरी पद्धत 

  • दही आणि अंडे एकत्र फेटून पेस्ट बनवा आणि केसांवर लावा.
  • सुकल्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. केस धुताना शँपूचा वापर करा अन्यथा अंड्याचा वास जाणार नाही

तिसरी पद्धत 

ADVERTISEMENT
  • पंधरा दिवसांनी एकदा शँपू लावल्यानंतर पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून केसांना लावा 
  • पुन्हा केस नीट धुवा. केसांना खूपच चांगली चमक येते 

केसांच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी उत्तम आहे अंड्याचा हेअर मास्क (Egg Hair Mask In Marathi)

कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी होममेड हेअर मास्क

Shutterstock

कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी आपण कितीतरी उपाय करतो. पण सोपे होममेड अर्थात घरगुती हेअर मास्क वापरून आपण त्यापासून सुटका मिळवू शकतो. 

ADVERTISEMENT

पहिली पद्धत

  • आल्याचे दोन मोठे तुकडे घेऊन त्याचा व्यवस्थित रस काढा
  • त्यात 1-2 चमचे लिंबाचा रस आणि तिळाचे तेल मिक्स करून मिश्रण तयार करा
  • हे मिश्रण स्काल्पला लावा आणि मसाज करा. अर्ध्या तासानंतर धुवा. आठवड्यातून तीन वेळा हा उपाय करा

दुसरी पद्धत 

  • स्काल्पला व्हिनेगर लावा आणि मसाज करा. सुकल्यानंतर केस धुवा. कोंडा जात नाही तोपर्यंत हा प्रयोग करा. रोज असं केल्यास लवकर फायदा मिळेल

तेलकट केसांसाठी होममेड हेअर मास्क

Shutterstock

ADVERTISEMENT

तेलकट केस ही बऱ्याच जणांसाठी डोकेदुखी असते. त्यासाठी घरगुती उपाय नक्की काय करायचा पाहूया 

पहिली पद्धत 

  • केस तेलकट झाल्यानंतर जर शँपूसाठी वेळ नसेल तर कॉर्नफ्लॉवरचा वापर करून पाहा. त्यानंतर 10 मिनिट्सने केसांवरून कंगवा फिरवून कॉर्नफ्लॉवर काढून टाका. केसांचा तेलकटपणा कमी होतो

दुसरी पद्धत 

  • अचानक तेलकटपणा घालवायचा असेल तर केसांवर थोडीशी टाल्कम पावडर मुळाशी लावा.  केस चांगले दिसतील. पण त्याच दिवशी केसांवरून आंघोळ करायला विसरू नका.  
01 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT