सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, राजीवची आहे एक अट

सुश्मिता सेनच्या भावाला मिळाली बिग बॉस 14 ची ऑफर, राजीवची आहे एक अट

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन सध्या जोरदार चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी चारू आणि त्याच्यात दूरावा आल्याच्या चर्चेला उधाण आलं होतं. लग्नानंतर एका वर्षाच्या आत त्यांच्यात दूरावा आल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र राजीव आणि  चारूकडून याबाबत कोणताच अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही आता पुन्हा एकदा राजीव सेन सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचं कारण त्याने  बिग बॉसच्या नव्या सिझनसाठी अप्रोच केलं अशी बातमी आहे. एवढंच नाही तर बिग बॉस मध्ये सहभागी होण्यासाठी त्याने चक्क एकदेखील अट ठेवली आहे.

Instagram

बिग बॉसमध्ये जाण्यासाठी काय आहे राजीव सेनची अट

राजीव सेन एक मॉडेल असून लवकरच एका बॉलीवूड चित्रपटातून पदार्पण  करणार आहे. मात्र सध्या तो त्याच्या फिटनेससाठी जास्त लोकप्रिय आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राजीवला बिग बॉस 14 मध्ये सहभागी व्हायचं आहे. मात्र त्याला या शोमध्ये फक्त एकट्यालाच सहभागी होता यावं अशी त्याने मागणी केली आहे. याचं कारण त्याचं चारूशी बिघडलेलं नातं नक्कीच असू शकतं. अजूनही याबाबत कोणताही फायनल निर्णय घेण्यात आलेला नसला तरी यंदा राजीव सेन बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजीव सेनचे मानधन आणि या अटीबाबत शोच्या निर्मात्यांशी बोलणे सुरू आहे. मागच्या वर्षीदेखील राजीवने या शोमध्ये जाण्याची ईच्छा व्यक्त केली होती. तेव्हा तर त्याची पत्नी चारूलाही त्याच्यासोबत बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं होते. मात्र तेव्हा चारूच्या भावाचे लग्न ठरलं होते त्यामुळे ती यात सहभागी होऊ शकली नाही.  

Instagram

राजीव आणि चारूमध्ये नेमकं काय बिनसलं

राजीव सेन आणि चारू असोपा गेल्या दोन महिन्यांपासून वेगवेगळे राहात आहेत. चारू मुंबईत तर राजीव दिल्लीत राहत आहे. या दोघांनी आपल्या नात्यातील दूराव्याबाबत अजून अधिकृतपणे काहीच स्पष्ट केलं नसलं तरी चारूने सोशल मीडियावर आपले दुःख नक्कीच व्यक्त केले आहे. चारूने अशा काही कविता सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत ज्यावरून तिच्यात आणि राजीवच्या नात्यात काहीतरी नक्कीच बिनसलं असल्याचं उघड होत आहे. या कवितेच्या अर्थानुसार आयुष्यात येणारे चढउतार आणि स्वतःला समजून घेणं किती आवश्यक आहे याविषयी तिने भाष्य केलं आहे. त्यामुळे चारूला नक्की काय सांगायचे आहे ते स्पष्ट होत आहे. मागच्या वर्षी 8 जूनला राजीव आणि चारूने कोर्ट मॅरेज केलं होतं आणि त्यानंतर गोव्यात 16 जूनला दोघांनी पारंपरिक पद्धतीने डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं. त्याआधी एक वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. राजीवच्या मते चारूला कुणीतरी जवळची व्यक्ती भडकवत आहे. ज्यामुळे तो चारूला सोडून दिल्लीला गेला आहे. तर चारूच्या मते  ती कोणा व्यक्तीच्या भडकवण्यामुळे नाही तर इतर काही कारणांमुळे त्याच्यापासून दूर आहे. दोघांनीही याबाबत खरं कारण उघड केलं नसलं तरी त्यांच्या नात्यातील दूरावा यामुळे कमी झालेला नाही.