घरी मायक्रोव्हव असावा असे प्रत्येकीला वाटते. खूप प्रयत्न करुन आणि अनेक चौकशी करुन आपण घरी योग्य असा मायक्रोव्हेव निवडतो. काही जण मायक्रोव्हेवचा वापर अगदी नियमित करतात. तर काहींसाठी मायक्रोव्हेव ही केवळ किचनमधील अडगळ असते. सुरुवातीचे काही दिवस मायक्रोव्हेव अगदी सगळ्या कामांसाठी वापरला जातो. मग हळुहळू उत्साह कमी झाला की, त्यामध्ये फक्त जेवण गरम करणे, पाणी गरम करणे इतकाच काय तो वापर उरतो. मग अगदीच ज्यावेळी मायक्रोव्हेव हा नकोसा होतो. अशावेळी तो फक्त एक स्टोरेज कपाट बनतो. तुम्ही नव्याने मायक्रोव्हेव आणला असेल किंवा तुम्हाला मायक्रोव्हेवचा पुन्हा वापर सुरु करायचा असेल तर तुम्ही मायक्रोव्हेवमध्ये काही झक्कास भारतीय पदार्थ बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सोप्या बेकिंग रेसिपीज सांगणार आहोत. ज्यासाठी तुम्हाला कोणता क्लास करायची आवश्यकता भासणार नाही. चला मग करुया सुरुवात
सगळ्यात आधी आपण झटपट आणि छान बनवता येतील अशा काही व्हेज रेसिपी पाहुयात.
पौष्टिक आणि चविष्ट लाडूच्या मस्त रेसिपीज (Recipe Of Different Kind Of Ladoos)
अगदी सोपी आणि पटकन होणारी मायक्रोव्हेवमधील ही रेसिपी अनेकांच्या आवडीची आहे. जे चिकन खात नाही. त्यांच्यासाठी प्रोटीनचा सोर्स म्हणजे पनीर असते. जर तुम्ही शेगडीवर पनीर टिक्का बनवत असाल तर तुम्ही एकदा ही रेसिपी मायक्रोव्हेवमध्ये करुन पाहा.
साहित्य: (Ingredients): 200 ग्रॅम पनीर, एक मोठी ढोबळी मिरची, 1 मोठा कांदा, 3 मोठे चमचे दही (पाणी काढून टाकलेले हंग कर्ड), 2 चमचे लिंबाचा रस, 3 मोठे चमचे बेसन, लाल तिखट, जीरा पावडर, धणे पावडर, गरम मसाला पावडर, मीठ चवीनुसार, कसुरी मेथी, चाट मसाला, आलं- लसूण पेस्ट, तेल, वुडन स्कुअर
कृती: (Procedure) :
टिप : प्रत्येक मायक्रोव्हेहची सेटींग थोडी वेगळी असते. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा थोडा वेळ लागेल. पण सवयीने तुम्हाला ही पद्धत सोपी वाटेल.
बाजारात मिळणारा नरम नरम लादी पाव खाल्ला की, आपण ही तो घरात बनवून पाहायला हवा असे आपल्याला वाटते. पण थोडीशी काळजी घेतली की, आपल्याला लादी पाव सहज बनवता येऊ शकतो.
साहित्य: (Ingredients): 250 ग्रॅम मैदा, 3 चमचे तेल, दूध आणि बटर आवश्यकतेनुसार, 3 मोठे चमचे साखर, ½ कप गरम पाणी, ½ चमचा मीठ, 3 मोठे चमचे तेल, 1 ½ ड्राय यीस्ट
कृती: (Procedure) :
टिप : पाव लुसलुशीत होणे सर्वस्वी यीस्टवर अवलंबून आहे. जर यीस्ट चांगली फुलली नसेल तर तुम्ही त्याचा वापर करु नका. पुन्हा एकदा नव्याने यीस्ट भिजत घाला.
हल्ली लॉकडाऊनमध्ये तुम्ही अगदी हमखास ऐकलेली रेसिपी असेल ती म्हणजे ओरिओ केक, बनवण्यास अगदी सोपी अशी ही रेसिपी तुम्ही जेव्हा केक खाण्याची इच्छा होईल तेव्हा अगदी पटकन करु शकता. कारण यासाठी तुम्हाला फार साहित्याचीही आवश्यकता नाही.
साहित्य: (Ingredients): ओरिओ बिस्किटांचा एक मोठा पुडा (तुमच्या आवडीच्या फ्लेवरचा), दूध, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर,बेकिंग टिन, बटर
कृती: (Procedure) :
टिप: कोणत्याही बिस्किटांचा केक बनवताना विशेषत: क्रिम बिस्किटांमध्ये साखर जास्त असते. त्यामुळे साखरेचा वापर थोडा जपून करा. कारण केक खूप गोड होण्याची शक्यता असते.
पिझ्झा खाण्याची इच्छा खूप वेळा होते. घरी पिझ्झा अगदी बेसपासून तयार करायचा म्हटले की, अनेकांना खूपच टेन्शन येते. पण तुम्हाला अगदी काहीच मिनिटात घरीच पिझ्झा करता आला तर आणि तोही कोणत्याही मोठमोठ्या भांड्यामध्ये नाही तर तोही कोणत्याही कपमध्ये चला पाहुया याची रेसिपी.
साहित्य: (Ingredients): 4 चमचे मैदा, ½ चमचा बेकिंग पावडर, चवीनुसार मीठ, 3 मोठे चमचे दूध, एक मोठा चमचा तेल (ऑलिव्ह ऑईल असल्यास उत्तम), पिझ्झा सॉस, आवडीच्या भाज्या, मोझरेला चीझ, ओरिगॅनो
कृती: (Procedure) :
टिप : अशाच पद्धतीने तुम्ही चिकन पिझ्झा बनवू शकता. पण चिकन जर तुम्ही आधीच शिजवून घेतले आणि मग टाकले तर पिझ्झा झटपट होईल.
नाश्त्यासाठी अनेकांचा आवडीचा पदार्थ म्हणजे व्हेजिटेबल इडली. तुम्हाला मायक्रोव्हेवमध्ये हा पदार्थ करता येऊ शकतो. तो कसा ते जाणून घेऊया.
साहित्य: (Ingredients) : 1 कप रवा, 1 कप दही, 1 वाटी तुमच्या आवडीच्या भाज्या, इनो, काळीमिरी पूड, मोहरी, मिरची, तेल, मीठ
कृती: (Procedure) :
टिप: बॅटर खूप पातळ होता कामा नये. ही इटपट इडली असल्यामुळे रव्यापासून बनवण्यात येते. यामध्ये मोहरीचा वापर करताना तुम्ही साधारण 30 सेकंदासाठी मोहरी गरम करुन घ्या.
आता आपण काही चटपटीत, हेल्दी आणि मस्त नॉन व्हेज रेसिपी पाहुयात.
हल्ली अनेक जण डाएटमुळे तेलकट पदार्थ खायला पाहात नाही. अनेकदा डाएटमध्ये बेक्ड रेसिपी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण कधीकधी लॉलीपॉपसारखी रेसिपी टाळता येत नाही. अशावेळी तुम्ही हे लॉलीपॉप करु शकता.
साहित्य: (Ingredients): चिकन लॉलीपॉपसाठी चिकन विंग्ज किंवा कच्चे लॉलीपॉप, व्हिनेगर, लाल तिखट, काळी मिरीपूड, गरम मसाला, आलं-लसूण पेस्ट, दही, कॉर्नफ्लोअर, गव्हाचे पीठ, तांदूळाचे पीठ, तेल
कृती: (Procedure) :
टिप: जर तुम्हाला चिकन खूप टेंडर हवे असेल तर पुन्हा ग्रील्ड करायला जाऊ नका.
स्टाटर्स म्हणून खाल्ली जाणरी चिकनची ही डिश फारच प्रसिद्ध आहे. पण ती घरी करायला कंटाळा येतो. पण मायक्रोव्हेवमध्ये ही रेसिपी फारच कमी भांड्याचा वापर करुन करता येते.
साहित्य: (Ingredients): ½ किलो बोनलेस चिकन, आलं-लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट. लिंबाचा रस, दही, कसुरी मेथी
कृती: (Procedure) :
टिप : तुम्ही बेकिंग नंतर ग्रील्ड सुद्धा करु शकता. त्यामुळे तुम्हाला छान क्रिस्प येईल.
या पावसाळ्यात करा कडधान्यांच्या या चटकदार हेल्दी रेसिपी (Mouth Watering Sprout Recipes)
ग्रील्ड चिकन किंवा फॅन्सी नावाने त्याला चिकन ग्रील्ड नावानेही ओळखले जाते. पण ते मायक्रोव्हेवमध्ये कसे बनवायचे ते पाहुया
साहित्य: (Ingredients): साधारण 1 किलो चिकन, आलं - लसूण पेस्ट, लाल तिखट, लिंबाचा रस, हळद, गरम मसाला, धणे पूड
कृती: (Procedure) :
टिप: ग्रील्डमोडचा वापर करताना तुम्हाला टॉल जाळीचा उपयोग करायचा आहे त्यामुळे चिकनची वरील बाजू छान ग्रील्ड दिसेल.
डाएटमध्ये असणाऱ्यांसाठी किंवा चिकन सॅलेड आवडते अशांसाठी हा एक छान पर्याय आहे. हा करणेही फार सोपे आहे.
साहित्य: (Ingredients): ½ किलो चिकन ब्रेस्ट, काळीमिरी पूड, 3 मोठे चमचे कॉर्नफ्लोअर
कृती: (Procedure) :
टिप: पॅनमध्येही हे चिकन करता येते. पण तुम्हाला मायक्कोव्हेवमध्ये छान टेंडर चिकन मिळते.
चिकन पॉपकॉर्न ही सगळ्यांचीच आवडती रेसिपी आहे. खूप जणांना फ्राईड चिकन पॉपकॉर्न आवडतात. पण तुम्ही कधी मायक्रोव्हेवमधील चिकन पॉपकॉर्न खाल्ले आहेत का? मग ही रेसिपी नक्की करा.
साहित्य: (Ingredients): 500 ग्रॅम बोनलेस चिकन, हळद, लाल तिखट, काळीमिरी पूड, बडिशेपेची पूड, मीठ, आलं-लसूण पेस्ट, लिंबाचा रस
कृती: (Procedure):
टिप: तुम्ही चिकन आणि क्रिस्पी करण्यासाठी कॉर्नफ्लेक्सचाही उपयोग करु शकता.
1. घरी वापरासाठी मायक्रोव्हेवची निवड कशी करावी?
हल्ली मायक्रोव्हेव असणे एक स्टेटस सिबाँल झाले आहे. खूप जण किचनची शोभा वाढवण्यासाठी मायक्रोव्हेव घेतात. पण त्याचा उपयोग फारसा करत नाही. जर तुम्हाला फक्त कुटुंबासाठी मर्यादित असा मायक्रोव्हेव घ्यायचा असेल तर तुम्हाला बाजारात खूप व्हरायटी मिळतील. आपण घरी मायक्रोव्हेव घेतो त्यावेळी खूप गोंधळून जातो. पण घरी घेतल्या जाणाऱ्या मायक्रोव्हेवमध्ये पाणी गरम करण्यापासून ते केक बनवण्यापर्यंत सगळ्या सोयी असायला हव्यात असे आपल्याला वाटते. म्हणूनच तुम्ही मायक्रो + कन्व्हेक्शन अशा मायक्रोव्हेवची निवड करा. जर तुम्ही बेकर नाही किंवा तुमचा व्यवसाय त्याशी निगडीत नाही तर तुम्हाला 20 लिटरचा मायक्रोव्हेव पुरेसा आहे.
2. मायक्रोव्हेवमध्ये बेक करणे सोपे असते का?
होय, मायक्रोव्हेवमध्ये बेक करणे फारच सोपे असते. फक्त तुम्हाला मायक्रोव्हेवला कन्व्हेक्शन मोडमध्ये बदलून टेंपरेचर सेट करुन काहीही गोष्टी बेक करायच्या असतात. तुम्ही जो पदार्थ करत आहात. त्याचे प्री हिट आणि टेंपरेचर जाणून घेतले की, बेकिंग करणे फारच सोपे जाते. काही केक तर मायक्रोव्हेवमध्ये कोणताही मोड न बदलता होऊन जातात.
3. ओव्हनमध्ये कोणत्या गोष्टी बेक केल्या जातात?
ओव्हनमध्ये बऱ्याच गोष्टी बेक होतात अगदी केक, खारी, बिस्कीट, पाव, टोस्ट, पिझ्झा असे असंख्य पदार्थ हे ओव्हनमध्ये केले जातात.
आता या काही बेकिंग रेसिपी आणि टीप्सचा वापर करुन मस्त रेसिपी बनवा.