लग्नामध्ये नक्की कोणती साडी नेसायची असा प्रश्न नेहमीच पडतो. ब्रायडल आऊटफिट म्हटलं की पैठणी, कांजिवरम या साड्या ठरलेल्या असतात. पण तुम्हाला काही वेगळं हवं असेल तर तुमच्यासाठी पारंपरिक भारतीय साडी (Traditional Indian Saree) म्हणून बनारसी साडी (Banarasi Saree) हा उत्तम पर्याय आहे. कधीही भारतीय साडी म्हटली की बनारसी साडी नक्कीच डोळ्यासमोर येते. अगदी पूर्वीपासून लग्नात बनारसी शालू नेसले जायचे. पण बनारसी शालू जड असल्यामुळे नंतर कालांतराने डिझाईनर साड्यांची मागणी वाढली. पण तुम्हाला पारंपरिक साडीमध्ये ब्रायडल लुक हवा असेल तर बनारसी हा अप्रतिम पर्याय तुमच्यासमोर नक्कीच आहे. लग्न, इतर कोणतं पारंपरिक कार्य घरात असेल अथवा कोणत्याही खास आणि शुभ दिवशी बनारसी साडी नेसणं महिलांना नक्कीच आवडतं. प्रत्येक महिलेला ही साडी शोभून दिसते. तसंच बनारसी साडी ही दिसायला अतिशय रॉयल आणि सुंदर दिसते. त्यामुळेच सर्वांपेक्षा वेगळं दिसण्यासाठी बनारसी साडीची निवड केली जाते. बनारसी साडी ब्रायडल आऊटफिट असला तरीही ही साडी नेसून स्मार्ट दिसण्यासाठी आम्ही तुम्हाला काही आधुनिक टिप्स देत आहोत. तुम्ही या मॉडर्न टिप्स वापरून नक्कीच सुंदर दिसाल.
बनारसी साडी नेसणं सर्वांनाच माहीत आहे. पण त्यातही आपण सर्वांपेक्षा वेगळं कसं दिसू आणि अधिक आकर्षक कसं दिसता येईल यासाठी काही स्मार्ट आणि आधुनिक टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.
1. बनारसी साडी तुम्हाला जर आजच्या काळात ब्रायडल लुकसाठी हवी असेल तर तुम्ही त्यासह डिझाईनर ब्लाऊज आणि आधुनिक दागिने घाला. यामुळे तुम्हाला एक वेगळा लुक मिळतो
2. बनारसी साडीसह फुल स्लीव्ह्ज ब्लाऊज, कॉर्सेट, ट्रेंट कोट, क्रॉप टॉप, शर्ट ब्लाऊट, हॉल्टर नेक ब्लाऊज इत्यादी तुम्ही घातला तर तुमची ही बनारसी साडी तुम्हाला अधिक स्टायलिश बनवते. तुम्ही बनारसी साड्यांवर असेच ब्लाऊज ट्राय करा
3. बनारसी साड्यांसह तुम्ही कलमकारी, लहरिया, चिकनकारी असे कॉन्ट्रास्ट फॅब्रिक आणि कॉन्ट्रास्ट रंग असणारे स्टायलिश ब्लाऊज घाला. तुम्हाला तुमचा लुक अधिक उठावदार करण्यासाठी याचा उपयोग होतो. तुम्ही इतर सर्वांपेक्षा अधिक स्टायलिश आणि सुंदर दिसता
4. तरूण मुली बनारसी साडीसह मोठे एम्ब्रॉयडर्ड जॅकेट, केप, शर्ट ब्लाऊज इत्यादी घालून त्या साडीला अधिक ट्रेंडी लुक देऊ शकतात. तसंच यावर आधुनिक आणि लांब तसंच वेगळ्या रंगाचे दागिने घातल्यास, ही साडी अधिक उठावदार दिसते
5. वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी तुम्ही वेगवेगळ्या रंगाच्या बनारसी साडी नेसून नवा लुक करू शकता. उदाहरणार्थ लग्न समारंभ असल्यास, तुम्ही सिल्क बनारसी साडीचा वापर करा. जर लग्न उन्हाळ्याच्या दिवसात असतील तर तुम्हाला ऑर्गेन्झा बनारसी साडीचा वापर करता येईल
कांजिवरम आणि बनारसी साड्यांमधील फरक ओळखणं होतंय कठीण तर ओळखा असे
6. तुम्हाला जर कंटेम्प्रेरी लुक हवा असेल तर तुम्ही मोठ्या बॉर्डरच्या बनारसी साडीचा, तसेच ज्योमेट्रिक मोटिफ आणि मुगा, टसर, कॉटन, ऑर्गेन्झा इत्यादीसारख्या टेक्स्चरच्या साड्यांचा वापर करू शकता. बनारसीचे कोणतेही टेक्स्चर हे सुंदरच दिसते. तसंच अतिशय रॉयल असल्यामुळे तुमच्या लुकमध्ये खूपच फरक पडतो
7. तुमच्याजवळ जर एखादी जुनी बनारसी साडी असेल आणि तुम्हाला ती वापरायची असेल तर तुम्ही तुमच्या जुन्या बनारसी साडीपासून पारंपरिक गाऊन, लॉन्ग स्कर्ट, लॉन्ग जॅकेट, कोट, पलाझो पँट, लेहंगा चोळी, डिझाईनर ब्लाऊज, कॉर्सेट, दुपट्टा, पोटली बॅग यापैकी काहीही तयार करून आपल्या वॉर्डरोबला नवा लुक देऊ शकता.