चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रीने सुंदरच असायला हवं अशी काहींची अपेक्षा असते. पण सुंदर असून भागत नाही. त्या अभिनेत्रीने अभिनय ही उत्तम करायला हवा. एखादी हिरोईन स्टार होईपर्यंत तिच्याकडून अनेक अपेक्षा केल्या जातात. सुंदरता, अभिनय कौशल्य वगैरे… ही यादी मोठीच असते. पण या सगळ्या मेहनतीसोबत नशिबाचाही भाग असतोच कुठेतरी. कारण आतापर्यंत अशा काही सुंदर अभिनेत्री इंडस्ट्रीमध्ये येऊन गेल्या आहेत. ज्या सुंदर असूनही त्या बॉक्स ऑफिसवर आपला ठसा उमटवू शकल्या नाहीत. जाणून घेऊया अशाच काही सुंदर अभिनेत्री
‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून अभिनेत्री अमिषा पटेल घराघरात पोहोचली. पहिल्याच चित्रपटात तिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची तारीफ करण्यात आली. एका रात्रीत ती यशस्वी स्टार झाली. त्यानंतर तिला चित्रपटांच्या ऑफर्सही आल्या. तिने अनेक चित्रपटांमध्ये लीड रोल साकारले. पण तिच्या कोणत्याही चित्रपटांना फारसे यश मिळाले नाही. जे नाव तिने एका चित्रपटात कमावले.तशी प्रसिद्धी तिला पुन्हा कधीच मिळाली नाही. नुकतीच ती बिग बॉसमध्ये मालकिण म्हणून दिसली. चित्रपट वगळता ती अनेक कॉन्ट्राव्हर्सीजमध्ये अडकली होती.
टीव्हीवर एक मालिका केल्यानंतर सुंदर अशा यामी गौतमला आयुषमान खुरानासोबत ‘विकी डोनर’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ‘काबिल’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेमुळे ती चांगलीच प्रसिद्ध झाली. पण तिला म्हणावी तशी प्रसिद्धी आणि यश मिळाले नाही. तिला अजूनही कामं मिळवण्यासाठी थोडासा स्ट्रगल तर करावाच लागत आहे. शिवाय तिला तितकेसे स्टारडम अद्याप मिळाला नाही.
‘एअरलिफ्ट’ या चित्रपटात अक्षय कुमारसोबत निमरत कौर झळकली. त्यानंतर तिला ‘लंच बॉक्स’ या चित्रपटातही लीड रोल करण्याची संधी मिळाली. याशिवाय तिने ‘द टेस्ट केस’ नावाची सिरिज केली. पण तिला म्हणावे तसे यश अद्याप मिळालेले नाही. निमरतने अनेक म्युझिक व्हिडिओ केले आहेत. पण तरीही तिला स्टारडम मिळाले नाही.
धक्कादायक! मराठी अभिनेता आशुतोष भाकरेची आत्महत्या
हुमा खुरेशीच्या सौंदर्याचेही अनेक चाहते आहेत. हुमा कुरेशीने अनेक चित्रपटांमध्ये काम केली आहेत. ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातून ती प्रसिद्धीच्या झोतात आली. त्यानंतर तिने अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाच भूमिका दाखवली. ‘काला’, ‘बदलापूर’ ‘जॉली LLB2’, ‘देढ इश्किया’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण तरीही तिला म्हणावे तितके स्टारडम आणि सुपरस्टार अशी प्रसिद्धी मिळालेली नाही.
सुप्रसिद्ध अभिनेत्री हेमामालिनी यांची मुलगी ईशा देओल. इशा देओल ज्यावेळी चित्रपटात आली त्यावेळी ती हेमामालिनीसारखी दिसते म्हणून तिच्या सौंदर्याची चर्चा झाली. तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. पण तिच्या सौंदर्याची जादू जास्त काळ टिकली नाही. तिला काही काळानंतर काम मिळणेही बंद झाले.कालांतराने ती चित्रपटसृष्टीपासून दूरही झाली. पण पुन्हा तिने वेबसिरिजच्या माध्यमातून पदार्पण केले. पण तरीही तिच्या पदरी म्हणावे तसे स्टारडम पडले नाही.
अभिनेत्रींच्या यादीमध्ये आणखीही अभिनेत्रींची नावे आहेत. त्यांनाही चांगली काम मिळून फार स्टारडम मिळाला नाही.