लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही बेबी पावडर आहे फायदेशीर

लहान मुलांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही बेबी पावडर आहे फायदेशीर

लहान मुलांच्या कोमल आणि नाजूक त्वचेसाठी आपण नेहमीच खास प्रोडक्ट वापरतो. त्यांचा साबण, शॅम्पू, तेल, पावडर ही नेहमी वेगळीच असते. लहान मुलांच्या या सगळ्याच प्रोडक्टसचा सुगंध फारच गोड असतो. हे प्रोडक्ट लहान मुलांसाठी आहेत म्हटल्यावर त्याचा वापर मोठ्यांनी करणे योग्य नाही ही गोष्ट खरी असली तरी देखील मोठ्यांसाठीही बेबी पावडर फारच फायद्याची असते. या बेबी पावडरचा उपयोग तुम्ही कसा करु शकता ते जाणून घेऊया.

घामाचा वास घेते शोषून

 जर तुम्हाला घामाचा त्रास असेल तर तुमच्यासाठी बेबी पावडर एकदम बेस्ट आहे.  बेबी पावडर तुमचा घाम शोषून तुमच्या शरीरातून येणारी घामाची दुर्गंधी दूर करते. आंघोळी नंतर किंवा तुम्ही घामाच्या शरीराने ऑफिसला पोहोचल्यानंतर डिओ लावण्यापेक्षा तुम्ही बेबी पावडर लावा. तुम्हाला लगेचच फरक जाणवेल. टाल्कम पावडरपेक्षाही या पावडरचे टेक्शचर मुलायम असते. त्यामुळे तुमच्या शरीरावर ती पटकन पसरते. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्यावर होत नाही. जर तुम्हाला खूच घाम येत असेल तर तुम्ही तुमच्या उशी आणि चादरीवरही बेबी पावडर घालू शकता.तुम्हाला चांगली झोपही लागेल. 

केस धुण्याआधी करा हा उपाय, केसांचे गळणे होईल कमी

मांड्याची जळजळ करेल कमी

shutterstock

अनेकांना मांड्यांना मांड्या घासण्याचा त्रास असतो. जर तुम्हाला हा त्रास सतत होत असेल तर तुमच्यासाठी बेबी पावडर अगदीच बेस्ट आहे. कोणतेही कपडे घालण्याआधी तुम्ही तुमच्या मांड्या स्वच्छ पुसून घ्या आणि मग त्यावर तुम्ही बेबी पावडर लावा. तुम्हाला नक्कीच आराम मिळेल. तुमच्या मांड्याची जळजळही बेबी पावडरमुळे कमी होईल. 

म्हणून दर 15 दिवसांनी तुम्ही बदलायला हवा वर्कआऊट

मेकअपसाठीही होते बेबी पावडरचा उपयोग

जर तुमची त्वचा नाजूक असेल आणि तुम्हाला मेकअप प्रोडक्टचा त्रास होत असेल तर तुम्ही कोणताही बेस न लावता जर चेहऱ्यावर बेबी पावडर लावली आणि त्यावर मेकअप केला तर तुमचा मेकअप अधिक काळ टिकून राहिल. लुझ पावडरच्या ठिकाणी तुम्ही बेबी पावडरचा वापर करु शकता. या शिवाय तुम्हाला डोळ्यांच्या पापण्या मोठ्या दिसाव्या आणि जाड दिसाव्या अशा वाटत असतील तर तुम्ही एका छोट्या ब्रशच्या साहाय्याने पापण्यांना बेबी पावडर लावा आणि मग त्यावर मस्कारा त्यामुळे  तुमच्या पापण्या मोठ्या आणि छान दिसतील. 

केसांचा तेलकटपणा करते कमी

Instagram

अनेकांचे केस लगेच तेलकट होतात. तुम्हालाही तुमचे केस धुतल्यानंतर लगेच तेलकट झाल्यासारखे वाटत असतील आणि तुम्हाला केस धुण्याचा कंटाळा असेल तर तुम्ही बेबी पावडर थेट तुमच्या स्काल्पला लावू शकता. असे केल्यामुळे तुमच्या केसांचा तेलकटपणा इन्स्टंट जातो. त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा प्रवासात या ट्रिकचा उपयोग करु शकता. 


मग आता बिनधास्त करा बेबी पावडरचा उपयोग नक्की करुन पाहा. 

मेडिफेशियल' आहे तुमच्या चेहऱ्यासाठी आहे फायदेशीर, नक्की ट्राय करा