मोहरीच्या तेलाचा उपयोग हा अनादी काळापासून स्वयंपाकघरात होत आला आहे. याचे कारण म्हणजे मोहरी तेलाचे आरोग्य फायदे अनेक आहेत. मोहरीच्या तेलाचा उपयोग हा सर्वात जास्त खाद्यपदार्थ बनविण्यासाठी करण्यात येतो हे आपल्याला प्रत्येकाला माहीतच आहे. पण मोहरीचे तेल हे केवळ याच कामासाठी मर्यादित नाही, तर याचा उपयोग तुम्ही आरोग्यासाठी करून घेऊ शकता. हिंदीमध्ये याला सरसों का तेल म्हटले जाते तर मराठीत आपण मोहरीचे तेल म्हणतो. शरीराच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो. मोहरीच्या तेलाचा उपयोग नक्की कसा करता येतो ते आपण या लेखातून बघणार आहोत. अर्थात कोणत्याही शारीरिक समस्येसाठी पूर्णतः मोहरीचे तेल उपयोगी पडत नाही त्यासाठी आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घ्यावाच लागतो. पण ज्या काही शारीरिक समस्यांसाठी आपल्याला मोहरीच्या तेलाचा उपयोग करून घेता येतो ते आपण यातून पाहणार आहोत. मोहरीच्या तेलाचे फायदे जाणून घेऊया.
मोहरीच्या झाडातून मोहरीचे तेल काढण्यात येते. याचे वैज्ञानिक नाव ब्रेसिका जुनसा असे आहे. तर विविध भाषेत याला वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. इंग्रजीमध्ये मस्टर्ड, तेलुगूमध्ये अवन्यून, मल्याळममध्ये कदुगेना आणि मराठीत मोहरी असं म्हटलं जातं. प्रत्येकाच्या घरात मोहरी हा पदार्थ हमखास सापडतो आणि उत्तरेकडील राहणाऱ्या लोकांकडे मोहरीचे तेलही हमखास स्वयंपाकघरात मिळते. मोहरीचे दाणे हे भुरे, लाल आणि पिवळ्या रंगाचे असतात. मशीनच्या मदतीने याचे तेल काढण्यात येते. भारतामध्ये याचे उत्पन्न जास्त प्रमाणात आहे. या तेलात भाजीला दिलेली फोडणी ही जेवण अधिक चविष्ट बनवते. तसेच मोहरीच्या तेलात अधिक पोषक तत्व असतात. म्हणूनच याचा वापर जास्त प्रमाणात भारतामध्ये केला जातो. यामध्ये काय पोषक तत्व असतात ते पाहूया.
मोहरीच्या तेलामध्ये अनेक गुण अर्थात पोषक तत्व आढळतात. मोहरीच्या तेलातून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. त्याशिवाय टोटल लिपीड अर्थात फॅट हे साधारण 100 ग्रॅम असतात. यामध्ये फॅटी अॅसिड आणि टोटल सॅच्युरेटेडचे प्रमाणही असते. तसंच यामधून काही प्रमाणात कॅलरीजही मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीच्या तेलामध्ये शारीरिक स्वास्थ्य राखणारे गुणधर्म अधिक आढळतात. त्यामुळेच याचा पदार्थांमधून वापर करण्यात येतो. जेणेकरून पोटात हे तेल जाऊन संपूर्ण शरीराला याचा फायदा मिळू शकेल.
मोहरीच्या तेलाचा पदार्थांतून होणारा फायदा तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे. मात्र आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी याचा अधिक काय फायदा होतो ते आपण जाणून घेऊया.
आताच नाही तर अगदी कित्येक वर्षांपासून मोहरीचे तेल हे सांधेदुखी, हाडांचे दुखणे अर्थात मांसपेशी दुखत असतील तर त्यावर फायदेशीर ठरते. नियमित स्वरूपात मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास, शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो आणि हाडांचे दुखणे अथवा सांधेदुखी थांबण्यास मदत मिळते. तसंच यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळेही सांधेदुखी आणि गाठींसारख्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. त्यामुळे सांधेदुखी अथवा हाडांचे दुखणे चालू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा मोहरीच्या तेलाने मालिश करा असं सांगण्यात येते. बऱ्याचदा डॉक्टरही हा सल्ला देतात. याचा हाडांना चांगलाच फायदा मिळतो.
मोहरीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड असल्याने आणि त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकण्यासाठी उपयुक्त ठरते. तसंच हृदय निरोगी राखण्यासाठीही याचा उपयोग होतो. आपल्या शरीरात काही ना काही कारणाने अनेक विषारी पदार्थ जात असतात. पण त्याचा आपल्याला काय त्रास होतोय हे वेळेवर कळत नाही. मग अशावेळी आपण आपल्या रोजच्या जेवणात प्रमाणात मोहरीचे तेल वापरल्यास, शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी याची मदत मिळते. शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी करण्यासाठीही याचा उपयोग होतो.
त्वचेतील मॉईस्चराईजर बऱ्याचदा कमी होत असते. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय म्हणून मोहरीचे तेल वापरू शकता. मोहरीच्या तेलामध्ये असणारे ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई याचं प्रमाण जास्त असल्याने तुमची त्वचा मॉईस्चराईज करण्यासाठी उपयोग होतो. तसंच तुमची त्वचा अधिक चांगली तुकतुकीत करण्यासाठीही याचा उपयोग तुम्ही करू शकता. काही जणांना याचा वास आवडत नाही. मात्र याचे गुणधर्म अधिक चांगले असल्याने तुम्ही किमान आंघोळीच्या आधी अर्धा तास हे तेल अंगाला लाऊन ठेवा आणि नियमित याचा वापर केल्यास, तुमची त्वचा चांगली राहण्यास मदत मिळते.
यामध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 फॅटी अॅसिडमुळे शरीरातील हाडे मजबूत होतात. तुम्ही नियमित स्वरूपात या तेलाने मालिश करत राहिल्यास, तुम्हाला हाडांची समस्या निर्माण होणार नाही. तसेच तुम्हाला सांधेदुखीचा त्रासही होणार नाही. हाडांची मजबूती तुम्हाला अनेक वर्षांसाठी हवी असेल तर तुम्ही नियमित मोहरीच्या तेलाने योग्य मसाज करून घ्या. तुम्हाला स्वतःला जमत नसेल तर घरातील कोणाच्या तरी मदतीने तुम्ही हा मसाज किमान आठवड्यातून एकदा तरी व्यवस्थित करून घ्यायला हवा.
मोहरीच्या तेलाने त्वचेला अधिक चांगले फायदे मिळतात. विशेषतः वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी सकारात्मक म्हणून मोहरीच्या तेलाचा उपयोग करून घेता येतो. वास्तविक एका शोधानुसार मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिड, विटामिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीरामध्ये वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोहरीचे तेल फायदेशीर ठरते. सुरकुत्या असतील तर ही समस्या कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येतो. मोहरीचे तेल तुम्ही नियमित वापरून आपली त्वचा अधिक तजेलदार आणि तुकतुकीत ठेऊ शकता. तसेच है नैसर्गिक औषध आहे. त्यामुळे याचा तुमच्या त्वचेला कोणताही त्रासही होत नाही.
बरेच लोक केसांना मोहरीचे तेल लावतात. मोहरीच्या तेलाचा एक वेगळा वास जरी येत असला तरीही याचे फायदे अनके आहेत. केसांना आणि स्काल्पसाठी मोहरीचे तेल अतिशय फायदेशीर ठरते. मोहरीचे तेल लावल्यास, केसांची वाढ आणि विकास होण्यासाठी उपयोग होतो. केसांची वाढ होण्यासाठी मोहरीच्या तेलातील मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड, ओमेगा-3, ओमेगा - 6 फॅटी अॅसिडचा उपयोग होतो. याशिवाय यामध्ये अँटिफंगल आणि अँटिबॅक्टेरियल प्रभाव असतो जो केसातील कोंडा मिटविण्यासाठी उपयोगी ठरतो. यामुळे स्काल्पमध्ये येणारी खाजेच्या समस्येपासूनही सुटका मिळते. केसांसाठी मोहरीच्या तेलाचा खूपच फायदा होतो.
मोहरीच्या तेलात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असून यामध्ये ओमेगा-3, ओमेगा-6 फॅटी अॅसिडही असते. त्वचेवर येणारे टॅनिंग कमी करण्यासाठी याचा उपयोग करून घेता येतो. टॅनिंग त्वचा काळसर होते. मात्र मोहरीच्या तेलाने हा काळसरपणा काढून टाकता येतो. नियमित या तेलाने त्वचेला मालिश केल्यास, टॅनिंग दूर होण्यास मदत होते.
नियमित स्वरूपात तुम्ही मोहरीच्या तेलाने मालिश केल्यास तुमच्या शरीरातील रक्तप्रवाहामध्ये सुधारणा होते आणि त्यामुळे तुमच्या शरीरातील हाडं आणि मांसपेशी चांगल्या राहतात. इतकंच नाही तर तुमच्या मेंदूलाही यामुळे चांगला रक्तपुरवठा होत राहतो. त्यामुळे तुम्ही नियमित स्वरुपात मोहरीच्या तेलाने शरीराला मालिश करावे. किमान आठवड्यातून एकदा तरी हा प्रयोग करावा.
मोहरीच्या तेलात अँटिबॅक्टेरियल, अँटिफंगल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण असतात. यामध्ये असणाऱ्या अँटिइन्फ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सूज येण्याशी निगडीत असणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते. तसंच डिक्लोफेनाक निर्माण करण्यासाठी याचा उपयोग करण्यात येतो कारण हे एक अँटिइन्फ्लेमेटरी औषध आहे. किटाणूंशी प्रतिकार करण्याची यामध्ये शक्ती असल्यामुळे फंगस आणि त्वचेवर येणारे रॅशेस कमी होण्यास याची मदत मिळते. रॅशेस होण्यास अथवा संक्रमण होत असेल तर त्याचा इलाज करण्यासाठी मोहरीच्या तेलाचा उपयोग करण्यात येऊ शकतो.
तुम्हाला जर फाटलेल्या ओठांची समस्या असेल तर यावर उत्तम उपाय म्हणजे मोहरीचे तेल. मोहरीचे तेल हे एक उत्तम मॉईस्चराईजर आहे. त्यामुळे फाटलेल्या ओठांवरही मोहरीचे तेल मॉईस्चराईजप्रमाणे काम करते. यातील गुणधर्म तुमच्या ओठांवरील त्वचेसाठी उत्कृष्ट ठरतात. ओठ हा शरीराचा नाजूक भाग असतो. त्यामुळे त्याची काळजी घेताना उत्तम गोष्टींचाच वापर करावा लागतो. मोहरीच्या तेलाने ओठांना कोणतेही नुकसान होत नाही तर तुमचे ओठ मऊ राखण्यास मदत मिळते.
मोहरीचे तेल हे किटक निवारणासाठीही उपयोगी ठरते. अर्थात त्वचेवर फंगल इन्फेक्शन असेल तर याचा उपयोग करून घेता येतो. हे गुणकारी तेल त्वचेवरील अन्य किडे दूर करण्यासाठीही फायदेशीर आहे. यातील एडीज एल्बोपिक्टस डासांनादेखील आपल्या शरीरापासून दूर ठेवते. एका शोधातून हे सिद्ध करण्यात आले आहे. त्याशिवाय काही जणांना फंगल इन्फेक्शनचा होणारा त्रास कमी करण्यासाठीही मोहरीच्या तेलाचा उपयोग होतो.
मोहरीच्या तेलाने शरीरातील उष्णात वाढते. त्यामुळेच उत्तरेकडील भागात थंडीत याचा वापर जास्त प्रमाणात करण्यात येतो. यामध्ये असणारे गुणधर्म हे शरीरातील ऊर्जा आणि उष्णता वाढविण्यास मदत करतात. तसंच तुमचे शरीर अधिक निरोगी ठेवण्यासाठीही याचा फायदा करून घेता येतो. म्हणून पदार्थांमध्ये मोहरीचे तेल वापरून शरीर निरोगी राखण्याचा प्रयत्न करण्यात येतो. मोहरी तेलाचे आरोग्य फायदे अधिक आहेत.
त्वचा, केस आणि बऱ्याच रोगांवर गुणकारी मोहरीच्या बिया (Benefits Of Mustard Seeds In Marathi)
या तेलाने जसे फायदे मिळतात तसेच काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते. नक्की कशाप्रकारे नुकसान होऊ शकते ते जाणून घेऊया.
1. चेहऱ्याच्या मसाजसाठी मोहरीचे तेल चांगले ठरते का?
जर तुम्हाला अॅक्न अथवा रॅशेसची समस्या असेल तर तुम्ही रोज मोहरीच्या तेलाचे 10-15 थेंब नियमित चेहऱ्याला लावा. यामुळे तुमचा चेहरा अधिक तजेलदार आणि निरोगी राहील. मोहरीच्या तेलाने चेहऱ्यावर रोज मसाज केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंग निघून जाण्यास मदत मिळते.
2. तुमच्या केसात तुम्ही किती वेळ मोहरीचे तेल लाऊन ठेऊ शकता?
तुम्ही मोहरीच्या तेलाचा वापर आंघोळीच्या आधी काही तास करा. तासनतास अथवा दिवसभर तुम्ही हे तेल लाऊन केसाला तसंच ठेऊ नका. तेल लाऊन साधारण 10-15 मिनिट्स मसाज करून तितकाच वेळ ठेवा आणि आंघोळ करा. तुम्हाला त्याचा फायदा मिळेल.
3. त्वचा उजळविण्यासाठी मोहरीचे तेल उपयुक्त ठरते का?
तुमची त्वचा तजेलदार बनविण्यासाठी मोहरीचे तेल नक्कीच उपयुक्त ठरते. तुमच्या चेहऱ्यावरील डाग कमी करून तुमच्या चेहऱ्याचा पूर्ववत रंग आणण्यासाठी आणि चेहरा उजळविण्यासाठी तुम्ही रोज मोहरीच्या तेलाचे 10-15 थेंब नियमित चेहऱ्याला लावा आणि मसाज करा. तुम्हाला हवं तर त्यामध्ये तुम्ही लिंबाचा रस आणि दही मिक्स करूनही लाऊ शकता.
4. केसांसाठी कोणते मोहरीचे तेल उत्कृष्ट ठरते?
तुमचे घरातील नियमित मोहरीचे तेल तुम्ही केसांसाठी वापरा. तेच उत्कृष्ट ठरते. त्यासठी तुम्ही मोहरीचे तेल गरम करून घ्या आणि मग केसांना स्काल्पपासून मसाज करा. यामुळे तुमच्या केसांची वाढही चांगली होते.