वजन कमी करण्यासह जाणून घ्या रव्याचे फायदे - Benefits Of Semolina In Marathi

वजन कमी करण्यासह जाणून घ्या रव्याचे फायदे - Benefits Of Semolina In Marathi

आपण आपल्या नाश्त्यामध्ये रव्याचा शिरा, रव्याचा उपमा हे पदार्थ तर नेहमीच खातो. तसंच रवा इडली, आप्पे यासारखे  पदार्थही आपण नाश्त्यामध्ये खात असतो. वास्तविक रवा हा जास्तीत जास्त नाश्ता अथवा पक्वान्नाच्या स्वरूपात आपल्याकडे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येतो. पण याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे असतात याची तुम्हाला कल्पना आहे का? रवाचे फायदे अनेक आहेत. याला इंग्रजीमध्ये सेमोलिना म्हणतात तर हिंदीमध्ये सूजी. तर गुगलमध्ये अनेकजण याचे नाव शोधताना (semolina in marathi) असा वापर करतात. रवा आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो आणि रव्याचे नक्की काय फायदे आहेत तेच आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत. 

Table of Contents

  रव्याचे पौष्टिक तत्व (Nutritional Value of Semolina In Marathi)

  Shutterstock

  आपण रव्याचे पदार्थ खात असतो पण यात नेमके कोणते पौष्टिक तत्व असतात याची आपल्याला माहिती नसते. त्यामुळे यात कोणते पौष्टिक तत्व आहेत ते जाणून घेऊया. रव्यामध्ये ऊर्जा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फायबर अशा पोषक तत्व असून यामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम आणि जिंक याचेही प्रमाण असते. तसंच यामध्ये विटामिन बी 6, विटामिन बी 12, विटामिन ए आणि विटामिन डी देखील आढळते. या सगळ्याचा आपल्या शरीरासाठी फायदा होत असल्यामुळे आपण रवा नेहमी आपल्या खाण्यामध्ये समाविष्ट करून घ्यायला हवा.

  रव्याचे फायदे (Benefits of Semolina In Marathi)

  रव्याचे अनेक फायदे आहेत. मात्र त्याची माहिती अनेक जणांना नसते. नक्की रोजच्या आयुष्यात रवा वापरल्याने काय फायदे होतात ते आपण या लेखातून पाहूया. 

  वजन घटविण्यासाठी (Weight Loss)

  Shutterstock

  तुम्हाला हे वाचल्यानंतर कदाचित आश्चर्य वाटेल. पण हो रव्याचा उपयोग तुम्ही वजन कमी करण्यासाठी करू शकता. फायबरयुक्त आहाराच्या श्रेणीत रव्याचे स्थान आहे. फायबर हे वजन कमी करण्यासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. वास्तविक फायबरयुक्त पदार्थ हे पोट जास्त वेळ भरून ठेवण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे अतिरिक्त खाणं खाल्लं जात नाही आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. रव्याचे पदार्थ खाल्ल्याने पटकन भूक लागत नाही. यामुळेच सकाळी नाश्त्यामध्ये जास्तीत जास्त रव्याच्या पदार्थांवर भर देण्यात येतो. मग तो उपमा असो, शिरा असो वा रवा डोसा, इडली. यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. 

  ऊर्जा वाढविण्यासाठी (Increases Energy)

  आपल्या शरीरातील सर्व अंग व्यवस्थित कार्यरत असतात, त्यासाठी शरीरामध्ये योग्य ऊर्जा मिळणं आवश्यक असते. त्यासाठीदेखील रव्याचा वापर करता येऊ शकतो. 100 ग्रॅम रव्यामध्ये 360 इतकी कॅलरी मिळते. त्यामुळे ऊर्जेचा स्रोत म्हणून रवा अत्यंत चांगला पर्याय आहे.

  प्रसादाचा शिरा परफेक्ट तेव्हाच होतो जेव्हा…

  मधुमेही व्यक्तींसाठी (Diabeties)

  Shutterstock

  मधुमेही व्यक्तींची जोखीम करण्यासाठीही रव्याची मदत होते. एका शास्त्रीय शोधानुसार डाईट्री फायबरच्या जास्त मात्रेमुळे ग्लाईसेमिक (साखरेशी नियंत्रणात असलेले) नियंत्रणात आणण्यास मदत होते. यामुळे टाईप 2 चा मधुमेह नियंत्रणात येण्यास मदत मिळते. त्यामुळे मधुमेही व्यक्तींनी रव्याचे पदार्थ खाणं उत्तम आहे. यामध्ये मधुमेह नियंंत्रणात आणण्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा फायदा तुमच्या शरीराला मिळतो.

  विविध शारीरिक प्रक्रियेसाठी (Various Physical Process)

  शारीरिक प्रक्रियेसाठी बऱ्याच पोषक तत्वांची आवश्यकता असते. रव्याचा फायदा यासाठी करून घेता येतो. रव्यामध्ये असलेले विटामिन बी 6 आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी बनविण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. यामुळे पेशींमध्ये वाढ होते. तसेच मेंदूचे स्वास्थ्य अधिक निरोगी बनण्यासाठीही हे प्रभावी ठरते. याशिवाय रव्यामध्ये आढळणारे फोलेट डीएनए निर्माण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे शरीरात होणाऱ्या विविध कार्यांसाठी रव्याचे पोषक तत्व फायदेशीर ठरतात आणि विविध प्रकारे शरीराला याचा लाभ होतो. 

  अधिक लोहप्राप्तीसाठी (Increases Iron)

  शरीरात अधिक लोहप्राप्ती अर्थात आयरनची कमतरता भरून काढण्यासाठी रव्याचा फायदा करून घेता येतो. कारण रव्यामध्ये लोह जास्त प्रमाणात असते. ज्याचे सेवन केल्याने तुम्हाला अनिमियासारख्या आजारापासून दूर राहण्यास मदत मिळते. यामध्ये लोह प्रमाण जास्त असल्यामुळेच याचा उपयोग नाश्त्याचे पदार्थ बनविण्यासाठी अधिक करण्यात येतो. कारण रव्याचे पदार्थ खाल्ल्याने पोट भरून राहाते आणि लोह अधिक प्रमाणात शरीरामध्ये निर्माण होण्यास मदत मिळते. 

  प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी (Immunity Power)

  Shutterstock

  रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी रवा हा एक उत्तम पदार्थ आहे. रव्यामध्ये जिंक, मॅग्नेशियम, विटामिन बी6 इत्यादी पोषक तत्व असल्यामुळे मायक्रो न्यूट्रियन्ट्स (Micronutrients) प्रमाणे कार्य करतात आणि इम्यून सिस्टिम अर्थात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फायदेशीर ठरते. सध्या आपली प्रतिकारशक्ती वाढवणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे नाश्त्यामध्ये रव्याच्या  पदार्थांचा अधिक समावेश करून घेणं योग्य आहे. 

  कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी (Control Cholesterol)

  कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवायचे असेल तर रव्यासारखा चांगला पर्याय नाही. कारण रव्यात नियासिन (विटामिन बी3) चं प्रमाण अधिक असते. एका अभ्यासात असे स्पष्ट झाले आहे की, नियासिनचे अधिक सेवन हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे रव्याचा आपल्या खाण्यामध्ये समावेश करून घेणे हे फायदेशीर ठरते. रव्यामुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण अधिक असणाऱ्यांना फायदा मिळतो आणि त्यावर नियंत्रण मिळवणे सोपे होते. त्यामुळेच बऱ्याचदा रव्याची लापशी, रव्याचा उपमा असे पदार्थ कोलेस्ट्रॉल असणाऱ्या रूग्णांना देण्यात येतात.

  अनिमियापासून वाचविण्यासाठी (To Save From Anemia)

  अनिमिया होण्याचा सर्वात जास्त धोका हा गर्भवती महिलांना असतो. अनिमिया असल्यास, लाल रक्तपेशी निर्माण होण्यास बाधा येते. त्यामुळे शरीराला ऑक्सिजन योग्य प्रकारे पोहचू शकत नाही. पण रवा खाण्याने अनिमियापासून तुम्हाला स्वतःला वाचवता येतो कारण यामध्ये जास्त प्रमाणात आयरन असल्याने अनिमियापासून संरक्षण मिळते. आयरन लाल पेशी वाढविण्यास उपयुक्त ठरते आणि अनिमियापासून दूर ठेवते. त्यामुळे गर्भवती महिलांनादेखील गर्भारपणाच्या काळात रव्याचे पदार्थ दिले जातात. इतकेच नाही तर अगदी मुलाला जन्म दिल्यानंतरही रवा पचण्यास हलका असल्याने आणि त्याचा शरीराला फायदा असल्याने त्याचे पदार्थ खायला देण्यात येतात. गरोदरपणाच्या काळात अनिमियाचा धोका जास्त असल्याने रव्यामुळे यावर नियंत्रण ठेवता येते. 

  कुरकुरीत रवा डोसा बनवा 10 मिनिट्समध्ये, सकाळचा स्वादिष्ट नाश्ता

  संतुलित आहार स्वरूपात (Balanced Diet)

  Shutterstock

  रव्याचा उपयोग संतुलित आहार स्वरूपातही करून घेता येतो. वास्तविक संतुलित आहार आणि निरोगी शरीरासाठी कार्बोहायड्रेट आवश्यक मानले जाते. अशावेळी मस्तिष्क, तंत्रिका तंत्र आणि किडनीसह काही महत्त्वपूर्ण अंगासाठी उर्जेचे स्रोत म्हणून रवा चांगला फायदेशीर ठरतो. त्यासाठी तुम्ही रव्याचा उपयोग करून घेऊ शकता. अचानक भूक लागल्यानंतर रव्याचे पदार्थ पटकन खाणे उत्तम. त्यामुळे घरात रव्याचे लाडू अथवा रवा भाजून ठेवल्यास, पटकन रव्याचा शिरा वा उपमा बनवून खाता येतो. रवा हा उत्तम संतुलित आहार म्हणून उपयोगात आणता येतो.

  अँटिऑक्सिडंट (Antioxidant)

  रवा हा अँटिऑक्सिडंट्सप्रमाणे कार्य करतो. वास्तविक रव्यामध्ये सेलेनियम नावाचे पोषक तत्व आढळते जे कॅन्सरला रोखण्याचे काम करते आणि त्याचबरोबर शरीरातील हानिकारक पदार्थांचा विषारी प्रभाव रोखण्यासाठीही याची मदत होते. याशिवाय सेलेनियम तुमच्या शरीरामध्ये विशेष प्रोटीन तयार करायचे कामही करते ज्याला अँटिऑक्सिडंट एंजाईम असं म्हटलं जातं. त्यामुळे रव्याचा उपयोग अँटिऑक्सिडंट म्हणूनही आपल्या शरीरासाठी होतो. रवा हा आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त असून एखाद्या औषधाप्रमाणेच शरीर निरोगी राखण्यासाठी याचा उपयोग अर्थात फायदा आपल्याला होतो. 

  रवा कसा वापरावा? (How To Use Semolina In Marathi)

  Shutterstock

  आपल्याला रवा कसा वापरायचा म्हणजे खाद्यपदार्थ म्हणून वापरायचा असतो ते माहीत आहेच. पण त्याचा नक्की कोणत्या गोष्टींसाठी उपयोग करून घेता येतो ते आपण पाहूया. रवा हा शरीरासाठी थंडावा देणारा पदार्थ आहे. यामुळे शरीरातील उष्णता वाढत नाही. तर ज्यांचे शरीर अधिक उष्ण प्रकृतीचे आहे त्यांनी रवा खाणे योग्य ठरते. आपण रवा विविध स्वरूपात खाऊ शकतो.  

  • रव्याचा हलवा अर्थात शिरा 
  • रव्याचे आप्पे सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवणं अत्यंत सोपं आहे
  • रव्याची बर्फी तुम्ही करून खाऊ शकता
  • रव्याचा उपमा
  • रव्याचा लाडू
  • सकाळच्या नाश्त्यामध्ये रवा डोसा अथवा रवा इडलीदेखील तुम्हाला फायदेशीर ठरू शकते

  कधी वापरावा - तुम्ही सकाळी आणि संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये रव्याचे पदार्थ करून खाऊ शकता. तुम्हाला याने कोणतीही बाधा होत नाही. 

  किती वापरावा - आठवड्यातून दोन ते तीन वेळाच तुम्ही रव्याच्या पदार्थांचा वापर करावा. एका वेळी साधारण 50-100 ग्रॅम इतकाच रवा तुम्ही खावा. रव्याचा अति वापरही तुम्ही तुमच्या खाण्यात करू नये. डॉक्टरांचा योग्य सल्ला आहाराच्या बाबतीत घ्यावा आणि त्यानंतरच खावे. 

  चविष्ट उपमा बनविण्यासाठी रवा आणि पाण्याचे प्रमाण असावे योग्य

  रव्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Semolina In Marathi)

  रव्याचे सेवन योग्य प्रमाणात न केल्यास त्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. याचे नक्की काय दुष्परिणाम होतात ते पाहूया 

  • रवा अधिक खाल्ल्यास यातील फायबरमुळे पोट फुगण्याची शक्यता असते. तसेच सूज आणि पोट आळवते आणि त्यामुळे पोटदुखी होऊ शकते
  • रवा खाण्यापूर्वी व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ करून घ्या. कारण यामध्ये बऱ्याचदा लहान लहान दगड असतात ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. अन्यथा कधी कधी जास्त वेळ राहिल्यास यात अळ्याही होतात. त्यामुळे रवा व्यवस्थित बघून घ्या. यामुळे पोटाला नुकसान होऊ शकते. 
  • रव्यामध्ये अधिक प्रमाणात फॉस्फरस असते. त्यामुळे अधिक सेवन केल्यास, शरीरामध्ये फॉस्फरस वाढते आणि किडनीचा त्रास असणाऱ्या लोकांना याचा तोटा होऊ शकतो. 
  • रव्यामध्ये फोलेटचं प्रमाण अधिक आहे त्यामुळे अधिक खाल्ल्यास, पोटात दुखणे, झोप न येणे आणि डायरियासारख्या समस्यांना सामोरं जावं लागतं. 

  प्रश्नोत्तरे (FAQs)

  1. रवा कशापासून तयार होतो?

  रवा हा गव्हापासून बनवण्यात येतो. मात्र गव्हातील गुण रव्यामध्ये उतरत नाहीत. पण रव्याचे स्वतःचे असे वेगळे पौष्टिक गुण मात्र असतात.

  2. लहान बाळासाठी रवा योग्य आहे का?

  रवा हा पचायला हलका असतो त्यामुळे सहा महिन्यांनंतर बाळाला रव्याची लापशी अथवा दुधातून थोड्या थोड्या प्रमाणात रवा दिला जातो. ते बाळासाठी नक्कीच योग्य आहे. मात्र याचं प्रमाण डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ठरवावे. कारण बाळाची प्रकृती ही अत्यंत नाजूक असते.

  3. कणकेपेक्षा रवा अधिक चांगला आहे का?

  कणीक आणि रवा या दोन्हीचे गुणधर्म वेगवेगळे आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा शरीरासाठी वेगळा फायदा होतो. यामध्ये कणकेपेक्षा रवा अधिक चांगला असे सांगता येत नाही. दोन्ही शरीरासाठी नक्कीच उपयुक्त आहेत.