पावसाळ्याच्या दिवसात त्वचेची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं. या दिवसात केवळ चेहरा धुतल्याने काहीही होत नाही. हवेमध्ये सतत दमटपणा असतो त्यामुळे आपल्या त्वचेवर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सतत दमटपणा असल्याने चेहऱ्यावर तेल दाटण्याची आणि त्यामुळे मुरूमं येण्याची शक्यताही असते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात त्वचेला इन्फेक्शनमुक्त ठेवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी वाफ घेणं आवश्यक आहे. यामुळे त्वचा अधिक निरोगी राहते आणि चेहऱ्यावर तजेलदारपणा कायम राहातो. तसंच तुम्हाला नियमित चमकदार त्वचा हवी असेल आणि चेहऱ्यावर इन्फेक्शन नको असेल तर वाफ घेणं हा उत्तम पर्याय आहे. पावसाळ्यात वाफ घेण्याचे काय फायदे आहेत ते आपण पाहूया.
पावसाळ्यात वाफ घेण्याचे अनेक फायदे असतात. 10-20 मिनिट्स जरी तुम्ही वाफ घेतली तरी चेहऱ्यावरील पोअर्स ओपन होतात आणि त्यामुळे चेहऱ्यावर जमलेली माती आणि धूळीकण निघण्यास मदत मिळते. पावसाळ्याच्या दिवसात त्वचेवरील पोअर्स बंद होणं ही अत्यंत साधारण गोष्ट आहे. पण वाफ घेऊन त्वचेवर होणारे इन्फेक्शन आपण कमी करू शकतो आणि वाफ घेतल्याने तुम्हाला त्वचा अधिक चमकदार राखण्यास मदत मिळते. तसंच वाफ घेतल्याने त्वचेवरील सीबम आणि डेड स्किन निघून जाण्यास मदत मिळते. रक्तप्रवाह सुरळीत होतो ज्यामुळे त्वचा अधिक तजेलदार होते.
फेस स्टीम अर्थात चेहऱ्यावर वाफ घेण्यासाठी तुम्ही बाऊल अथवा स्टीमरचा वापर करू शकता. त्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईल अर्थात नीम, थाईम, दालचिनी, ओरेगॅनो, लवंग अथवा पुदीना याचा वापर करा जेणेकरून तुमची त्चचा अधिक चमकदार होईल. वाफ घेण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कोणत्या गोष्टींचा वापर करू शकता ते पाहूया.
तुमची त्वचा संवेदनशील असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर वाफ देण्यासाठी गरम टॉवेलचा वापर करू शकता. एक कॉटन टॉवेल घ्या. पाण्यामध्ये भिजवा आणि पिळून घ्या. चेहऱ्यावर ठेवा आणि थोडं रिलॅक्स राहा अर्थात पडून राहा. तुम्हाला हवं असल्यास पाण्यात तुमच्या आवडीचं इसेन्शियल ऑईल मिक्स करा आणि त्याचा वापर करा.
चेहऱ्यावर वाफ अधिक चांगली घेण्यासाठी तुम्ही इसेन्शियल ऑईलच्या जागी हर्ब्सचा वापर करू शकता. हर्ब्स वापरल्याने तुम्हाला चेहऱ्यावर अधिक चांगली चमक बघायला मिळते. मुळात हे नैसर्गिक असल्याने तुम्हाला चेहऱ्यावर कोणतेही नुकसान पोहचत नाही.
ग्रीन टी चा उपयोग केवळ आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही तितकाच होतो. ग्रीन टी आणि पेपरमिंट एकत्र करून तुम्ही याचा उपयोग वाफ घेण्यासाठी करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक तजेला कायम राहातो.
सणासुदीला मिळवायचा असेल चमकदार चेहरा तर करा वाफेचा उपयोग (Steam For Glowing Skin)
त्वचेसाठी वाफ घेणं गरजेचे आहे. पण वाफ घेण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवा.