केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

केसांचे आरोग्य राखण्यासाठी ट्राय करा हे सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate Free Shampoo)

केसांवर केमिकल्सचा वापर कमी व्हावा यासाठी तुम्ही सल्फेट फ्री (Sulphate free) शॅम्पूच्या शोधात आहात का? मग आता केसांची चिंता काळजी करणं सोडून द्या. कारण आम्ही तुमच्यासोबत जगभरातील बेस्ट सल्फेट फ्री शॅम्पू (Best Sulphate free shampoo)  शेअर करत आहोत. धुळ, प्रदूषणाचा सतत होत असलेला मारा आणि केसांवर केलेल्या निरनिराळ्या ब्युटी ट्रिटमेंट्स यामुळे तुमचे केस आतून कमजोर होतात. बाजारात केस स्वच्छ करण्यासाठी विकण्यात येणाऱ्या अनेक शॅम्पूमध्ये हानिकारक केमिकल्सचा वापर केलेला असतो. या शॅंम्पूमधील सोडियम लॉयर्ल सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) हे केमिकल केसांना सहन न झाल्याने ते अधिकच तुटू लागतात आणि निस्तेज दिसतात. कारण अशा हार्श केमिकल्समुळे तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाते. सहाजिकच तुमच्या अशा केविलवाण्या केसांना गरज असते थोडंसं प्रेम आणि केमिकल फ्री सौंदर्यप्रसाधनांची. म्हणूनच आम्ही तुमच्यासोबत असे काही शॅंम्पू शेअर करत आहोत जे सल्फेट फ्री नक्कीच आहेत. 

Table of Contents

  The Body Shop Rainforest Shine Shampoo

  बॉडी शॉपचा हा सल्फेट फ्री शॅम्पू नॉर्मल पासून अगदी ड्राय केसांपर्यंत सर्व प्रकारच्या केसांसाठी उत्तम आहे. हा शॅम्पू जेल बेस असल्यामुळे त्यामुळे तुमचे केस व्यवस्थित स्वच्छ होतात. शिवाय यामध्ये कंडिशनिंग ऑईलचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे केस धुतल्यानंतरही तुमचे केस मऊ आणि मुलायम राहतात. 

  फायदे -

  • केस मऊ आणि मुलायम होतात
  • केसांना धुतल्यानंतर मॅनेज करणं सोपं जातं
  • केसांसाठी उत्तम मॉश्चराईझर आहे
  • केसांना एक नैसर्गिक चमक येते
  • सिलिकॉन, पेराबेन आणि कॉलोरंटचा वापर करण्यात  आलेला नाही.

  तोटे -

  • हा शॅम्पू महागडा आहे

  Hair

  The Body Shop Rainforest Moisture Shampoo for Dry Hair

  INR 2,099 AT The Body Shop

  Aveeno Aveeno Active Naturals Pure Renewal Shampoo

  या शॅंम्पूमध्ये अनेक अशा नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे ज्यामुळे तुमचे फ्रेश आणि चमकदार दिसू लागतात. शिवाय यामध्ये न्यट्रासर्फ टेक्नॉलॉजिचा फॉर्म्युला वापर करण्यात आलेला आहे. ज्यामुळे तुमचे केस स्वच्छ तर होतात पण तुमच्या केसांमधील नैसर्गिक तेल निघून जात नाही.

  फायदे -

  • स्काल्प ऑईल फ्री राहतो
  • सौम्य शॅम्पू असल्यामुळे केसांचे नुकसान होत नाही
  • केसांना शाईन येते
  • केसांचा व्हॉल्यूम वाढतो
  • केस व्यवस्थित स्वच्छ होतात
  • कलर केलेल्या केसांसाठीदेखील वापरता येतो

  तोटे -

  • हा शॅम्पू महागडा आहे

  Beauty

  Aveeno Active Naturals Pure Renewal Shampoo

  INR 4,199 AT Aveeno

  Organix Hydrating Macadamia Oil Shampoo

  ऑर्गनिक्सच्या हा सल्फेट फ्री शॅम्पू ड्राय आणि डॅमेज केसांसाठी सोयीचा आहे. कारण यामध्ये नारळाचे तेल, अॅव्होकॅडोचे तेल, मॅकाडॅमिया, ऊस, बांबू आणि कोरफड यासारख्या नैसर्गिक घटकांचे उत्तम मिश्रण वापरण्यात आलेले आहे.  त्यामुळे जर तुमचे केस फारच कोरडे असतील तर तुमच्यासाठी हा सल्फेट फ्री शॅंम्पू बेस्टच आहे. 

  फायदे -

  • कोरडे केस मऊ आणि मुलायम होतात
  • जास्त प्रमाणात वापण्याची गरज नाही
  • फ्रिझी केसांसाठी उत्तम
  • कर्ली केसांना मॅनेज करता येते

  तोटे - 

  • महागडे उत्पादन आहे
  • सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त नाही

  Organix Hydrating Macadamia Oil Shampoo

  INR 715 AT Organix

  Giovanni Organic Root 66 Max Volume

  जर तुम्हाला केसांना छान व्हॉल्युम मिळावा असं वाटत असेल तर हा शॅंम्पू सल्फेट फ्री असूनही तुमच्या सोयीचे नक्कीच आहे. कारण यामुळे तुमच्या केसांचे नुकसान न होता तुम्हाला छान बाऊंसी केस मिळू शकतात. शिवाय या शॅम्पूच्या उत्पादनासाठी प्राण्यांचा वापर न केल्यामुळे ते पूर्ण पणे वेगन आहे. यात कोरफडाचा रस, किवीचा  गर, पपईचा गर, आंब्याचा गर अशा नैसर्गिक घटकांचा वापर करण्यात आलेला आहे.


  फायदे -

  • केसांचा व्हॉल्युम वाढतो
  • स्वस्त उत्पादन आहे
  • केसांचे आरोग्य सुधारते
  • गुंता कमी झाल्यामुळे केस नैसर्गिक पद्धतीने सरळ दिसतात
  • केसांचे नुकसान कमी होते
  • कलर केसांसाठी उपयुक्त
  • वेगन उत्पादन आहे
  • खर्चिक नाही 

  तोटे -

  • उत्पादन सहज मिळणे शक्य नाही

  Giovanni Organic Root 66 Max Volume Shampoo

  INR 595 AT Giovanni

  StBotanica Activated Charcoal Hair Shampoo

  या शॅंम्पूमध्ये चारकोल, ऑलिव्ह ऑईल आणि बदामाच्या तेलाचा वापर करण्यात  आलेला आहे. ज्यामुळे तुमचे केस स्वच्छ तर होतातच शिवाय तुमच्या केसांना नैसर्गिक चमकदेखील मिळू शकते. जर तुम्ही एका परफेक्ट सल्फेट फ्री शॅम्पूच्या शोधात असाल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण यामुळे तुमचे कोरडे, निस्तेज आणि डिहायड्रेट झालेले केस पुन्हा मजबूत आणि चमकदार होऊ शकतात. 

  फायदे -

  • केसांना व्हॉल्युम मिळतो
  • केस जास्त उत्तमरित्या मॅनेज करता येतात
  • केसांना नैसर्गिक सुंगध मिळतो
  • केसांची वाढ चांगली होते
  • केस मऊ आणि मुलायम होतात

  तोटे -

  • सर्व प्रकारच्या केसांसाठी उत्तम नाही

  Beauty

  St Botanica Activated Charcoal Hair Shampoo

  INR 499 AT St Botanica

  Wella Elements Renewing Shampoo

  जर तुम्हाला सलॉन इफेक्ट हवा असेल तर हा सल्फेट फ्री शॅंम्पू तुम्ही वापरू शकता. यामध्ये वेला प्रोफेशनल्सनी न्यूट्री कॉम्प्लेक्स फॉर्म्युला वापरला आहे ज्यामुळे तुमच्या केसांचे अधिक संरक्षण होऊ शकते. हा शॅम्पू खास कोरड्या केसांसाठी तयार करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे हे क्रीम स्वरूपात असल्यामुळे तुमच्या केसांना एक छान सॉफ्टनेस मिळतो. 

  फायदे -

  • खूप काळ परिणाम टिकतो
  • केसांना सुंदर सुगंध मिळतो
  • केस त्वरीत मऊ होतात
  • कोरडे केस मजबूत होतात
  • केसांना मॅनेज करणे सोपे 

  तोटे -

  • सहज उपलब्ध नाही
  • महागडे उत्पादन आहे

  Beauty

  Wella Elements Renewing Shampoo

  INR 999 AT Wella

  Schwarzkopf Bonacure Color Freeze Hair Therapy Shampoo

  जर तुम्ही तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी आणि  दररोज वापण्यासाठी एखाद्या चांगल्या सल्फेट फ्री शॅम्पूच्या शोधात असाल तर हा शॅम्पू तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. कारण हा सर्व प्रकारच्या केसांसाठी उपयुक्त आहे. शिवाय पुरूष आणि महिला अशा दोघांच्याही उपयोगाचा आहे. यात रिठा, शिकेकाई, आवळा, कडुलिंब, लिंबू, ब्राम्ही, तुळस, मेथी, मेंदी अशा आर्युवेदिक घटकांचा वापर केलेला आहे.

  फायदे -

  • आयुर्वेदिक उत्पादन आहे
  • केमिकल्स फ्री असल्यामुळे तुमच्या केसांचे नुकसान होत नाही
  • कलर केलेल्या आणि फ्रिझी केसांसाठी उत्तम
  • पुरूष आणि महिलांसाठी उपयोगी

  तोटे -

  • सहज उपलब्ध नाही
  • खास महिलांसाठी तयार केलेले नाही

  Beauty

  Schwarzkopf Bonacure Color Freeze Hair Therapy Shampoo

  INR 800 AT Schwarzkopf Bonacure

  L'Oréal Paris EverFresh Anti Dandruff Shampoo Sulfate Free

  केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या आजकाल अनेकांचा जाणवत असते. मात्र बऱ्याचदा कोंडा कमी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त शॅम्पूमुळे तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. यासाठी सल्फेट फ्री अॅंटि डॅंड्रफ शॅंम्पूचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होऊ शकतों. लॉरिअर कंपनीने तुमच्या गरजांचा विचार करूनच हे उत्पादन तयार केलेले आहे.

  फायदे -

  • केसांमधील कोंडा कमी होतो
  • केसांचे नुकसान कमी होते
  • स्काल्पचे आरोग्य सुधारते
  • इतर केमिकल्सचा वापर केलेला नाही

  तोटे - 

  • फक्त कोंडा झालेल्या केसांसाठीच उपयोगी
  • वापरण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक

  Beauty

  L'Oréal Paris EverFresh Anti Dandruff Shampoo Sulfate Free

  INR 1,288 AT L'Oréal

  Biotique Bio Green Apple Fresh Daily Purifying Shampoo

  बायोटिक कंपनीचा हा शॅम्पू तुमच्या केसांच्या स्वच्छतेसाठी सुरक्षित आहे. कारण यामध्ये ग्रीन अॅपल, नारळाचे तेल, बदामाचे तेल, शिकेकाई, हिमालयातील शुद्ध पाणी अशा  अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यात आलेला आहे. ज्यांची त्वचा तेलकट आहे अशा लोकांसाठी हा एक उत्तम सल्फेट फ्री शॅम्पू आहे. कारण त्यामुळे तुमच्या स्काल्पवरील नैसर्गिक तेल काढून टाकले जात नाही. शिवाय हा शॅंम्पू तुम्हाला भारतात कुठेही सहज मिळू शकतो.

  फायदे -

  • तेलकट केसांसाठी उपयुक्त
  • केसांमधील नैसर्गिक तेल टिकून ठेवण्यास मदत होते
  • केस व्यवस्थित स्वच्छ होतात
  • सहज उपलब्ध 
  • महागडे नाही

  तोटे- 

  • अती प्रमाणात वापरल्यास केस कोरडे होण्याची शक्यता 

  Hair

  Biotique Bio Green Apple Fresh Daily Purifying Shampoo And Conditioner, 190ml

  INR 135 AT Biotique

  Kerastase Discipline Bain Fluidealiste Shampoo Sulfate-Free

  हा शॅम्पू खास त्या लोकांच्या केसांसाठी तयार करण्यात आलेला आहे ज्यांचे केस कधीच मॅनेज होत नाहीत. कारण या शॅम्पूमुळे केस व्यवस्थित स्वच्छ होतात शिवाय मऊदेखील होतात. ज्यामुळे तुमच्या केसांवर कोणतीही स्टाईल करणं सोपं जाऊ शकतं. शिवाय यामध्ये अशा काही फॉर्म्युलाचा वापर केला गेला आहे ज्यामुळे तुमचे केस अधिक लवचित आणि मजबूत होतात.

  फायदे -

  • भरपूर फेस निर्माण होतो
  • केसांचे आर्द्रतेपासून रक्षण होते
  • केसांना फाटे फुटणे कमी होते
  • कमी प्रमाणात वापरता येते
  • केसांना शाईन मिळते
  • कंडिशनर शिवाय वापरता येते

  तोटे -

  महागडे आहे

  • सिलिकॉनचा काही प्रमाणात वापर केलेला आहे

  Beauty

  Kerastase Discipline Bain Fluidealiste Shampoo Sulfate-Free

  INR 4,000 AT Kerastase

  सल्फेट फ्री शॅम्पूबाबत मनात असलेले काही निवडक प्रश्न- FAQs

  शॅम्पूमधील सल्फेट म्हणजे नेमके काय ?

  बाजारातील केमिकलयुक्त शॅंम्पूमध्ये सोडियम लॉयर्ल सल्फेट (Sodium Lauryl Sulfate) वापरण्यात येते. सल्फेट हे एक क्लिंझिंग असल्यामुळे तुमचे केस स्वच्छ होण्यास मदत होते. मात्र सल्फेटच्या अती माऱ्यामुळे तुमच्या केस आणि त्वचेचं नुकसान होऊ शकतं. कारण त्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांवरील नैसर्गिक तेल पूर्णपणे निघून जातं.

  शॅम्पूमधील सल्फेट आरोग्यासाठी हानिकारक असते का ?

  तुम्ही किती प्रमाणात सल्फेट युक्त अथवा केमिकल युक्त उत्पादने वापरता यावर हे अवलंबून आहे. कारण याचा अती वापर केल्यामुळे तुमच्या डोळे, त्वचेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. म्हणूनच आजकाल मोठ्या प्रमाणावर सल्फेट फ्री उत्पादने वापरण्यावर भर दिला जात आहे. 

  सल्फेट फ्री शॅम्पू दररोज वापरता येऊ शकतात का ?

  जर तुम्हाला नियमित केस धुत असाल तर ते केसांच्या आरोग्यासाठी नक्कीच योग नाही. आठवड्यातून तीन ते चार वेळा केस धुवावेत. ज्यामुळे त्यांचे जास्त नुकसान होत नाही. मात्र सल्फेट फ्री शॅंम्पू नियमित वापरण्यास काहीच हरकत नाही. कारण त्यामध्ये केसांच्या आरोग्यासाठी कोणतेही हानिकारक घटक नक्कीच नसतात.