ADVERTISEMENT
home / Season 11
#WomenisPower – निर्माता विकास गुप्ताने केली पहिली #pride पोस्ट

#WomenisPower – निर्माता विकास गुप्ताने केली पहिली #pride पोस्ट

बिग बॉस 11 फेम विकास गुप्ता गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुशांत सिंह राजपूतने केलेल्या  आत्महत्येनंतर विकासने आपल्याला झालेला त्रास सोशल मीडियावर सांगितला. तसंच आपण #bisexual असल्याचंही मान्य केलं. सध्या #prideweek चालू असल्याने विकास गुप्ताने आपली पहिली #pride पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली असून #WomenisPower असा हॅशटॅग वापरला आहे. विकासने अतिशय संवेदनशीलतेने आपल्या भावना व्यक्त करत कोणालाही ‘जनानी’ म्हणण्यापूर्वी आपल्याला जिने जन्म दिला तीदेखील जननी आहे हे लक्षात घ्या असे परखड शब्दात सांगितलं आहे. तसंच आपल्याला आलेला लहानपणापासूनचा अनुभव त्याने अत्यंत परखड शब्दात मांडत समाजाला एक प्रकारे चपराकच लगावली आहे. 

जाणून घ्या जुलै महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती असतात तरी कशा

शाळेपासून विकासला झाला त्रास

विकासने #pride पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला आहे. यामध्ये विकासने म्हटले आहे की, ‘मी लहान असल्यापासून माझे वरीष्ठ, माझ्या शाळेतील मुलं मला नेहमी चिडवायची. जेव्हा मी सुट्टीत घरी यायचो तेव्हा कॉलनीतली मुलं इतकंच काय मोठ्या मुलीदेखील मला बोलायच्या. माझे हात कसे मुलींसारखे आहेत, ओठ मुलींसारखे आहेत. मी कसा मुलींसारखा घाबरून  राहतो आणि मला भांडतादेखील येत नाही आणि मला माझ्या तोंडावर जनानीसारखा आहे असं म्हणून हसून निघून जायचे. तेव्हापासून मला मुली म्हणजे अगदीच बिचाऱ्या वाटायच्या आणि मला खूप त्रास व्हायचा मला असं लोक बोलतात म्हणून पण हे सर्व तोपर्यंतच टिकलं जोपर्यंत मी बालाजीटेलिफिल्मच्या ५ व्या मजल्यावरच्या ऑफिसमध्ये एकता कपूरला भेटलो नाही. तिला भेटल्यानंतर #womenpower काय आहे ते मला जाणवलं. ज्या ज्या लोकांनी मला ट्रोल केलं आणि मला जनानी म्हटलं त्यांना मी हेच सांगू इच्छितो की ही शिवी नाहीये तर जनानी हा गर्वाने उच्चारण्यासारखा शब्द आहे. कारण तुमची आईदेखील एक जननी आहे हे लक्षात घ्या मूर्खांनो. हा माझा अपमान नक्कीच नाही तर मला याचा गर्व आहे. आम्ही अगदी हळूवार बोलतो अथवा जिममध्ये जाण्याऐवजी गप्पागोष्टींमध्ये रमतो असा लोकांचा गैरसमज आहे. पण हा गैरसमज बिग बॉस 11 मध्ये मी दूर केला आहे. एखादा मुलगा थोडासा वेगळा आहे म्हणून तुम्ही लगेच त्याला ट्रोल करायला जाऊ नका. एखादा गे अथवा बायसेक्सुअल असेल तर त्याला स्वीकारा.’

अभिनेत्री श्वेता तिवारी पुन्हा वादात, अभिनवने केले गंभीर आरोप

ADVERTISEMENT

#WomenisPower आव्हान केले सोशल मीडियावर सुरू

इतकंच नाही तर विकासने खास टीप देत आता आपण ट्रोल्स आणि कमेंटचा परिणाम करून घेत नसून माझ्या जवळच्यांवर मात्र याचा परिणाम  होतो आणि कामावरही होतो हे सांगितलं आहे. शिवाय त्याने #WomenisPower हे आव्हान सोशल मीडियावर सुरू करून त्याचे मित्र करण कुंद्रा, अर्जुन बिजलानी आणि रवी दुबे यांना टॅग करत त्यांचे अनुभव शेअर करण्यासही सांगितले आहे. तसंच स्त्री असणं ही कमतरता नाही हे बाकीच्यांनाही दाखवून द्या आणि या आव्हानात इतरांनाही सहभागी करून घ्या अशी विनंतीही त्याने सोशल मीडियावरून केली आहे. 

कोरोनाच्या काळातही चित्रपट होणार रिलीज, पण या ठिकाणी

अभिनेता पार्थ, प्रियांक शर्मा आणि शिल्पा शिंदेने होते विरोधात

विकास गुप्ताच्या बायसेक्सुअल असण्यावर अभिनेता पार्थ समाथान, प्रियांक शर्मा आणि शिल्पा शिंदेने खूपच झोड उठवली होती. त्यानंतर विकासने समाजासमोर आपण जसे आहोत तसे स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि आता त्याला बऱ्याच जणांचा पाठिंंबाही मिळत आहे. विकासचे या क्षेत्रात अनेक मित्रमैत्रिणी असून त्यांनी त्याला तो जसा आहे तसा स्वीकारले आहे. मात्र त्याला काही लोकांकडून खूपच त्रास झाल्यानंतर आता त्याने स्वतःला बदलायचे ठरवले असून आपण जसे आहोत तसे समाजासमोर यायचे ठरवले आहे. 

01 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT