लग्नाची साडी अथवा लेहंग्याची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स

लग्नाची साडी अथवा लेहंग्याची निगा राखण्यासाठी सोप्या टिप्स


प्रत्येक उपवर मुलामुलींचे एक स्वप्न असते. त्यांचा लग्नसोहळा थाटामाटात आणि अविस्मरणीय व्हावा. लग्नाची तयारी करण्यापूर्वी यासाठी अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेतली जाते. लग्नाचा मंडप, डेकोरेशन, कॅटरिंग याप्रमाणेच लग्नसमारंभात नवरा-नवरीचा लुक ही लोकांच्या नेहमीच लक्षात राहतो. यात प्रामुख्याने नवरीच्या साडी अथवा लेहंगा, दागदागिने, मेकअपची सर्वात जास्त चर्चा असते. सहाजिकच प्रत्येक नववधूला लग्नात डिझायनर आणि ब्रॅंडेड ब्रायडल आऊटफीटच हवे असतात. मात्र असे ब्रायडल आऊटफीट वजनाला अतिशय जड आणि महागडेदेखील असतात. ज्यामुळे लग्नानंतर त्याचा अगदी क्वचित पुर्नवापर केला जातो. लग्नाचे कपडे म्हणजेच ब्रायडल आऊटफीट प्रत्येकासाठी नेहमीच खास असतात. म्हणूनच ते वर्षांनूवर्ष टिकावेत आणि सततत नव्यासारखे, चमकदार दिसावेत असं प्रत्येकाला वाटत असतं. म्हणूनच तुमच्या ब्रायडल आऊटफीटची काळजी घेण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स.

कपाटात ठेवण्यापूर्वी आऊटफीट्स ड्रायक्लीन करा -

लग्नात पूर्ण दिवसभर तुम्ही ब्रायडल आऊटफीट्स परिधान केलेले असतात. म्हणूनच लग्नसोहळ्यानंतर अथवा केव्हाही ते वापरल्यानंतर ते तसेच कपाटात ठेवू नका. कपाटात ठेवण्यापूर्वी ते एकदा ड्रायक्लीन जरूर करा. ज्यामुळे लग्नातील विधींमध्ये जर चुकून त्यावर काही डाग लागले असतील तर ते निघून जातील. शिवाय वापरल्यामुळे येणारा घामाचा वासही निघून जाईल. मात्र लक्षात ठेवा गरज नसताना सतत सिल्क अथवा डिझायनर कपडे कधीच ड्रायक्लीन करू नयेत. सतत ड्रायक्लीन केल्यामुळे त्यांच्यावरील चमक निघून जाऊ शकते. असे मौल्यवान कपडे ड्रायक्लीन करण्यासाठी एखाद्या योग्य ड्रायक्लीनरकडेच द्यावेत. याबाबत महत्त्वाच्या सूचना तुमच्या आऊटफीट्सला लावलेल्या लेबलवर दिलेल्या असतात. ज्या फॉलो करणं यासाठी गरजेचं आहे. 

Instagram

ब्रायडल आऊटफीटवरील वर्क वेळीच दुरूस्त करा -

बऱ्याचदा लग्नाच्या साड्या अथवा लेहंग्यावर जरीवर्क अथवा डिझायनर वर्क केलेलं असतं. याप्रकारचे वर्क हे हाताने अथवा मशिनवर अगदी नाजूक पद्धतीने केलेलं असतं. मात्र लग्नानंतर सतत कपाटात ठेवून दिल्यामुळे अथवा क्वचित प्रसंगी या आऊटफीटचा वापर केल्यामुळे ते खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच वेळोवळी कारागिराकडून हे वर्क दुरूस्त करून घ्या. ज्यामुळे तुमचे ब्रायडल आऊटफीट नेहमीच सुंदर दिसतील. 

Instagram

ब्रायडल साडीची अशी घ्या काळजी -

लग्नविधीत साडी निरनिराळ्या विधींसाठी वापरली जाते. ज्यामुळे तुमच्या मुख्य ब्रायडल आऊटफीटसोबतच अनेक साड्या लग्नात विधींसाठी खरेदी केल्या जातात. या साड्या प्रामुख्याने सिल्कच्या आणि हेव्ही वर्कच्या असतात. बनारसी शालू, पैठणी अशा प्रकारात मोडणाऱ्या सतत नेसल्या जात नाहीत आणि सतत कपाटात ठेवून खराब होण्याची शक्यता असते. म्हणूनच महिन्यातून अथवा दोन महिन्यातून एकदा त्यांना फॅनखाली अथवा मोकळ्य, हवेशीर जागी ओपन करून ठेवा. शिवाय पुन्हा त्या कपाटात ठेवताना त्या उलट दिशेने घडी करून ठेवा. ज्यामुळे त्या घडीवर खराब होणार नाहीत. शिवाय अशा साड्यांना एखाद्या सुती अथा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. ज्यामुळे त्यांना मोकळी हवा मिळेल.

दमटजागी ब्रायडल आऊटफीट ठेवल्यामुळे होऊ शकतं नुकसान -

कपाट अथवा वॉर्डरोबमध्ये कोंडून ठेवल्यामुळे अथवा दमटपणामुळे अशा कपड्यांना फंगस अथवा बुरशी येण्याची शक्यता असते. विशेषतः पावसाळ्यात या कपड्यांची काळजी घेणं फार गरजेचं असतं. म्हणूनच पावसाळ्या या कपड्यांना कोरड्या आणि  हवेशीर जागी ठेवा. ज्यामुळे ते खराब होणार नाहीत. 

ब्राडडल आऊटफीटचा पुर्नवापर करा -

जर तुम्हाला लग्नातील साडी अथवा लेहंगा पुन्हा वापरणं शक्य नसेल. तर त्याचा पुर्नवापर करण्यासाठी त्यापासून एखादा ड्रेस अथवा वस्तू तयार तयार करा. ज्यामुळे ते पुन्हा वापरले जातील. 

Instagram