बर्गर, पिझ्झासारखे फास्ट फुड खाण्याची का होते इच्छा, जाणून घ्या कारण

बर्गर, पिझ्झासारखे फास्ट फुड खाण्याची का होते इच्छा, जाणून घ्या कारण

आपल्याला रोजच एखादी गोष्ट सतत खाण्याची इच्छा होत असेल तर एक तर आपण एखाद्या पदार्थाच्या फारच आहारी गेलो आहेत असे समजून जावे. पण एखाद्या पदार्थाची चटक आपल्याला लागते तरी कशी किंवा तोच पदार्थ सतत का खावासा वाटतो. यामागेही काही कारणे आहेत. प्रत्येक पदार्थ खाण्याची इच्छा तुमच्या शरीरात कशाची कमतरता आहे ते दाखवून देत असते. जर तुम्हाला सतत बर्ग , पिझ्झासारखे फास्ट फुड खाण्याची इच्छा होत असेल तर त्यामागे नेमके काय कारण आहे ते आज जाणून घेऊया म्हणजे तुम्हाला अशा खाद्यपदार्थांचे क्रेव्हिंग कमी करता येईल.

रीठा वापरून घरीच तयार करा आयुर्वेदिक शॅंम्पू आणि कंडिशनर

 

शरीरात फायबरचे प्रमाण कमी

तुमचे पोट भरलेले असेल तर तुम्हाला काहीही खाण्याची इच्छा फार लगेच होत नाही. तुमच्या जीभेला जरी काही खावेसे वाटत असले तरी तुमचे पोट या खाद्यपदार्थाला नाही म्हणते. पण जर तुमच्या शरीरातील फायबरचे प्रमाण कमी झाले असेल तर मात्र तुम्हाला तळलेले किंवा बर्गर पिझ्झासारखे पदार्थ खाण्याची इच्छा होते. जर तुम्हाला अशी नको त्यावेळी क्रेव्हिंग होत असेल तर तुम्ही त्यावेळी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करायला हवे. 

उदा. सफरचंद, केळी, कलिंगड, चिकू किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही फळांचे सेवन  तुम्ही अशा भूकेच्यावेळी करायला काहीच हरकत नाही

शरीरातील इसेंन्शिअल फॅटी अॅसिड कमी होणे

Instagram

तुमच्या शरीरासाठी फॅटही तितकेच महत्वाचे आहे. काही प्रमाणात तुम्ही त्याचे सेवन करणे फारच गरजेचे असते. तुमच्या शरीरातील फॅटी अॅसिडचे प्रमाण कमी झाले असेल तरी देखील तुम्हाला अशा पदार्थांचे सेवन करण्याची इच्छा होते. अशावेळी चीझ, बटर किंवा तळलेले चमचमीत पदार्थ खावेसे वाटतात.तुम्हाला देखील पोट भरलेले असतानाही अशा प्रकारे चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही अशावेळी साधारण मूठभर ड्रायफ्रुट खा. त्यामुळे तुमचे असे काही पदार्थ खाण्याची इच्छा नक्कीच कमी होईल. 

जाणून घ्या त्वचेवर स्कीन केअर प्रॉडक्ट लावण्याची योग्य वेळ

थकवा आणि कंटाळा

मूड चांगला असेल तरच तुम्हाला काहीतरी चांगले खाण्याची किंवा चमचमीत खाण्याची इच्छा होत नाही. तुमच्या शरीराला आलेला थकवा आणि कंटाळा देखील तुम्हाला उगाचच काहीतरी चमचमीत खाण्यासाठी प्रवृत्त करते. उदा.ऑफिसमध्ये बसल्याजागी चिप्स खाणे किंवा काहीतरी खात राहायचे म्हणून सोडिअम किंवा मीठ असलेले पदार्थ खा राहणे अनेकांचे काम असते. पण लक्षात असू द्या. असे पदार्थ खाण्याची इच्छा तुमच्या लाईफस्टाईलला दर्शवत असते. तुम्हाला आलेला कंटाळा तुम्हाला आलेला थकवा दर्शवत असतो. अशावेळी तुम्हाला काही खाण्याची नाही तर थोडे  शांत राहून विचार करण्याची गरज असते. 

वाढती अॅसिडीटी

Instagram

ज्या पद्धतीने आपल्याला गोड खाण्याची इच्छा टाळता येत नाही. अगदी त्याच पद्धतीने कधी कधी आपल्याला एखाद्या पदार्थात आबंट सॉस किंवा पिकल घालून खाण्याची इच्छा होते. जर तुम्हाला अशी इच्छा होत असेल तर याचा अर्थ आहे की, तुम्हाला अॅसिडीटीचा त्रास होत आहे. याचाच अर्थ तुमचे खाणे काही तरी गडबडले आहे. अशावेळी अॅसिडीटी वाढू न देता जर तुम्ही  गरम पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायलात तर तुम्हाला नक्कीच बरे वाटेल. 


आता जर तुम्हाला असे काही खाण्याची इच्छा होत असेल तर आधी शरीराचे संकेत ऐका. मग या पदार्थांचे सेवन तुम्ही करा.

वजन कमी करण्यासाठीही रवा ठरतो फायदेशीर, जाणून घ्या रव्याचे फायदे