राशीनुसार निवडा तुमच्या 'ब्रायडल आऊटफिट'चा रंग

राशीनुसार निवडा तुमच्या 'ब्रायडल आऊटफिट'चा रंग

लग्नाच्या साडी अथवा लेहंग्यामध्ये नेहमीच पारंपरिक रंगाची निवड केली जाते. लाल, पिवळा, हिरवा असे काही रंग लग्नकार्यासाठी शुभ मानले जातात. त्यामुळे वधुवस्त्रदेखील त्याच रंगाचे निवडले जाते. लग्नातील विविध विधींसाठी विविध रंगाच्या साड्या शुभ मानल्या जातात. मात्र प्रत्येक राशीच्या व्यक्तीसाठी काही विशिष्ठ रंगच शुभ असतात. त्यामुळे त्या राशीच्या लोकांनी शुभकार्यात अशा रंगाचा वापर करणे फायद्याचे ठरू शकते. जर तुम्हाला राशीनुसार तुमच्या वधुवस्त्रांसाठी निवड करायची असेल तर ही माहिती तुमच्या नक्कीच फायद्याची ठरू शकते. 

मेष (21 मार्च - 19 एप्रिल)

मेष राशीची नवरी तिच्या राशीच्या स्वभावानुसार धडपडी आणि धाडसी असते. सहाजिकच तिला नेहमीच काही तरी नवीन आणि आव्हानात्मक करायला आवडतं. 'लाल' रंग हा एक बोल्ड रंग आहे. त्यामुळे हा रंग तिला नक्कीच सूट होऊ शकतो. तेव्हा मेष राशीच्या नवरीने लग्नात लाल रंगाचे वधुवस्त्र नक्कीच वापरणे तिच्यासाठी शुभ ठरेल.

Instagram

वृषभ ( 20 एप्रिल - 20 मे)

वृषभ राशीच्या मुली या संवदेनशील आणि रोमॅंटिक असतात. त्यांना प्रेम, लग्न, संसार याची विशेष आवड असते. त्यामुळे त्या त्यांच्या सर्वच गोष्टींचे व्यवस्थित प्लॅनिंग करतात. अशा मुलींना प्रेमाचा गोड 'गुलाबी' रंग सूट होऊ शकतो. म्हणूनच त्यांनी लग्नासाठी गुलाबी रंगाची छटा असणाऱ्या ब्रायडल आऊटफिटची निवड करावी.

Instagram

मिथुन (21 मे - 21 जून)

मिथुन राशीच्या मुलींना गॉसिप आणि मौजमजा करण्यात फार रस असतो. त्यामुळे त्यांना आयुष्यात  सतत काहीतरी क्रेझी करण्याची ईच्छा असते. अशा मुलींच्या व्यक्तिमत्वाला 'हिरवा' रंग शोभून दिसतो. म्हणूनच मिथुन राशीच्या नवरीने  लग्नात हिरव्या रंगाची साडी अथवा लेहंगा निवडावा.

Instagram

कर्क (22 जून - 22 जुलै)

कर्क राशीच्या मुलींना नेहमीच काहीतरी नवीन अनुभव घ्यायचा असतो. शिवाय त्यांना सतत कुटुंब आणि मित्रमैत्रिणींच्यासोबत वेळ घालवायला आवडतो. अशा कुटुंबवत्सल मुली निळा, आकाशी, सी ग्रीन अशा रंगात उठावदार दिसतात.

Instagram

सिंह (23 जुलै- 22 ऑगस्ट)

सिंह राशीच्या मुली ग्लॅमरस आणि श्रीमंत असतात. त्यांना सतत सर्वांमध्ये उठून दिसायचे असते. प्रेम, लग्न अशा गोष्टींसाठी त्या नेहमीच ग्रॅंड प्लॅनिंग करतात. म्हणून त्यांना 'केशरी' रंग शोभून दिसू शकतो. हा रंग त्यांच्या स्वभावासाठी अगदी शुभ असतो.

Instagram

कन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)

कन्या राशीला नेहमीच आयुष्यात काहीतरी नाविण्य हवे असते. त्यामुळे या राशीच्या मुलीदेखील त्यांच्या भविष्याचं व्यवस्थित ब्लॅनिंग करतात. कन्या राशीच्या मुलींसाठी त्यांच्या राशीनुसार 'जांभळा' रंग शोभून दिसू शकतो. त्या लग्नात हिरव्या अथवा जांभळ्या रंगाचा लेहंगा अथवा साडीत उठून दिसतील.

Instagram

तूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)

तूळ रास ही एक शांत स्वभावाची रास असूनही काही क्वचित प्रसंगी या राशीचे लोक थोडं क्रेझीदेखील वागू शकतात. त्यांना फॅशनबाबत चांगले ज्ञान असते. त्यांच्यावर व्यापक असलेला 'आकाशी' रंग नक्कीच सूट होऊ शकतो. 

Instagram

वृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)

वृश्चिक राशीच्या मुली या विचारपूर्वक जीवन जगतात. लग्नकार्यात जास्त खर्च करावा अशा विचारांच्या नसूनही वधुवस्त्रांवर या राशीच्या मुली भरमसाठ खर्च करू शकतात. या आकर्षक राशीच्या मुलींसाठी 'केशरी' रंग शुभ असू शकतो.

Instagram

धनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

धनु राशीच्या मुली शांत आणि मनमिळावू स्वभावाच्या असतात. लग्नकार्यात त्यांच्यावर भडक रंगापेक्षा काहीसे सौम्य रंगच उजळून दिसतात. या राशीच्या मुलींनी लग्नात 'गुलाबी' रंगाची साडी अथवा लेहंगा निवडावा.

Instagram

मकर (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)

मकर राशीच्या मुलींना प्रेम आणि लग्नाबाबत फारच उत्सुकता असते. अशा राशींच्या मुलींना लग्नकार्यात उठावदार दिसण्यासाठी 'जांभळा' रंग शुभ ठरू शकतो. शिवाय तो त्यांच्यावर अधिक उठून दिसेल.

Instagram

कुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)

कुंभ राशीला लोकांच्या प्रेमाला आवर घालणं कुणाच्याही हातात नाही. या राशीच्या लोकांवर कोणताही रंग सूट होणार असला तरी त्यांनी लग्नात 'रॉयल ब्लू' अथवा 'निळ्या' रंगाचा लेंहगा अथवा साडी नेसावी.

Instagram

मीन ( 19 फेब्रुवारी - 20 मार्च)

मीन राशीच्या मुलींच्या लग्नातील लेंहगा हा त्यांच्या रोमॅंटिक स्वभावप्रमाणेच असावा. या राशीच्या मुली प्रेमाबाबत फारच संवेदनशील असतात. त्यामुळे त्यांनी लग्नात ब्राईट 'पिवळ्या' रंगाचे वधुवस्त्र नेसावे. 

Instagram