स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

स्वयंपाकघरात करायच्या असतील स्वादिष्ट रेसिपीज तर वापरा सोप्या टिप्स

वेळ कोणतीही असो भूक लागल्यानंतर सर्वात पहिले आठवतं ते स्वयंपाकघर. घराचा अगदी महत्त्वाचा भाग. बऱ्याच महिला आपला जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाकघरामध्येच व्यतीत करतात. अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सतत स्वयंपाकघरात राहिल्यानंतर स्वादिष्ट रेसिपीज बनविण्यासाठी आपल्याला नक्कीच सोप्या टिप्स माहीत हव्यात. जेणेकरून आपला स्वयंपाक पटापट पण होईल आणि जेवणाचा स्वादही उत्कृष्ट राहील. बऱ्याचदा काही गोष्टी सगळ्यांना माहीत असतातच असं नाही.  त्यामुळे तुम्ही या सोप्या टिप्स वापरून आपल्या स्वयंपाकघरातील पदार्थ बनवा अधिक स्वादिष्ट आणि रूचकर. जाणून घेऊया काही महत्त्वाच्या आणि सोप्या टिप्स. 

स्वयंपाकघरातील सोप्या टिप्स

Shutterstock

1. कोबीची भाजी तर सगळ्यांचाच घरात केली जाते. मात्र कोबीची भाजी करताना त्याचा रंग बऱ्याचदा बदलतो. मग त्याचा रंग बदलू नये  असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भाजी करताना या भाजीमध्ये साधारण 1 लहान चमचा दूध मिसळावे. त्यामुळे भाजीचा रंग बदलत नाही आणि भाजीचा स्वादही वाढतो. 

2. बऱ्याचदा आपल्याकडे सुक्या भाजीपेक्षा ग्रेव्ही अर्थात रस्सा असणाऱ्या भाजींचा जास्त वापर करण्यात येतो. कारण कधी कधी भाजी आणि आमटी हे दोन पदार्थ बनविण्याचा कंटाळा येतो. मग ग्रेव्ही अर्थात रस्सा करताना तुम्ही कांद्याचा वापर करत असाल तर तुम्हाला कांद्यापेक्षाही कोबीच्या पेस्टचा वापर केल्यास, भाजी चवीला चांगली होते. तसंच तुम्हाला सतत कांदा खायचा कंटाळा आला असेल तर तुम्ही या पेस्टचा वापर करू शकता. तसंच तुम्ही कोबीची पानं बारीक कापून मऊ होईपर्यंत भाजा  आणि मग थंड झाल्यावर याची  पेस्ट बनवा. ही पेस्ट कोणत्याही भाजीमध्ये घातल्यास, भाजी रूचकर लागते. 

3. पीठ पेरून भाजी करताना बऱ्याचदा बेसनचा वापर केला जातो. पण बेसनने बऱ्याचदा पोट फुगते. त्यापेक्षा बेसन आणि तांदळाचे पीठ वापरले तर भाजी अधिक रूचकर आणि कुरकुरीतही होते. 

4. जेवणात सलाड बनवायचे असल्यास, तुम्ही भाजी तिरप्या पद्धतीने कापून घ्या. त्यामुळे तुम्हाला तिखट, मीठ मसाला लावणं सोपं होतं. भाजी खाताना तुम्हाला त्याचा चांगला स्वाद घेता येतो. सलाडसाठी तुम्हाला टॉमेटोचा वापर करायचा असेल तर तुम्ही टॉमेटो धुऊन साधारण 15 मिनिट्स फ्रिजमध्ये ठेवा. त्यानंतर तुम्ही टॉमेटोचे काप काढा. म्हणजे टॉमेटो व्यवस्थित कडक राहतील आणि त्याचे काप काढणं सोपं जाईल. सलाड करताना अर्धा तासापेक्षा अधिक वेळ भाजी कापून ठेऊ नका. अन्यथा त्यातील सत्व निघून जातील. 

कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स

Shutterstock

5. तुम्हाला जेवणात टॉमेटोची ग्रेव्ही बनवायची असेल पण टॉमेटो नसतील तर तुम्ही सफरचंदाचाही वापर करू शकता. सफरचंद कापून घ्या. त्यात लसूण, हिरवी वेलची, काळी मिरी आणि भाजलेली बडीशेप घालून भाजून वाटून घ्या. ही ग्रेव्ही भाजीत वापरली तर स्वादही मस्त लागेल आणि टॉमेटोची कमतरताही भासणार नाही. 

6. बऱ्याचदा तूप बनवत असताना जर गॅस जास्त मोठा झाला तर तूप काळे पडते. पण तुम्हाला तूप काळे दिसायला नको असेल तर पटकन त्यात तुम्ही बटाट्याचा एक काप काढून टाका. त्यातील काळेपणा निघून  जाईल आणि तूप पहिल्यासारखेच पिवळसर दिसेल. 

7. भाजीसाठी कापलेला कांदा जास्त उरला असेल तर त्यात मीठ आणि व्हिनेगर घालून खा अथवा दही आणि मिरची, तिखट घालून त्याची कोशिंबीर करा. म्हणजे कांदाही फुकट जाणार नाही आणि तुम्हाला वेगळं काहीतरी खाल्ल्याचं समाधानही मिळेल. 

8. अळूची भाजी करण्यापूर्वी त्याची खाज घालविण्यासाठी चिंच वापरावी. ज्यामुळे हातालाही खाज लागत नाही. 

9. कारल्याचा कडूपणा घालविण्यासाठी त्याला चिरून लिंबाचा रस साधारण १० मिनिट्स लाऊन ठेवावा

बेकिंग करताना उपयोगी पडणाऱ्या सोप्या टिप्स

 

10. मोदक करताना आंबेमोहोर तांदूळ वापरा. जेणेकरून तुमचे मोदक संध्याकाळपर्यंत व्यवस्थित पांढरे दिसतील. त्यावर काळपेणा चढणार नाही.

11. चहा करण्यापूर्वी पाण्यात चहा पावडर पाच मिनिट्स आधी घालून ठेवावी. ज्यामुळे चहाचा चांगला अर्क पाण्यात  उतरतो आणि चहा चवीला चांगला लागतो 

12. भात शिजवताना जर कुकरशिवाय शिजवायचा असेल तर त्यात एक चमचा तूप घालायला हवं. त्यामुळे भात मोकळा होतो. 

स्वयंपाकघरात सापडतील तुम्हाला नैसर्गिक पेनकिलर्स, आता गोळ्या घेण्याची गरज नाही