DIY: चेहऱ्यावर सतत अॅक्ने होत असल्यास लावा 'हा' फेसमास्क

DIY: चेहऱ्यावर सतत अॅक्ने होत असल्यास लावा 'हा' फेसमास्क

प्रत्येकाची त्वचा ही वेगवेगळी असते. काही जणांची कोरडी त्वचा असते तर काही जणांची त्वचा ही तेलकट असते. अशा परिस्थितीत त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक होते. विशेषतः महिलांनी आपल्या त्वचेची काळजी नीट घेतली नाही तर त्यांच्या चेहऱ्यावर मुरूमं आणि अॅक्ने होण्याची शक्यता वाढत जाते. सतत काम करून येणारा चेहऱ्यावरील घाम आणि प्रदूषणाने चेहरा लवकर खराब होतो. मुरूमांपासून सुटका मिळवणे तसं तर सोपं नाही. पण तुम्ही चेहऱ्यावरील अॅक्ने फेसमास्क लाऊन नक्कीच संपुष्टात आणू शकता. त्यासाठी तुम्ही DIY घरगुती फेसमास्कचा वापर करू शकता. सततचा तणाव, बॅक्टेरिया इन्फेक्शन, हार्मोनल बदल, अलर्जी या गोष्टींंमुळे सतत चेहऱ्यावर अॅक्ने अर्थात पुळ्या येतात. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी फेसमास्क बनवा आणि त्यावर इलाज करा.

अॅक्नेपासून सुटका मिळविण्यासाठी फेसमास्क

अॅक्नेपासून सुटका मिळविण्यासाठी फेसमास्क घरच्या घरी तयार करू शकतो. आम्ही तुम्हाला इथे तीन फेसमास्कबद्दल सांगणार आहोत. या फेसमास्कने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील अॅक्ने कमी करू शकता. त्याआधी त्याची नावं जाणून घेऊया आणि त्याचा वापर कसा करायचा 

 

अवोकॅडो आणि विटामिन ई फेसमास्क

Shutterstock

हा फेसमास्क बनविण्यासाठी तुम्हाला एक अवोकॅडो, 1 चमचा विटामिन ई ऑईलची गरज लागेल. सर्वात पहिले अवोकॅडोचा मधला भाग काढून नीट कापून घ्या. एका भांड्यात अवोकॅडो घेऊन नीट मॅश करून घ्या. यामध्ये  1 चमचा विटामिन ई ऑईल मिक्स करा. नीट मिक्स करून घ्या. फेसमास्क लावण्यापूर्वी तुम्ही तुमचा चेहरा नीट क्लिंन्झरने धुऊन घ्या.  आता वरील मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा. साधारण 15-20 मिनिट्स तसंच ठेवा आणि नंतर थंंड पाण्याने चेहरा धुवा. या फेसमास्कने तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल. विटामिन ई असल्यामुळे चेहऱ्यावरील असलेली धूळ आणि माती निघण्यास मदत मिळते. तसंच अवोकॅडो  तुमच्या चेहऱ्यावर अधिक तजेलदारपणा आणून देण्यास उपयोगी ठरतो. 

उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहऱ्यावर लावा ‘पालक फेसमास्क’

टॉमेटो ज्यूस आणि कोरफड फेसमास्क

Shutterstock

हा फेसमास्क बनविण्यासाठी दोन मोठे चमचे कोरफड जेल आणि 3 मोठे चमचे टॉमेटो ज्युस घ्या. हे दोन्ही नीट मिक्स करून घ्या. मास्क बनविण्यासाठी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करणे आवश्यक आहे. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर 20 ते 30 मिनिट्स लावा. मास्क लावण्यापूर्वी चेहरा धुऊन घ्या आणि मगच मास्क लावा. चेहरा स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. अर्ध्या तासानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातील फरक नक्की जाणवेल. टॉमेटो ज्युसमधील विटामिन सी हे चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी  आणि अॅक्ने काढण्यासाठी उपयोगी पडतो. तसंच चेहऱ्यावरील बॅक्टेरिया निघण्यास मदत मिळते. 

बटाट्यापासून बनवा सोपे आणि झटपट फेसमास्क

काकडी आणि ओटमील फेसमास्क

Shutterstock

या मिश्रणाचा फेसपॅक बनविण्यासाठी सोललेली काकडी, 2 मोठे चमचे ओटमील आणि 1 चमचे मध घ्या. सर्वात पहिले काकडी नीट किसून घ्या.  त्यामध्ये ओटमील मिक्स करा. त्यामध्ये  एक चमचा मध घाला. हे  मिश्रण मिक्स करून आपल्या चेहरा आणि मानेवर लावा. साधारण अर्धा तास हे मिश्रण तसंच राहू द्या.  त्यानंतर थंड पाण्याने हा फेसमास्क धुवा.  आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा प्रयोग केल्यास तुम्हाला परिणाम दिसून येतील. ओटमीलमुळे चेहरा अधिक मऊ आणि मुलायम होण्यास फायदा होतो. तसंच काकडीने चेहऱ्याचा फ्रेशनेस परत मिळतो. 

त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी वापरता येतात चारकोल ब्युटी उत्पादनं, काय आहेत फायदे