चेहऱ्यावरील लव होईल कमी, असा करा कच्च्या पपईचा वापर

चेहऱ्यावरील लव होईल कमी, असा करा कच्च्या पपईचा वापर


सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी नेहमी महागड्या ब्युटी ट्रिटमेंटची गरज असते असं मुळीच नाही. तुम्ही काही घरगुती उपाय करून तुमचे सौंदर्य खुलवू शकता. चेहऱ्यावरील अनावश्यक केसांमुळे तुमच्या सौंदर्यात बाधा येते. लॉकडाऊनमुळे तुम्हाला वॅक्स आणि थ्रेडिंगसाठी वारंवार पार्लरमध्ये जाणं सध्या शक्य नाही. म्हणूनच कच्चा पपई वापरून घरीच हे फेसपॅक तयार करा आणि तुमच्या फेशिअल हेअर्संना रिमूव्ह करा.

Shutterstock

पपईचा त्वचेसाठी कसा होतो फायदा -

पपई मध्ये असे अनेक घटक आहेत ज्यामुळे तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. नैसर्गिक असल्यामुळे याचे साईड इफेक्ट होत नाहीत. चेहऱ्यावर नको असलेले अनावश्यक केस काढून टाकण्यासाठीदेखील तुम्हाला कच्चा पपई वापरता  येऊ शकतो. कारण कच्च्या पपईमुळे तुमच्या चेहऱ्यावरील लव आणि डेड स्कीन निघून जाते. शिवाय यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. यासाठी जाणून घ्या चेहऱ्यावरील लव कमी करण्यासाठी कसा करावा कच्च्या पपईचा वापर

Shutterstock

चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी वापरा हे पपईचे फेसपॅक -

फेसपॅक नंं 1

साहित्य -

कच्चा पपई, हळद, पाणी

कसा वापर कराल -

पपई सोलून त्याचे छोटे छोटे तुकडे कापा. पपईचे तुकडे मिक्सरमध्ये वाटून घ्या. या मिश्रणात चिमूटभर हळद मिसळा. मिश्रण एखाद्या फेसपॅकप्रमाणे एकत्र करून घ्या गरज असल्यास त्यात थोडं पाणी मिसळा. चेहऱ्यावर हा फेसपॅक लावा. फेसपॅक लावल्यावर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज द्या. वीस मिनीटांनी चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून एकदा अथवा दोनदा तुम्ही हा फेसपॅक वापरा. ज्यामुळे तुमच्या  चेहऱ्यावरील अनावश्यक लव कमी होईल. 

Instagram

फेसपॅक नं 2

अपरलिप्स आणि चीनजवळ सतत लव वाढणं ही एक मोठीच समस्या आहे.  एकतर सध्या पार्लर आणि सलॉनमध्ये जाण्याची भिती वाटते. त्यात वॅक्स स्ट्रिप्स वापरण्याची सवय नसेल तर घरीदेखील काही उपाय करता येत नाही. मात्र कच्चा पपई वापरून तुम्ही तुमच्या अपरलिप्स आणि चीनजवळील लवची ग्रोथ कमी करू शकता. 

साहित्य -

पपई, चण्याचे पीठ अथवा बेसन, हळद, कोरफड

कसा कराल फेसपॅक -

कच्चा पपई सोलून त्याचे तुकडे, कोरफडाचा गर यांची पेस्ट तयार करा. त्यात बेसन आणि हळद मिसळा. गरज लागल्यास गुलाबपाणी अथवा साधे पाणी मिसळून एक फेसपॅक तयार करा. तुमच्या चेहऱ्यावर केसांचे प्रमाण ज्या ज्या भागात आहे. म्हणजेच अपरलिप्स, चीन, गाल अशा भागांवर हा फेसपॅक लावा. फेसपॅक सुकल्यावर तो केसांच्या ग्रोथच्या उलट दिशेन रिमूव्ह करा. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील लव निघून जाईल. शिवाय सतत हा फेसपॅक वापरण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर लव येणं  कमी होईल. तुम्ही हा पॅक चेहऱ्याप्रमाणेच तुमच्या हात आणि पायांवरील केस कमी करण्यासाठी वापरू शकता. 


सूचना - हे दोन्ही फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी यातील कोणत्याही घटकाची तुम्हाला अॅलर्जी नाही हे तपासा. अथवा हातावर  एक छोटी पॅच टेस्ट घ्या.

Instagram