सगळे करुन झाले पण पोटाचा घेर होत नाही कमी, जाणून घ्या कारण

सगळे करुन झाले पण पोटाचा घेर होत नाही कमी, जाणून घ्या कारण

पोटाची सुटलेली ढेरी कोणालाच आवडत नाही. त्यात हल्ली लोक आपल्या फिगर बाबतीत इतकी आग्रही झाली आहेत की, शरीराचा कोणताच भाग सुटू नये असे त्यांना वाटते. मग काय शरीरातील फॅट वाढू नये म्हणून व्यायाम, डाएट अशा सगळ्या गोष्टी आपण करायला सुरुवात करतो. एखाद्याने सकाळी उठून एखादा व्यायाम करण्याचा सल्ला दिला तर ते करतो. काही तरी प्यायला सांगितले तर ते पितो. पण इतकं सगळं करुनही काहींच्या शरीरात काहीही फरक पडत नाही. विशेषत: पोटाचा घेर हा काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही. प्रयत्न करुनही जेव्हा ते कमी होत नाही असे वाटते. त्यावेळी मात्र थोडे निराश व्हायला होते. असा हट्टी पोटाचा घेर सगळं करुनही का कमी होत नाही हे आज आपण जाणून घेऊया. 

व्यायाम करण्याची वेळ

तुम्ही व्यायाम करण्यासाठी कोणती वेळ निवडता हे देखील फार गरजेचे आहे. जर तुम्ही आरामात सकाळी 10 नंतर उठून व्यायाम करत असाल तर त्याला काही अर्थ नाही किंवा संध्याकाळी ज्यावेळी तुम्ही थकून भागून घरी येत असाल आणि व्यायाम करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा जाणवणार नाही. कारण संध्याकाळी आपले शरीर थकलेले असते. तुम्ही कितीही जास्तीचा व्यायाम करण्याचा प्रयत्न केला तरी तुमचे शरीर त्यासाठी साथ देत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर होत नाही. सकाळी उशीरा उठून व्यायाम करणे यासाठी चुकीचे की, तुमच्या शरीराचीही एक प्रक्रिया आहे तुम्हाला भूक लागत नसली तरी तुमची नाश्ता करण्याची वेळ ही तुमच्या आळशीपणामुळे चुकते आणि सबंध दिवस तुम्हाला व्यायाम करण्याची इच्छा म्हणावी तशी होत नाही. सकाळी लवकर उठून थोडासा हल्का पोटाचा व्यायाम केला तर तुम्हाला आठवड्याभरातच फरक जाणवू शकतो. 

फाटलेल्या दुधाचे पनीरच नाही तर येणारे पाणीही आहे फायदेशीर

खाण्याच्या वेळा आणि खाद्यपदार्थ

Instagram

खाण्याच्या वेळा आणि खाद्यपदार्थ यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. तुम्हाला फिट राहायचे असेल तर काही गोष्टी या आहारातून कमी करणे फारच गरजेचे असते. उदा. तेलकट पदार्थ, पावजन्य पदार्थ तुमच्या आहारातून कमी करायला हवे. आता ते पूर्णपणे सोडणे शक्य नाही हे आम्हीही जाणतो. अशावेळी तुम्हाला जर असे पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर ते तुम्ही दुपारच्या जेवणात किंवा सकाळच्या वेळांमध्ये खा.( पण त्याचे प्रमाणही योग्य असू द्या)  सकाळी आपली पचनशक्ती चांगली असते. रात्रीच्या जेवणात या पदार्थांचे सेवन घातक ठरु शकते. कारण असे पदार्थ पचत नाहीत आणि ते शरीरात अधिक काळ राहतात. त्यामुळेही तुमची पोटाची ढेरी वाढू शकते. 

त्वचा टोन्ड करण्याचे काम करतात हे फेस मसाजर नक्की वापरुन पाहा

अपुरी झोप

तुमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे ‘झोप’ जर तुमची झोप व्यवस्थित होत असेल तर तुमची पचनक्रिया चांगली राहते. अपुऱ्य झोपेमुळे अनेक त्रास होण्याची शक्यता असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे आहे. पोटाचा घेर कमी करायचा असेल तर तुम्हाला तुमची लाईफस्टाईल चांगली करणे आवश्यक आहे.झोप हा त्याचा महत्वाचा भाग आहे. तुम्ही कितीही चांगला व्यायाम केला पण तुम्ही तुमच्या झोपेकडे दुर्लक्ष केले तर मात्र तुम्हाला त्याचा काहीही फायदा मिळणार नाही. तुमचे शरीर फ्रेश नसेल तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये कोणतेही बदल करता येणे अशक्य आहेत .


आता या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि तुमचा पोटाचा घेर कमी का होत नाही हे जाणून घेत तुमच्यामध्ये हे काही बदल करण्याचा प्रयत्न करा. 

कंबरेवरील चरबी करायची असेल कमी तर प्या लवंगेचे पाणी