योगा मॅटची स्वच्छता आहे महत्वाची नाहीतर होतील त्वचेचे विकार

योगा मॅटची स्वच्छता आहे महत्वाची नाहीतर होतील त्वचेचे विकार

घरी किंवा जीममध्ये जर तुम्ही व्यायाम करण्यासाठी योगा मॅट वापरत असाल तर तुमच्यासाठी आजचा विषय फारच महत्वाचा आहे. योगा मॅट वापरुन झाल्यानंतर जर तुम्ही ती तशीच ठेवून देत असाल तर तुम्हाला त्वचेचे विकार होण्याची शक्यता आहे. म्हणूनच आज आपण योगा मॅट आणि तिची स्वच्छता या विषयी अधिक माहिती घेणार आहोत. चला मग करुया सुरुवात

ब्युटी प्रॉडक्टच्या अती वापरामुळे होऊ शकतं त्वचेचं नुकसान

घामामुळे होऊ शकते अॅलर्जी

Instagram

योगा मॅट या खास मटेरिअलच्या असतात. एका विशिष्ट रबर क्वालिटीच्या बनलेल्या असतात. तुमचा घाम पटकन शोषून घेतला जावा आणि तुमचा पाय सरकू नये याची दक्षता घेत या मॅटची रचना केलेली असते.पण काही जणांना खूप घाम येतो. आता हा घाम पटकन तुमच्या मॅटवरुन शोषला जाईल, असे सांगता नाही.तुमचाच घाम तुमच्या त्वचेला पुन्हा पुन्हा लागत राहिला तर तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. अनेकांना घामाची अॅलर्जी असते. अशावेळी जर तुम्ही तुमची योगा मॅट स्वच्छ न करता तशीच ठेवून दिली तर तुम्हाला त्याची अॅलर्जी होण्याची दाट शक्यता असते. 

त्वचेवर येऊ शकतात पिंपल्स

 तुम्ही योगा किंवा वर्कआऊट करत असताना तुमचे त्वचेचे पोअर्स उघडे होतात. अशावेळी तुमची त्वचा अॅक्ने प्रोन म्हणजेच मुरुम येणारी असेल तर तुम्हाला पिंपल्स येण्याचा त्रास अधिक आहे. कारण योगा मॅटवर वेगवेगळे व्यायामप्रकार करताना आपण अनेकदा आपल्या पायाचा तळवाही मॅटवर ठेवतो. पायावर असलेली माती मॅटवर लागते. मॅटवरुन ती तुमच्या चेहऱ्याला. काहींची त्वचा फारच नाजूक असते. त्यांना चेहऱ्याबाबत जराही अस्वच्छपणा चालत नाही. जर तुमचीही त्वचा नाजूक असेल आणि तुमचे पोअर्स मोठे असतील तर तुम्हाला अगदी हमखास या अस्वच्छतेमुळे पिंपल्स येऊ शकतात. 

हेल्दी राहण्यासाठी आहारात करा 'या' डाळींचा समावेश

पोअर्समध्ये घाण साचण्याची शक्यता

Instagram

पिंपल्स हा तुमचा त्रास नसेल तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पोअर्स असतातच. या पोअर्समध्ये घाण साचल्यानंतर तुम्हाला पिंपल्स आले नाही तरी त्या पिंपल्समध्ये घाण साचून तुमच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्सही तयार होऊ शकतात. ब्लॅकहेड्स तुमच्या चेहऱ्यावर अधिक काळ राहिले की, तुमचा चेहरा डल आणि अस्वच्छ दिसू लागतो.

त्वचेवर बारीक पुरळ येणे

अस्वच्छ मॅटचा त्रास हा केवळ तुमच्या चेहऱ्यावरच होत नाही तर हा त्रास तुमच्या संपूर्ण शरीरावर होण्याची शक्यता असते. कधी कधी आपल्या संपूर्ण शरीरावर बारीक बारीक पुरळ येतात. अस्वच्छतेमुळे हे पुरळ येण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हा त्रासही योगा मॅटच्या अस्वच्छतेमुळे होऊ शकतो. 

अशी करा योगा मॅटची स्वच्छता

योगा मॅटचे काम झाल्यानंतर तुम्ही ती तशीच गुंडाळून ठेवत असाल तर तुम्ही योगा मॅट रोजच्या रोज स्वच्छ करण्याची सवय लावून घ्या. 

  • तुमचा वर्कआऊट झाल्यानंतर एक स्वच्छ ओला कपडा कोणत्याही अँटिसेप्टिक लिक्विडमध्ये बुडवून मॅट स्वच्छ पुसून घ्या. 
  • रबर मॅट असल्यामुळे मॅट सुकायला थोडासा वेळ लागतो. पण ही कृती दररोज करा. मॅट लवकर वाळत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ही मॅट थेट उन्हात वाळत घाला.  फार वेळ ही मॅट उन्हात वाळत घालू नका. 
  • जर तुम्हाला रोज मॅट पुसणे शक्य नसेल तर किमान ती वाळत घालायला विसरु नका. 


आता जर तुम्ही योगा मॅट स्वच्छ न करता तशीच ठेवून देत असाल तर या गोष्टींची जरुर काळजी घ्या. 

DIY: चेहऱ्यावर सतत अॅक्ने होत असल्यास लावा 'हा' फेसमास्क