घरात झुरळांचा झाला असेल सुळसुळाट, तर करा सोपे उपाय

घरात झुरळांचा झाला असेल सुळसुळाट, तर करा सोपे उपाय

घरात किती पण स्वच्छता ठेवली तरी बऱ्याचदा स्वयंपाकघरात अथवा बाथरूममध्ये आणि पुस्तकं ठेवलेल्या ठिकाणी झुरळांचा सुळसुळाट होतोच. एकदा एक झुरळ दिसलं की मनाला सतत त्रास होत राहातो. झुरळं अजून झाली तर काय करायचं? आता या झुरळाला कसं मारायचं? असे एक ना अनेक विचार मनात सतत भुणभुण करत राहतात. बऱ्याचदा तर स्वयंपाकघरातील पिठाच्या डब्यांमध्येही ही झुरळं जातात. मग हे सगळं कसं थांबवायचं असा प्रश्न निर्माण होतो. कितीही स्प्रे आणि इतर गोष्टींचा वापर केला  तरी झुरळं परत येतातच. तसंच जर घरात झुरळ झालं तर एक प्रकारचा उग्रस आणि कुबट वास घरात साचून राहातो. बऱ्याचदा अडगळ असणाऱ्या ठिकाणी झुरळ जास्त होतात. म्हणून घरात स्वच्छतेची काळजी घ्या. त्यासाठी घरच्या घरी सोपे उपाय कसे करायचे  ते आपण या लेखातून पाहूया. 

1. बेकिंग पावडर आणि साखर

Shutterstock

एका भांड्यात बेकिंग पावडर आणि साखर समप्रमाणात घ्या. त्यामध्ये पाणी घालून ते भिजवा. पाणी अति घालू नका. मिश्रण चिकट होईल इतकंच पाणी घाला. तुम्हाला जिथे झुरळं दिसली आहेत त्या ठिकाणी हे मिश्रण शिंपडा. साखरेकडे झुरळं आकर्षित होऊन खायला येतील आणि बेकिंग पावडरमुळे झुरळं मरतील अथवा दूर जाण्यासाठी त्याचा उपयोग होईल. 

स्वयंपाकघरात सापडतील तुम्हाला नैसर्गिक पेनकिलर्स, आता गोळ्या घेण्याची गरज नाही

2. लवंग

Shutterstock

लवंग ही आरोग्यासाठीच उपयोगी ठरते असं नाही तर याचा वास हा झुरळांना त्रासदायक ठरतो. तुम्हाला जर स्वयंपाकघरात अथवा कपाटात झुरळं दिसली असतील तर तुम्ही लवंगेचा वापर करू शकता. त्याठिकाणी तुम्ही काही लवंग पसरून ठेवा. लवंगेच्याव वासाने झुरळं गायब होतील. घरातून झुरळ बाहेर काढण्यासाठी हा  अतिशय सोपा उपाय आहे.

3. बोरीक पावडर

Shutterstock

हा उपाय तसं तर सगळ्यांनाच माहीत असेल. घरात मुंग्या अथवा झुरळं झाली असतील तर बोरीक पावडर त्या ठिकाणी घालून ठेवावी.  बोरीक पावडरच्या वासाने झुरळं लगेच घराबाहेर जातात. स्वयंपाकघरात आणि कपाटात कोपऱ्यामध्ये नेहमी बोरीक पावडर घालून ठेवावी.  यामुळे झुरळांचा त्रास होणार नाही. 

सुरक्षित राहायचं असेल तर घरातील 'या' गोष्टी त्वरीत करा सॅनिटाईझ

4. कडुलिंबाचे तेल

Shutterstock

कडुलिंबाचे तेल हा पर्याय तुम्हाला कदाचित आश्चर्यकारक वाटेल. पण हा उत्कृष्ट उपाय आहे. तुम्ही एखाद्या स्प्रे मध्ये कडुलिंबाचे तेल भरून घ्या.  त्यात पाणी भरा. हा स्प्रे तुम्ही झुरळं येत असणाऱ्या ठिकाणी रात्री झोपायच्या आधी मारून ठेवा. सकाळी तुम्हाला  झुरळं मेलली सापडतील. तसंच तुम्ही खरकटे खाणे  अथवा घाण बेसिन अथवा सिंकजवळ ठेऊ नका. हा भाग नेहमी स्वच्छ ठेवा.  जेणेकरून झुरळांना येण्यासाठी कोणतंही कारण राहणार नाही. 

5. साबणाचे पाणी

Shutterstock

झुरळाला कोणताही सुगंधी साबण चालत नाही. त्याचा झुरळाच्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे तुम्हाला ज्या क्षणी झुरळ दिसेल. त्यावर साबणाचा स्प्रे लगेच उडवा. झुरळ काही क्षणातच मरेल. साबणामध्ये अल्कधर्म असल्याने झुरळ अजिबातच जिवंत राहात नाही. 

बेकिंग सोड्याचा उपयोग करा सफाईसाठी, महागड्या उत्पादनांपेक्षा उत्तम सफाई

6. अजिबात अडगळ ठेऊ नका

Shutterstock

बऱ्याचदा घराच्या एका कोपऱ्यात कुठेतरी अडगळ निर्माण होते. पण याकडे  नीट लक्ष द्या. अशी कोणतीही अडगळ घरात निर्माण होणार नाही याची काळजी घ्या आणि वेळोवेळी घर स्वच्छ ठेवा. स्वच्छतेकडे झुरळं फारशी फिरकत नाहीत. तसंच बाथरूमच्या जाळ्या नीट लागल्या आहेत की नाही हेदेखील वेळोवेळी तपासून घ्या. कारण या जाळ्यांमधून झुरळं घरात येण्याची शक्यता असते.