चमकदार त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी प्या ‘हे’ ज्युस

चमकदार त्वचा आणि निरोगी आरोग्यासाठी प्या ‘हे’ ज्युस

प्रत्येकाला सुंदर दिसायचं असतं आणि त्यासाठी आपण पार्लरमध्ये जाणं, त्वचेची घरच्या घरी काळजी घेणं या सगळ्या गोष्टी करत असतो. पण बऱ्याचदा हे सगळं करूनही हवी तशी चमकदार त्वचा आपल्याला जाणवत नाही. चेहऱ्यावरील डाग, टॅनिंग आणि तेलकट त्वचा, धूळ या सगळ्या गोष्टींमुळे चेहरा खराब होतो. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर त्यावर एक सोपा उपाय आहे. रोज तुम्ही काही ज्युस प्यायलात तर तुम्हाला चमकदार त्वचा तर मिळेलच त्याशिवाय तुमचं आरोग्यही चांगलं राहील. त्यासाठी कोणते ज्युस प्यायचे त्याची माहिती जाणून घ्या. 

सत्तू

Shutterstock

जरी तुमच्या त्वचेला योग्य पोषक तत्व मिळत नसतील तर तुमची नैसर्गिक सुंदरता कमी होऊ लागते. तुमची त्वचा यामुळे कोरडी आणि निस्तेजही दिसू लागते. ही समस्या दूर करण्यासाठी सत्तू अतिशय उपयुक्त आहे. रोज सकाळी तुम्ही सत्तूचे ज्युस प्यायल्यास तुमची त्वचा चमकदार तर होईलच शिवाय तुमचे शरीर हायड्रेट राहण्यासाठी याची मदत होते. सत्तूमुळे अनेक तऱ्हेचे  पोषण तुमच्या त्वचेला मिळते. सत्तूमध्ये फायबर, मँगनीज, मॅग्नेशियम आणि लोह याचे प्रमाण असते.  जे तुमच्या त्वचेला पोषण देऊन फ्री रॅडिकल्सपासून सुरक्षा देतात. यामध्ये  अँटिऑक्सिडंट्स असल्याने त्वचा निरोगी राखण्यासाठी याची मदत मिळते आणि त्याशिवाय त्वचेवर कोणतेही संक्रमण होण्यापासून सत्तू रोखते. 

कोरोनाविरूद्ध प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर प्या हे ज्युस

बटाट्याचा रस

Shutterstock

वजन वाढविण्यासह त्वचेमध्ये सौंदर्य अधिक वाढविण्यासाठी बटाट्याच्या रसाचा उपयोग होतो. याचा रस प्यायल्याने  अनेक रोगांपासून तुम्हाला दूर राहता येतं. विशेषतः लिव्हर अर्थात ज्यांना यकृताचे दुखणे आहे त्यांच्यासाठी,  हायपरटेन्शन आणि कॅन्सर यासारख्या रोगांसाठीही बटाट्याचा रस हा फायदेशीर ठरतो. रोज सकाळी एक ग्लास बटाट्याचा रस तुम्ही प्यायल्यास, तुम्हाला उत्तम त्वचा मिळून त्वचेवरील चकमही उत्तम राहाते. यामध्ये त्वचेला पोषक तत्व मिळतात आणि त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार राहण्यास मदत मिळते. 

नेहमी तरूण दिसण्यासाठी, नियमित प्या हे ज्युस

टॉमेटोचा ज्युस

Shutterstock

टॉमेटोमध्ये लाईकोपेन नावाचे तत्व असते जे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने शरीर हायड्रेट होते कारण यामध्ये योग्य प्रमाणात पाणी असते. टॉमेटोच्या ज्युसमुळे त्वचेसंबंधी समस्या असल्यास, दूर होतात. त्यामुळे रोज सकाळी टॉमेटोचा ज्युस पिणं तुम्हाला फायदेशीर ठरू शकतं. तुम्हाला नितळ त्वचा हवी असेल तर टॉमेटो उत्तम आहे. चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यासाठीही याचा फायदा होतो. टॉमेटोमुळे त्वचा अधिक चमकदार आणि नितळ होते. त्यामुळे तुम्ही नियमित टॉमेटोचा ज्युस पित राहिलात तर तुम्हाला त्याचा फायदाच मिळतो. 

गव्हाच्या पिठाच्या या तीन फेसपॅकमुळे त्वचा होईल अधिक चमकदार

बीटचा ज्युस

Shutterstock

बीटचा रंग बघूनच तुम्हाला लक्षात येईल की आपल्या आरोग्य आणि त्वचेसाठी याचा किती फायदा होऊ शकतो. बीटमध्ये आयर्न आणि पोटॅशियम योग्य प्रमाणात असतो. त्यासाठी याचं सेवन नेहमी करावं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामुळे हिमोग्लोबिनचं शरीरातील प्रमाण व्यवस्थित राहतं आणि रोज सकाळी उपाशी पोटी तुम्ही बीटाचे ज्युस प्यायलात तर तुमची त्वचा अधिक सुंदर आणि आकर्षक तसंच ताजीतवानी दिसेल. तसंच तुमच्या त्वचेवर एक वेगळी चमकही यामुळे येते. तुम्हाला याचा परिणाम लवकरच दिसून येईल. तसंच बीटाच्या ज्युसमुळे तुमचे आरोग्यही चांगले राखण्यास मदत मिळते. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.