मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या 'या' डिश (Maida Recipes In Marathi)

मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत, बनवा विविध प्रकारच्या 'या' डिश (Maida Recipes In Marathi)

भारतीय स्वयंपाकघरात मैदा (Maida) हा पदार्थ कायम असतोच. भारतीय खाद्यसंस्कृतीत मैद्याचा वापर करून निरनिराळे पदार्थ तयार केले जातात. मैद्यापासूनअनेक बेक केलेले, तळलेले स्वादिष्ट आणि खुशखुशीत पदार्थ सर्वांना आवडतातच. मैदा मऊ आणि बेक केल्यावर फुलणाऱा असल्यामुळे केक, बिस्किट आणि ब्रेड तयार करण्यासाठीही तो आवर्जून वापरला जातो. महाराष्ट्रीन खाद्यसंस्कृतीत तर गुडीपाडव्याच्या पुरणपोळीपासून ते अगदी दिवाळीच्या फराळापर्यंत मैदा उपयोगी असतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत हे मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीतून

Table of Contents

  नानखटाई (Nankhatai Recipe In Marathi)

  नानखटाई हा कुकीजचा एक पारंपरिक प्रकार आहे. दुपारच्या चहासोबत अथवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी नानखटाई एक उत्तम पर्याय आहे.नानखटाई चांगली फुलून येण्यासाठी त्यात मैद्याचा वापर केला जातो. मैद्याची ही खुशखुशीत नानखटाई लहान मुलांनाही खूप आवडते. बऱ्यातदा दिवाळीच्या पदार्थांमध्ये नानखटाईचे विविध प्रकार केले जातात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार नानखटाईमध्ये बदल करू शकता.

  नानखटाई साठी लागणारे साहित्य:

  • अडीच वाटी मैदा
  • अर्धी वाटी रवाळ बेसन (चणा डाळ भाजून मिक्सरवर जाडसर वाटावी)
  • अडीच वाटी साजूक तूप (तूप नानखटाई करण्याआधी थोडावेळ फ्रीजमध्ये ठेवावे)
  • दीड वाटी पिठीसाखर
  • मीठ
  • सजवण्यासाठी चारोळी, बदाम, पिस्ता अथवा काजूचे काप

  नानखटाई करण्याची कृती:

  एका मोठ्या भांड्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले थंडगार तूप काढून घ्यावे. ते हाताच्या तळव्याने चांगले फेटून घ्यावे. तूप श्रीखंडाप्रमाणे दिसू लागल्यावर त्यात पिठीसाखर मिसळावी. दोन्ही घटक एकजीव करावेत. या मिश्रणामध्ये चाळून घेतलेला मैदा आणि बेसन घ्यावे. सर्व मिश्रण एकत्र करून बॅटर तयार करावे. या बॅटरचे छोटे छोटे पेढ्यांच्या आकाराचे गोळे करून त्यांना मनाप्रमाणे विविध आकार द्यावेत. बाजारात नानखटाईला शेप देण्यासाठी विविध आकाराचे साचे मिळतात त्यांचा वापर करावा. अशा गोल आकाराच्या नानखटाई तयार कराव्या. या नानखटाईवर सजवण्यासाठी तुमच्या आवडीप्रमाणे सुक्यामेव्याचे काप लावावेत आणि बेकिंग ट्रेमध्ये  ठेवून ते ओव्हनमध्ये 150 अंशावर वीस ते तीस मिनीटे बेक करावेत.

  वाचा - स्मूदी रेसिपी मराठीत, घरच्या घरी करा चविष्ट स्मूदी तयार

  Instagram

  पुरणपोळी (Puranpoli Recipe In Marathi)

  पुरणपोळी हा महाराष्ट्रात सणासुदीला घरोघरी केला जाणारा एक खास पदार्थ आहे. विषेश म्हणजे यासाठी मैद्याचा वापर हमखास केला जातो. गव्हाच्या  पीठाच्या पुरणपोळ्यादेखील केल्या जातात. मात्र गहू आणि मैद्याचे  पीठ एकत्र करून केलेल्या पुरणपोळ्या चविष्ठ आणि सुंदर दिसतात. पुरण पीठात भरून त्यापासून पोळी लाटण्यासाठी लागणारी लवचिकता मैद्याच्या पीठात असते. ज्यामुळे पोळ्या तुटत नाहीत. 

  पुरणपोळीसाठी साहित्य:

  • एक कप मैदा
  • एक कप गव्हाचे पीठ
  • एक कप हरभरा डाळ
  • एक कप किसलेला गुळ
  • वेलची पूड

  पुरणपोळी करण्याची पद्धत:

  हरबरा डाळ कुकरमध्ये शिजवून घ्या. त्यातील पाणी काढून त्यात किसलेला गुळ टाका आणि मंद आचेवर मिश्रण शिजवून घ्या. मिश्रण एकजीव झाल्यावर त्यात वेलची पूड घालून ते मिक्सर अथवा पुरणयंत्रात वाटून घ्या. मैदा आणि गव्हाचे पीठ एकत्र करून सैलसर कणीक मळून घ्या. या कणकेची पारी तयार करून त्यात पुरणाचा गोळा भरा आणि अलगद पारीचे तोंड बंद करा. पोळी लाटून तूपावप खरपूस शेकवा. गरमागरम पोळी तूप, दुध आणि कटाच्या आमटीसोबत अगदी मस्त लागते.

  Instagram

  पनीर कुलचा (Paneer Kulcha)

  पनीर कुलचा हा एक लोकप्रिय प्रकार आहे. भाजी बरोबर अथवा नुसताच खाण्यासाठी हा कुलच्याचा प्रकार तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. यासाठी पीठ जरा थोड्या निराळ्या पद्धतीने मळावं लागते. पीठ मळणे, स्टफिंग करणे आणि कुलचा शेकणे अशा  तीन स्टेपमध्ये हा कुलचा तुम्ही करू शकता. वास्तविक हॉटेल मध्ये कुलचा तंदूरमध्ये शेकवला जातो. मात्र घरी तयार करताना तुम्ही तव्याचा वापर करू शकता.

  पनीर कुलचा बनवण्यासाठी साहित्य:

  • दोन वाटी मैदा
  • 3/4 चमचा बेकिंग पावडर
  • अर्धा कर कोमट दूध
  • एक चमचा साखर
  • मीठ
  • तीन चमचे दही
  • दोन चमचे तेल 
  • एक चमचा तूप
  • अर्धा चमचा किसलेले आले
  • दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर
  • दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • चाट मसाला 
  • काळी मिरी पावडर
  • पाव कप किसलेले पनीर

  पनीर कुलचा करण्याची कृती:

  एका परातीमध्ये मैदा मळून घ्या. मळताना त्यात बेकिंग पावडर, मीठ, साखर, दूध, दही आणि तेल टाका. मळलेले पीठ एका ओल्या फडक्याने झाकून ठेवा. कमीत कमी दोन तास पीठ सेट होणं गरजेचं आहे. दोन तासांनी ते पीठ थोड्यावेळ पुन्हा मळा. त्यानंतर त्याचे एकसमान गोळे करा आणि पुन्हा झाकून ठेवा.पनीर, आलं, कोथिंबीर, मिरच्याची पेस्ट, चाट मसाला, काळीमिरी पावडर, मीठ एकत्र करून मिश्रण एकजीव करा. त्यानंतर पनीरचा गोळा घ्या तो थोडा लाटून घ्या. त्यावर थोडा मैदा लावून त्यात पनीरचे  स्टफिंग भरून घ्या. गोळा कुलच्याप्रमाणे लाटून घ्या आणि तव्यावर शेकवा. गरमागरम कुलचा सर्व्ह करा. 

  नारळी भात मराठी रेसिपी (Coconut Rice Recipe In Marathi)

  Instagram

  मैद्याचे शंकरपाळी रेसिपी (Shankar Pali Recipe In Marathi)

  शंकरपाळी अथवा शंकरपाळे हा पदार्थ खास दिवाळीसाठी तयार केला जातो. मात्र खुशखशीत शंकरपाळ्या तुम्ही घरच्या घरी आणि कधीही करू शकता. शंकरपाळी करण्याचे विविध प्रकार आहेत. त्यामुळे तुम्ही  तुम्हाला आवडतील त्या प्रकारच्या शंकरपाळ्या करू शकता. त्यातील एक प्रकार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. तुम्हाला आम्ही शेअर केलेली मैद्याची शंकरपाळी रेसिपी कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा.

  मैद्याचे शंकरपाळी करण्यासाठी साहित्य:

  • तीन वाट्या मैदा
  • एक वाटी बारीक रवा
  • एक वाटी दूध
  • एक वाटी साखर
  • पाव वाटी तूप
  • एक चमचा वेलचीपूड
  • मीठ

  मैद्याचे शंकरपाळी करण्याची कृती:

  एका पातेल्यात दूध गरम करून घ्या. दूध उकळल्यावर त्यात साखर विरघळवून घ्या. परातीमध्ये रवा, मीठ, वेलचीपूड आणि मैदा या दूधात मळून घ्यायचा. तेल लावून पीठ अर्धा तास ओल्या फडक्याने झाकून ठेवायचं.  अर्धा तासाने भिजवलेल्या कणीकेचा एक गोळा मळून जाडसर लाटून घ्यायचा. कातण अथवा सुरीने शंकरपाळीचा आकार द्यायचा. मंद गॅसवर खुशखुशीत शंकरपाळे तळून घ्यायचे.

  Instagram

  चीझ पिझ्झा (Cheese Pizza)

  पिझ्झा हा प्रकार लहानांपासुन ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा आहे. सध्या लॉकडाऊनमुळे बाहेरचा  पिझ्झा खाणं सुरक्षित असेलच असं  नाही. मात्र तुम्ही घरच्या घरी मस्त पिझ्झा तयार करून तुमच्या घरच्यांना खाऊ घालू शकता. पिझ्झा बेस तयार करण्यासाठी तुम्हाला मैद्याची गरज लागू शकते. यासाठी जाणून घ्या चीज पिझ्झाची सोपी कृती

  पिझ्झा बेसचे साहित्य:

  • पाव किलो मैदा
  • दहा ग्रॅम फ्रेश यीस्ट, अथवा बाजारातील कोणतेही यीस्ट
  • दहा ग्रॅम साखर
  • एक चमचा बटर
  • 150 मिली पाणी

  पिझ्झा बेस तयार करण्याची कृती:

  डायनिंग टेबल अथवा किचन प्लॅटफॉर्मवर मैदा चाळून घ्या. पीठामध्ये खोलगट भाग करून त्यात यीस्ट आणि साखर टाका. थोडंसं पाणी मिसळून ते अॅक्टिव्हेट करा. त्यात बटर अॅड करा आणि मैदाचा मळून एक सॉफ्ट गोळा तयार करा. पीठाचा गोळा वीस मिनीटांसाठी ओल्या फडक्याने झाकून ठेवा. वीस मिनीटांनी त्याचे आवडीप्रमाणे भाग करा. पीठ मळून त्यातील हवा काढून टाका आणि पिझ्झाबेससाठी पोळी लाटा. पिझ्झा बेकिंग ट्रेमध्ये ठेवा आणि काट्याने त्यावर टोचे मारा. बेकिंग ट्रे पुन्हा वीस मिनीटे ओल्या फडक्याने झाकून ठेवा. वीस मिनीटांनी तो बेक करा. 

  पिझ्झा बेस वर टॉपिंग साठी साहित्य आणि कृती:

  पिझ्झा करण्यासाठी तु्म्ही सिमला मिरची, कांदा, टोमॅटो, ऑलिव्ह, पनीर अशा विविध टॉपिंगचा वापर करू शकता. पिझ्झा सॉस, टोमॅटो सॉस आणि टॉपिंगने पिझ्झा बेस सजवून बेक करा आणि तुमच्या घरच्यांना खुश करा. 

  Instagram

  मालपोहे (Malpuva)

  मालपोहे भारतीय घरात गोडाधोडासाठी बऱ्याचदा केले जातात. सणसमारंभाला मालपोहा हा एक पटकन करता येण्यासारखा प्रकार आहे. स्पेशली होळीच्या  सणाला मालपोहा केला जातो. 

  मालपोहा करण्यासाठी साहित्य:

  • दीड कप मैदा
  • अर्धा चमचा वेलची पूड
  • एक चमचा बडीशेप
  • दीड कप दूध
  • तीन चार चमचे तूप
  • तीन चमचे मावा अथवा मिल्क पावडर
  • पाव चमचा साखर
  • पाव कप पाणी
  • लिंबाचा रस

  मालपोहे करण्याची कृती:

  एका भांड्यात दूध घ्या. त्या मावा अथवा मिल्क पावडर मिसळा आणि मिश्रण एकजीव करून घ्या. या मिश्रणात मैदा, बडीशोप आणि वेलची पावडर मिसळा. मिश्रण एकजीव करून घ्या. तुमच्या सोयीनुसार त्याचा घट्टपणा चेक करा. तव्यावर चांगले पसरेल इतपत दूध घालून मिश्रण पातळ करा. या मिश्रणाचे तव्यावर छोटे छोटे मालपोहे पसरवा. त्यावर तूप सोडून ते दोन्ही बाजूने शॅलो फ्राय करा अथवा तूपात डीप फ्राय करा. एका दुसऱ्या भांड्यांत पाणी आणि साखर एकत्र मिसळून मंद आचेवर साधा पाक करून घ्या. या पाकात कमीत कमी चार तास मालपोहे बूडवून ठेवा. 

  Instagram

  छोलेसाठी भटूरे (Bhatura)

  छोले भटूरे हा भारतातील एक सर्वांचाच आवडता पदार्थ आहे. पंजाबमध्ये घरोघरी छोले भटूरे केले जातात. छोले म्हणजेच काबुली चण्यांची भाजी ही भटूरे सोबत खाण्यात  एक वेगळीच मजा आहे. भटूरे मैद्यारपासून तयार केले जातात यासाठी आम्ही तुमच्यासोबत घरच्या घरी भटूरे करण्याची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत.

  भटूरे करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • दोन कप मैदा
  • एक कप बारीक रवा
  • तेल
  • एक चमचा दही
  • पाव चमचा बेकिंग पावडर
  • एक चमचा साखर
  • चवीपुरते मीठ
  • पाणी

  भटुरे करण्याची कृती:

  मैदा आणि रवा चाळून घ्या. त्याच दही, मीठ, साखर, बेकिंग पावडर आणि थोडं तेल टाकून कणीक भिजवून घ्या. पाण्याचा वापर कमीत कमी करा. कणीक दोन  ते तीन तासांसाठी ओल्या फडक्याने झाकून ठेवा. ज्यामुळे ते चांगले फुलून वर येईल. कणकेचे समान भाग करा आणि पुरीप्रमाणे मात्र थोडे जाडसर  लाटून घ्या. गरम तेलात तळून गरमागरम भटूरे छोल्यांसोबत सर्व्ह करा. 

   

   

  Instagram

  मुग डाळ कचोरी (Moong Dal Kachori)

  राजकचोरी अथवा मुग डाळ कचोरी अनेकांचा आवडता पदार्थ असू शकतो. घरच्या घरी मुगडाळ कचोरी तयार करणं अगदी सोपं आहे. कचोरी करण्याचे अनेक प्रकार आहेत. मात्र त्यातील एक सोपा प्रकार आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. कचोरी खस्ता आणि खुशखुशीत होण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो. तेव्हा हे मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीतून अवश्य ट्राय करा.

  मुगडाळ कचोरीसाठी लागणारे साहित्य:

  • दोन कप मैदा
  • तेल
  • मीठ
  • अर्धा कप भिजवलेली मुग डाळ
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • धणे पावडर
  • बडीशेप
  • लाल मसाला
  • हिंग
  • आल्याची पेस्ट
  • गरम मसाला
  • जीरे

  मुगडाळ कचोरी करण्यासाठी कृती:

  मैदा, मीठ आणि तेल मिक्स करून कणीक मळून घ्या. कणीक अर्धा तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. मुगडाळ भिजल्यामुळे भुगल्यावर ती मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्या. पॅनमध्ये तेलावर थोडी परतून त्यात जीरे, हिंग, लाल मसाला, धणे पावडर,आल्याची पेस्ट, गरम मसाला आणि मीठ टाका आणि मिश्रण मिक्स करा. मुगडाळीतील पाणी कमी होऊन ती चांगली शिजली की गॅस बंद करा आणि मिश्रण थंड करा. मैद्यांच्या पीठाचे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी तयार करा व त्यात मूडडाळीचे मिश्रण भरा. कचोरी तयार करून मंद गॅसवर तळून घ्या.

  Instagram

  ब्राऊनी (Brownie)

  केक प्रमाणेच ब्राऊनी हा प्रकार सर्वांनाच खूप आवडतो.  लॉकडाऊनमध्ये अनेकांना केकचे विविध प्रकार ट्राय केले असतील. मात्र जर तुम्हाला ब्राऊनी खाण्याची ईच्छा झाली असेल तर मैद्यापासून तयार केलेली ही ब्राऊनी जरूर करून पाहा. 

  ब्राऊनीसाठी लागणारे साहित्य:

  • पाव किलो मैदा
  • दीड टेबलस्पून कोको पावडर
  • 150 ग्रॅम बटर
  • 150 ग्रॅम साख
  • पाच अंडी
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • चिमूटभर सोड
  • अक्रोड 

  ब्राऊनी करण्याची कृती:

  एका बाऊलमध्ये तीन अंडी आणि साखर फेटून घ्या. साखर विरघळल्यावर दोन अंडी टाका आणि पुन्हा बीट करा. या मिश्रणात चाळलेला मैदा, बेकिंग पावडर, सोडा मिसळा. मिश्रण पुन्हा बीट करा आणि  ओव्हनमध्ये 180 तापमानावर तीस मिनीटे बेक करा. 

  Instagram

  पॅन केक (Pancake)

  लहानमुलांपासून अगदी मोठ्यापर्यंत पॅनकेक हा प्रकार खुप आवडीचा आहे. विशेष म्हणजे यासाठी ओव्हन अथवा मायक्रोव्हेव या गोष्टींची गरज नसते.पॅनवर तुम्ही पॅनकेक तयार करू शकता. पॅनकेकचे विविध प्रकार आहेत. मात्र त्यातील एक बेसिक प्रकार आणि त्याची रेसिपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. पॅनकेक मैद्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे मैद्यापासून तयार केलेली ही रेसिपी नक्की ट्राय करा.

  पॅनकेकसाठी लागणारे साहित्य:

  • एक कप मैदा
  • एक अंडे
  • एक चमचा दूध
  • अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स
  • दीड चमचा साखर
  • अर्धा चमचा लिंबाचा रस
  • एक चमचा तेल अथवा तूप

  पॅनकेक करण्याची कृती:

  मैद्यामध्ये अंडे आणि इतर साहित्य घातून फेटून घ्या.  पॅन गॅसवर गरम करत ठेवा. तवा तापल्यावर त्यात पॅनकेक सोडा. दोन्ही बाजून तेल अथवा तूप लावून शेकवून घ्या. 

  Instagram

  समोसा (Samosa)

  बाजारातील गरमागरम समोसा खाणं तुम्ही नक्कीच मिस करत असाल. मात्र घरच्या घरीदेखील तुम्ही चमचमीत आणि क्रिस्पी समोसे  करू शकता. यासाठी आम्ही शेअर केलेली मैद्याचे पदार्थ रेसिपी मराठीत अवश्य ट्राय करा. 

  समोसे करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • अर्धा  किलो मैदा
  • शंभर ग्रॅम तूप
  • एक चमचा ओवा
  • चवीपुरते मीठ
  • अर्धा किलो बटाटे
  • एक वाटी मटार
  • एक चमचा गरम मसाला
  • दोन चमचे धणे पावडर
  • एक चमचा आमचूर पावडर
  • अर्धा चमचा जिरे पावडर
  • दहा ते पंधरा हिरव्या मिरच्याट
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • एक चमचा लाल मसाला

  समोसा करण्याची कृती:

  नैदा चाळून त्यात मीठ, ओवा मिसळा, तूपाचे मोहन टाकून मैदा  घट्ट मळून घ्या. अर्धा तास ओल्या फडक्या खाली ठेवा. सारणासाठी बटाटे उकडून घ्या. उकडेलेले मटार, हिरव्या मिरच्यांची  पेस्ट, कोथिंबीर आणि सर्व मसाले मिसळून सारण  तयार करा. कणेकेची ओव्हल शेपमध्ये पोळी लाटा. मधून ती सुरीने कापून त्याचे  दोन भाग करा. सारण त्यात भरा आणि  कॉर्नफ्लोअर अथवा मैद्याच्या पेस्टने चिकटवून त्याला समोशाचा आकार द्या. गरम तेलात तळून चमचमीत समोसे घरातल्यांना सर्व्ह करा. 

  Instagram

  पानीपुरी (Panipoori)

  पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. प्रत्येकाला पाणीपुरीचे वेड असते. मात्र बाजारात मिळणाऱ्या पाणीपुरीपेक्षा घरी केलेल्या पाणीपुरीच्या पुऱ्या जास्त टेस्टी असू शकतात. मैद्यापासून या पुऱ्या तयार करण्यासाठी ही रेसिपी अवश्य वाचा.

  पाणीपुरीसाठी लागणारे साहित्य:

  • एक वाटी बारीक रवा
  • पाव वाटी मैदा
  • अर्धी वाटी कोमट पाणी
  • तेल

  पाणी पुरीच्या पुऱ्या करण्याची कृती:

  रवा आणि मैद्यामध्ये बेताचे पाणी घालून घट्ट कणीक भिजवा. कणीक अर्धा तासासाठी ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. नंतर त्याची एक पातळ पोळी लाटून पाणीपुरीच्या आकाराच्या पुऱ्या साच्याने अथवा छाकणाने तयार करा. या पुऱ्या दहा ते पंधरा मिनीटांनी तळा. पाणी पुरीसाठी  तिखट आणि गोड पाणी तयार करा. रगडा, तिखट बुंदी, उकडलेले मुग अथवा बटाटा याने तुमच्या पाणीपुरीचा ठेला घरीच सजवा 

  Instagram

  कंरजी (Karanji)

  दिवाळी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात करंजी केली जाते. करंजी करण्यासाठी मेहनत कमी हवी असेल तर थोडं  स्मार्ट वर्क करण्याची गरज आहे. करंजीसाठी सारण भरपूर करून ठेवावं  मात्र थोडं थोडं कणीक मळून करंज्या कराव्यात. ज्यामुळे करंज्या खुसखुशीत होतील आणि त्या करण्याचा कंटाळा कमी होईल.

  करंजी करण्यासाठी लागणारे साहित्य:

  • एक कप मैदा
  • दूध
  • साजूक तूप
  • किसलेले खोबरे
  • मावा
  • पिठीसाकर
  • काजू
  • मनुका
  • बदाम
  • खसखस
  • चारोळ्या
  • वेलची पूड
  • जायफळ पूड

  करंजी करण्याची कृती:

  खोबऱ्याच्या किसात आवडीनुसार पिठीसाखर मिसळा. मावा कढईत भाजून घ्या. मिश्रणात तो मिसळून तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा मिसळून मिश्रण एकजीव करून सारण करून ठेवा. आयत्या वेळी मैदा चाळून दूध आणि मोहन घालून मळून घ्या. अर्धा तास ओल्या फडक्या खाली कणीक ठेवून द्या. त्यानंतर कणेकेच्या छोट्या छोट्या पोळा लाटून सारण भरून कंरज्या तयार करा. कढईत तूप गरम करून त्या तळून घ्या. 

  Instagram

  मसाला बिस्किट (Masala Biscuit)

  चाय टाईम स्नॅक साठी मसाला बिस्किट नक्कीच एक युनिक आणी हटके रेसिपी आहे. बेकरी प्रॉडक्ट असल्यामुळे या रेसिपी साठी तुम्हाला मैदा वापरावा लागेल. शिवाय हे बिस्किट तिखट असल्यामुळे तुम्हाला   स्नॅक्सचाही आनंद घेता येईल. 

  मसाला बिस्किट साठी लागणारे साहित्य:

  • दोन कप मैदा
  • एक कप तूप
  • एक चमचा लाल तिखट
  • एक चमचा आल्याचा रस
  • एक चमचा जिरे
  • अर्धा चमचा बेकिंग पावडर
  • हिंग
  • मीठ
  • पिठी साखर
  • पाणी

  मसाला बिस्किट करण्याची कृती:

  मसाला बिस्किट साठी दिलेले सर्व साहित्य  एका बाऊलमध्ये मिक्स करा. मळलेले कणीक एका अॅल्युमिनीअम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवा. थोड्यावेळाने रोल कुकीज कटर अथवा साच्याने शेपमध्ये कापून घ्या. 160 तापमानावर या कुकीज ओव्हनमध्ये वीस मिनीटे बेक करा. 

  Instagram

  स्वीट बन (Sweet Buns)

  पावप्रमाणेच स्वीट बन अथवा मिल्क बन भारतात लोकप्रिय आहे. सकाळी आणि संध्याकाळी चहासोबत हे पावाचे प्रकार खाल्ले जातात. स्वीट बन गोल आकाराचे असून ते मैद्यापासून तयार केले जातात. 

  स्वीट बन तयार करण्याचे साहित्य:

  • एक कप मैदा
  • तीन चमचे पिठी साखर
  • एक चमचा टूटी फ्रूटी
  • एक चमचा यीस्ट
  • एक चमचा तेल
  • एक कप पाणी
  • तीन चमचे मिल्क पावडर 
  • एक चमचा दूध
  • एक चमचा बटर

  स्वीट बन तयार करण्याची कृती:

  एका वाटीत गरम पाणी आणि यीस्ट मिसळून अॅक्टिव्हेट करा. एका मोठ्या भांड्यात मैदा, पिठी साखर आणि मिल्क पावडर चाळून घ्या.  त्यात तेल टाकून मिश्रण मिक्स करा. अॅक्टिव्हेट केलेलं यीस्ट त्यात मिसळा. कणीक मळून ते वीस मिनीटे झाकून ठेवा. वीस मिनीटांनी त्यात टूटीफ्रूटी मिसळा. कणकेचे दोन भाग करा. बटरने ग्रीस करून बेकिंग ट्रेमध्ये ठेवा  वरून ब्रशने दूध लावा आणि बेक करा.  तुम्ही हे बन तुमच्या कुकरमध्येही बेक करू शकता. मात्र यासाठी कुकरला शिटी लावू नका. 

  Instagram

  डोनट (Donuts)

  डोनट हा लहानमुलांचा एक आवडीचा पदार्थ असतो. आजकाल बच्चेकंपनीच्या वाढदिवसांच्या पार्टीसाठी हा मेन्यू हमखास ठेवला जातो. डोनटमध्ये निरनिराळे प्रकार असतात. आम्ही तुमच्यासोबत त्यातील एका प्रकारची रेसिपी शेअर करत आहोत. 

  डोनट साठी लागणारे साहित्य:

  • दोन कप मैदा
  • अर्धा कप दूध
  • पाव कप तूप अथवा बटर
  • दोन चमचे साखर
  • दहा ग्रॅम यीस्ट
  • चवीपुरते मीठ
  • तेल
  • पिठीसाखर
  • ब्राऊन चॉकलेट

  डोनट तयार करण्याची कृती:

  मैद्यामध्ये मीठ. साखर, यीस्ट दूध आणि बटर मिसळून कणीक भिजवून घ्या. पीठ चांगले मळून घ्या. या पीठाची एक मोठी आणि जाड पोळी लाटून घ्या. ग्लासने गोल आकार द्या. मधला आकार कापण्यासाठी छोट्या झाकणाचा वापर करा. डोनट दोन तास ओल्या फडक्याखाली झाकून ठेवा. दोन तासांनी ते तळा. ब्राऊन कलर आल्यावर ते टीश्यू पेपर वर काढा वरून पिठी साखर आणि चॉकलेट पावडर टाकून सर्व्ह करा. 

  https://www.instagram.com/p/CC9piiEA55B/