चमकदार आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा मेंदीसह हेअर पॅक्स

चमकदार आणि मुलायम केसांसाठी ट्राय करा मेंदीसह हेअर पॅक्स

चमकदार आणि मुलायम केस कोणाला नको असतात.  पण त्यासाठी सतत पार्लरमध्ये जाणं प्रत्येकाला परवडतं असं नाही. पण घरच्या घरी राहूनही तुम्हाला पार्लरसारखा लुक केसांना मिळवून द्यायचा असेल आणि केस मुलायम आणि चमकदार ठेवयाचे असतील तर तुम्ही मेंदीसह काही हेअर पॅक्स वापरून केसांना तशी चमक आणू शकता. केसांची जितकी काळजी घेऊ तितकी कमीच असते. केसांना आपण खूपच जपायला हवं. कारण एका विशिष्ट वयानंतर केसगळती, केसांचे पांढरे होणे या सगळ्या समस्या त्रासदायक ठरू लागतात. पण कायम तुम्हाला आपले केस चमकदार आणि मुलायम ठेवायचे असतील तर तुम्हाला मेंदीसह काही अप्रतिम हेअर पॅक्स कसे वापरायचे हे आम्ही या लेखातून सांगणार आहोत. तुम्ही नक्की त्याचा वापर करा आणि आपले केस अधिक मजूबत आणि सुंदर, आकर्षक बनवा. 

मेंदी आणि शिकेकाई

Shutterstock

मेंदी आणि शिकेकाई पावडर रात्रभर तुम्ही एकत्र भिजवून ठेवा. सकाळी हे मिश्रण नीट मिक्स करून घ्या आणि त्यात एक अंडे आणि एक मोठा चमचा दही मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण केसांना व्यवस्थित मुळापासून लावा आणि साधारण 45 मिनिट्स तसंच ठेवा. त्यानंतर तुम्ही केस थंड पाण्याने धुवा आणि केस धुताना केमिकलफ्री अर्थात रसायनमुक्त शँपूचा वापर करा. तुम्ही याचा उपयोग केल्यास, तुम्हाला चमकदार आणि आकर्षक केस मिळतील. तसंच तुमच्या केसांना रंगही उत्तम येईल. नेहमीच्या तुलनेत तुम्हाला तुमचे केस हातांना अधिक मऊ आणि मुलायम लागतील. 

केसांसाठी करताय मेंदीचा उपयोग, तर जाणून घ्या कशी करावी मिक्स

मेंदी आणि मुलतानी माती

Shutterstock

मेंदी आणि मुलतानी माती पाण्यात भिजवून त्याची गुठळ्या न राहता अशी पेस्ट करून घ्या. रात्री झोपण्याआधी ही पेस्ट तुम्ही केसांना लावा. जुना टॉवेल घ्या आणि तुमचे डोके गुंडाळा आणि रात्रभर ही पेस्ट अशीच केसाला राहू द्या. सकाळी उठल्यानंतर तुम्ही केमिकलमुक्त शँपूने केस धुवा. जास्त गरम पाण्याचा वापर करू नका. तुमच्या केसातील अधिक तेलाची मात्रा आणि घाण स्वच्छ करण्यासाठी या मिश्रणाचा उपयोग होतो. तसंच यामुळे केसगळतीचे प्रमाण कमी होते आणि केसांना अधिक चांगला मऊपणा येतो.

मेंदी आणि जास्वंदीची पाने

Shutterstock

एक मूठ मेंदीची पाने आणि एक मूठ जास्वंदीची पाने व्यवस्थित धुवा आणि एकत्र वाटून घ्या. याची जी पेस्ट होईल त्यामध्ये 1 मोठा चमचा लिंबाचा रस मिक्स करा आणि हे मिश्रण तुम्ही अगदी स्काल्पपासून केसांना व्यवस्थित लावा. साधारण अर्धा तास केसांवर हा लेप तसाच राहू द्या. नंतर कोमट पाण्याने केस धुवा. कोंड्यापासून सुटका मिळविण्यासाठी आणि केसांना अधिक चमकदार आणि मुलायम करण्यासाठी तुम्हाला हे मिश्रण उपयुक्त ठरते. तुम्ही हा हेअर पॅक आठवड्यातून एक वेळा केसांना लावा आणि त्याचा परिणाम तुम्हाला नक्की चांगला दिसून येईल.

केस आयुष्यभर दाट आणि काळे राहण्यासाठी मेंदीमध्ये करा हे तेल मिक्स

मेंदी आणि नारळाचा रस

Shutterstock

तुमचे केस फ्रिजी असतील आणि त्यांना योग्य कंडिशनिंग देऊन मुलायम करायचे असेल तर तुम्ही एक कप नारळाचा रस काढा आणि तो कोमट करा. त्यामध्ये 10 लहान चमचे मेंदी पावडर आणि 4 चमचे ऑलिव्ह ऑईल मिक्स करून एक व्यवस्थित पेस्ट तयार करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट स्काल्प आणि केसांना अगदी व्यवस्थित लावा. साधारण एक तास झाल्यावर थंड पाण्याने केमिकलफ्री शँपूने केस धुऊन घ्या. तुम्हाला याचा चांगला परिणाम पाहायला मिळतो. 

हर्बल मेंदी बनवून केसांवर कसा करायचा वापर, काय होतात फायदे जाणून घ्या

मेंदी आणि कॉफी

Shutterstock

1 मोठा चमचा कॉफी आणि 1 कप पाणी घेऊन हे पाणी उकळा. त्यानंतर हे पाणी कोमट होऊ द्या. त्यामध्ये मेंदी पावडर मिक्स करा. आपल्या गरजेनुसार पाणी मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट तुम्ही संपूर्ण केसांना लावा. 3-4 तासानंतर तुम्ही हे सल्फेटफ्री शँपूने केस धुवा आणि केसांना कंडिशनर करा. तुमच्या केसांना मुलायमपणासह उत्तम रंग आलेला तुम्हाला दिसेल. तुम्हाला वेगळा रंग लावण्यासाठी पार्लरला जाण्याचीही गरज नाही. अगदी नैसर्गिक लाईट ब्राऊन तुमच्या केसांना मिळेल.