कोरड्या आणि निस्तेज केसांची पावसाळ्यात अशी घ्या काळजी

कोरड्या आणि निस्तेज केसांची पावसाळ्यात अशी घ्या काळजी


पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. ज्यामुळे वातावरण मस्त थंड आणि आल्हाददायक झालं आहे. मात्र अशा वातावरणात केसांच्या समस्या अधिकच वाढू शकतात. कारण वातावरणात आर्द्रता वाढल्यामुळे तुमचे केस सतत ओलसर राहतात. शिवाय यामुळे तुमच्या स्काल्पवर दुष्परिणाम होऊ शकतो. केसांमध्ये चिकटपणा वाढल्यामुळे कोंडा आणि इतर समस्या निर्माण होतात. बऱ्याचदा यामुळे या काळात केस गळण्याची समस्या वाढू लागते. त्यात जर तुमचे केस आधीच फ्रिझी आणि अनमॅनेजबल असतील तर तुमचा त्रास अधिकच वाढू शकतो. मात्र अगदी छोटे आणि सोपे उपाय करून तुम्ही पावसाळ्यातही तुमच्या फ्रिझी केसांची निगा राखू शकता. यासाठी आम्ही शेअर केलेल्या या पाच टिप्स अवश्य फॉलो करा. 

केसांवर कंगवा अथवा हेअर ब्रश योग्य पद्धतीने फिरवा -

केस ओले असताना कंगवा करणे अथवा हेअर ब्रश फिरवल्यामुळे केस तुटण्याची आणि गळण्याची शक्यता वाढते. केस तुटू लागले की ते कोरडे, खरखरीत आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच ओले केस जाड दात असलेल्या कंगव्याने विंचरा ज्यामुळे तुमच्या केसांचा गुंता होणार नाही. 

आठवड्यातून एकदा हेअर मसाज करा -

केसांच्या आरोग्यासाठी केसांना नियमित तेल लावणं फार गरजेचं आहे. मात्र पावसाळ्यात तुमच्या केसांना अधिक प्रेम आणि निगेची गरज असते. नियमित अथवा कमीत कमी आठवड्यातून एकदा केसांना तेलाने मसाज केल्यामुळे तुमचा स्काल्प निरोगी आणि सशक्त होतो. ज्यामुळे केस मुळापासून तुटण्याची शक्यता कमी होते. केसांना योग्य पोषण मिळाल्यामुळे केस मऊ आणि मुलायम होतात. केसांना तेलाने मसाज करण्यासाठी तुम्ही केसांवर पॅराशूट कंपनीचे (Parachute Advansed Aloe Vera Enriched Coconut Hair Oil) वापरू शकता. यात असलेल्या नारळाचे शुद्ध तेल आणि कोरफडीचा अर्क यांच्या मिश्रणामुळे तुमच्या केसांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो. शिवाय हे तेल नॉनस्टिकी असल्यामुळे तुम्ही याचा वापर नियमित केसांवर करू शकता. जर तुमचे केस फ्रिझी आणि निस्तेज असतील तर हे तेल तुमच्यासाठी वरदान ठरू शकते. कारण त्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतील. 

Hair Products

Parachute Advansed Aloe Vera Enriched Coconut Hair Oil

INR 102 AT Parachute

तुमची केस धुण्याची पद्धत बदला -

जर तुम्ही दररोज गरम पाण्याने केस धुत असाल तर तुम्हाला ही सवय बदलणं गरजेचं आहे. कारण दररोज गरम पाण्याने केस धुतल्यामुळे तुमच्या केसांमधील आवश्यक नैसर्गिक तेल निघून जाते. ज्यामुळे अधिक कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. यासाठीच आठवड्यातू फक्त दोनदा अथवा तीनदा तुमचे केस धुवा. शिवाय केस धुण्यासाठी गरम पाण्यापेक्षा कोमट अथवा  थंड पाण्याचा वापर करा.

पावसाचा आनंद घ्या मात्र केस लगेचच कोरडे करा -

पाऊस आणि मौजमस्ती यांचा एक अनोखा संबंध आहे. सध्या कोरोनामुळे पावसाळी पिकनिकवर निर्बंध असले तरी घराच्या अंगणात, बाल्कनीत, टेरेसवर पावसाचा आनंद लुटण्यास नक्कीच काही हरकत नाही. मात्र पावसात भिजल्यावर लगेचच तुमचे केस कोरडे करायला विसरू नका. कारण पावसाच्या पाण्यामुळे तुमचा स्काल्प चिकट आणि ओलसर राहू शकतो. ज्यामुळे तुमच्या केसांचं अधिकच नुकसान होतं. केस पुसण्यासाठी एखादा सुती अथवा मऊ टर्कीशच्या टॉवेलचा वापर करा. शिवाय केस घासून अथवा रगडून पुसू नका. कारण त्यामुळे तुमचे निस्तेज केस लवकर तुटू शकतात. केस लवकर वाळण्यासाठी ब्लो ड्राय करणे टाळा.

केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधने वावरणे टाळा -

केस स्टाईलिश दिसण्यासाठी अनेकदा केसांवर हेअर प्रॉडक्टचा मारा केला जातो. स्टाईलिंग टूल्स आणि प्रॉडक्टमध्ये केमिकल्स वापरण्यात आलेली असतात. यासाठी पावसाळ्यात केसांची निगा राखण्यासाठी अशा उत्पादनांपासून दूर राहा. त्यापेक्षा नैसर्गिक घटक असलेली उत्पादने वापरा. ज्यामुळे केस मजबूत आणि निरोगी होतील.