बऱ्याचदा आपण बघतो की सतत चष्मा लावणाऱ्या व्यक्तींच्या नाक आणि डोळ्याच्या आजूबाजूला डाग पडतात. त्यामुळे चष्मा काढल्यानंतर अर्थातच आपल्या सौंदर्याला हा एक डाग लागलेला दिसून येतो. बऱ्याच जणांना वाटतं की एकदा चष्म्याचे डाग हे एकदा चेहऱ्यावर आले की जातच नाही. पण असे अजिबातच नाही. चष्म्याचे डाग चेहऱ्यावरून काढण्यासाठी नेमकं काय करायचं, ही समस्या कशी सोडवायची यासाठी आम्ही काही घरगुती उपाय तुम्हाला सांगत आहोत. हे घरच्या घरी अतिशय सोपे उपाय करून तुम्ही पुन्हा एकदा आपल्या चेहऱ्यावरील चमक परत आणू शकता आणि चष्म्यामुळे निर्माण झालेले डाग तुम्ही नक्कीच घालवू शकता. पाहूया काय करता येतील उपाय -
कोरफडची अगदी ताजी पानं घ्या आणि त्यातून जेल काढून डोळ्यांखाली झालेल्या काळ्या डागांवर तुम्ही लावा आणि अगदी खोलवर झालेल्या काळ्या डागांवरही तुम्ही हे जेल लावा. जेल सुकल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. काही दिवसातच तुम्हाला त्याचा योग्य परिणाम दिसून येईल.
डार्क सर्कल्स दूर करा घरगुती उपायांनी! (Home Remedies For Dark Circles In Marathi)
संत्र्याची सालं सुकवून त्याची पावडर बनवा. या पावडरमध्ये थोडंसं दूध मिसळून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुम्ही डोळ्यांखाली झालेल्या अथवा नाकावरील काळ्या डागांवर लावा. साधारण 15-20 मिनिट्सनंतर ही पेस्ट सुकेल आणि त्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. केवळ डाग हटविण्यासाठीच नाही तर या पेस्टमुळे चेहऱ्यावर चमकदेखील येते.
मधामध्ये थोडेसे दूध आणि ओट्स नीट व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे मिश्रण तुम्ही काळे डाग आणि डाग असणाऱ्या ठिकाणी लावा. हे मिश्रण सुकू द्या आणि मग थंड पाण्याने चेहरा धुवा. तुम्ही याचा नियमित वापर केल्यास, तुम्हाला या परिणाम लवकर दिसून येईल.
मानेवरील काळे डाग घालवायचे असतील करा सोपे उपाय (How To Get Rid Of Dark Neck In Marathi)
कच्च्या बटाट्याची पेस्ट बनवा आणि डाग असणाऱ्या ठिकाणी ही पेस्ट लावा. जेव्ही पेस्ट सुकेल अर्थात किमान 15-20 ही पेस्ट तशीच चेहऱ्यावर राहू द्या. तुम्ही ही पेस्ट नियमित वापरल्यास, चेहऱ्यावर कोणताही डाग राहणार नाही. याचा प्रभाव लवकर त्वचेवर होऊन डाग लवकर निघून जातात.
चेहऱ्यावरील काळे डाग घालवायचे असतील तर करा सोपे उपाय- Home Remedies For Dark Spots On Face
एक सॉफ्ट कापसाचा बोळा घेऊन गुलाबपाण्यात बुडवून घ्या आणि डोळ्यांच्या आसपासच्या जागेवर तो फिरवा. थोड्या वेळानंतर थंड पाण्याने डोळे धुवा. गुलाबपाणी हे एक नैसर्गिक स्किन टोनर आहे. यामुळे केवळ डाग निघूनच नाही जाणार तर तुमचे डोळेदेखील अधिक सुंदर आणि निरोगी दिसतील.
काकडीचे तुम्ही अगदी पातळ काप काढून घ्या. चष्म्याने झालेल्या डागावर काकडीचे हे काप आणि त्याशिवाय डोळ्यावरही किमान अर्धा तास ठेवा. त्यानंतर अगदी हलक्या हाताने काकडीचे हे काप डागांवर आणि डोळ्यांवर चोळा. यामुळे डाग निघून जाण्यास मदत मिळते.
ताज्या लिंबाचा रस काढा आणि त्यात थोडंसं पाणी मिसळा. सॉफ्ट कापसाचा बोळा घ्या आणि तो त्यात बुडवून डाग असणाऱ्या ठिकाणी फिरवा. साधारण 15-20 मिनिट्स झाल्यानंतर तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. नियमित तुम्ही याचा वापर केल्यास, चष्म्यामुळे झालेले डाग निघून जायला मदत मिळते.
घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर