स्वच्छ, नितळ त्वचा सगळ्यांनाच हवी असते. चांगली त्वचा मिळवण्यासाठी आपण सगळेच बरेच प्रयोग करतो . महिन्यातून एकदा फेशिअल करतो. आठवड्यातून एकदा स्क्रब करतो. रोज दिवसातून दोन वेळा तरी फेसवॉस करतो. ही काळजी घेऊनही जर तुमच्या त्वचेवर फरक पडत नसेल तर तुम्हाला एक्सपर्टची गरज आहे. आज आम्ही तुम्हाला ज्या स्किनट्रिटमेंटची माहिती देणार आहोत ती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण त्यामुळे तुमच्या त्वचेवर कोणताही दुष्परीणाम होणार नाही. तर तुम्हाला त्यामुळे नितळ, स्वच्छ आणि चमकदार त्वचा अगदी हमखास मिळेल. एक्सपर्ट्सच्या निदर्शनाखाली ही ट्रिटमेंट तुम्हाला दिली जाते. त्याला ‘मेडिफेशियल’ असे म्हटले जाते. त्वचेसाठी मेडिफेशियल करणे किती फायदेशीर आहे ते आज आपण जाणून घेऊया.
फेशियलप्रमाणेच मेडिफेशियल केले जाते. याची प्रक्रियाही साधारणपणे सारखीच असते. पण यामध्ये तुमच्या चेहऱ्याला कोणतीही दुखापत केली जात नाही. म्हणजे फेशियल प्रमाणे फक्त ब्लॅक हेड्स काढून तुमचा चेहरा स्वच्छ करणे हे उद्दिष्टय नसते. तर तुमच्या चेहऱ्याच्या आतपर्यंत जाऊन तुमची त्वचा स्वच्छ करणे हा या मागचा उद्देश्य असतो. त्यामुळे तुम्हाला मशीनच्या साहाय्याने मसाज केला जातो. शिवाय यामध्ये असलेल्या वेगवेगळ्या प्रकारानुसार तुमच्यावर मशीनचा प्रयोग केला जातो. आता मशीनचा प्रयोग म्हणजे घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. या मशीनचा वापर केल्यामुळे तुम्हाला अधिक आरामही मिळतो. इतर कोणत्याही पार्लर फेशियलप्रमाणे यामध्येही वेगवेगळे प्रकार असतात. ते तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने करु शकता.
जर तुम्ही एखाद्या खास समारंभासाठी तयार होण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला मेडिफेशियल करायचे असेल तर सगळ्यात आधी ज्या क्लिनिकची तुम्ही निवड करता तिथे तुम्ही कधीही ट्रिटमेंट घेतली नसेल तर तुमची त्वचा आणि त्याचा प्रकार आणि तुम्ही गरज डॉक्टरांना जाणून घेणे गरजेचे असते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा प्रकार आधी पाहिला जातो.
आता जर तुम्ही फेशियल करण्याचा विचारा करत असाल तर या मेडिफेशियलचा विचार नक्की करा.