ट्रेंडी ब्लाऊज वापरून साडीला द्या क्लासी लुक

ट्रेंडी ब्लाऊज वापरून साडीला द्या क्लासी लुक

फॅशन म्हणजे तोकडे कपडे अथवा आधुनिक कपडे घातले म्हणजे असे होत नाही. तुम्ही जर साडी नेसत असाल तर त्यामध्येही वेगवेगळी फॅशन करू शकता. साडीपेक्षाही आजकाल ब्लाऊजचे लुक अप्रतिम असतात. त्यातही तुम्हाला जर क्लासी दिसायचे असेल तर तुम्ही कॉटन आणि ट्रेंडी ब्लाऊज नक्कीच ट्राय करायला हवेत. तुम्ही साडीप्रेमी असाल तर वेगवेगळे कॉटन ब्लाऊज तुम्हाला नक्कीच वापरता येऊ शकतात आणि हे  ब्लाऊज तुम्हाला अधिक क्लासी लुक मिळवून देतात. अगदी तुमच्या जुन्या साडीलाही उठावदार लुक येऊ शकतो आणि तुम्ही अगदी ग्रेसफुली ही साडी कॉटन ब्लाऊजसह नेसून वेगवेगळ्या कार्यक्रमांना जाऊ शकता. बाजारात तुम्हाला अनेक तयार कॉटन आणि ट्रेंडी ब्लाऊजही दिसत असतील त्याचा तुम्ही तुमच्या कॉन्ट्रास्ट साड्यांसाठीही उपयोग करून घेऊ शकता. यामध्येही वेगवेगळे प्रकार असतात. कॉटन ब्लाऊजचे हे प्रकार आपण जाणून घेऊया. 

खादी ब्लाऊज

बऱ्याच जणांना खादी हा प्रकार आवडतो. मुळात हा स्वदेशी प्रकार असल्याने आणि या कपड्यामुळे त्वचेला कोणताही त्रास होत नसल्याने खादीचे ब्लाऊज वापरणं बऱ्याच महिलांना आवडतं.  तसंच खादीचे ब्लाऊज घातल्यानंतर साडीलाही एक वेगळा लुक येतो. साधारण ऑफ व्हाईट रंगामध्ये मिळणारे हे ब्लाऊज पारंपरिक असले तरीही फॅन्सी आणि क्लासी वाटतात. या ब्लाऊजमध्ये आपल्याला स्लिव्हलेस विथ स्टँड कॉलर, हाताला फ्रिल असणारे अथवा अगदी साधे असे प्रकारही आढळतात. तुमची साडी कशी आहे अथवा तुम्हाला कोणता पॅटर्न छान वाटतो त्यानुसार तुम्ही निवड करू शकता. तुम्हाला साडी आणि ब्लाऊजच्या मॅचिंग आणि कॉन्ट्रास्टचे गणित व्यवस्थित जमत असेल तर तुम्ही नक्की हा कॉटन खादी ब्लाऊज ट्राय करायला हवा. 

साडीबरोबर घाला हे 7 Sexy ब्लाऊज

कलकारी ब्लाऊज

कॉटन कपड्यातील कलकारी हा प्रकार खूपच प्रसिद्ध आहे आणि सध्या हा प्रकार जास्त ट्रेंडमध्येही आहे. रेडीमेड ब्लाऊजमध्ये असे ब्लाऊज आजकाल जास्त प्रमाणात मिळतात. या ब्लाऊजमध्ये अनेक व्हरायटी बघायला मिळते. त्यामध्ये तुम्हाला अॅनिमल प्रिंट, हिस्टॉरिक प्रिंट अथवा अॅबस्ट्रेक्ट प्रिंट अशा व्हरायटी दिसतात. कलकारी डिझाईन्स या बऱ्याच जणांना दिसायला जुनाट वाटल्या तरीही हा ब्लाऊज तुम्ही कॉटन साडीवर घातल्यानंतर याचं कॉम्बिनेशन अप्रतिम दिसतं. तसंच तुम्हाला एक वेगळा आणि क्लासी लुक मिळतो. यावर तुम्ही ऑक्सिडाईज्ड दागिने घातले तर त्यावर अधिक साज चढतो. हे ब्लाऊज घातल्यानंतर अधिक क्लासी आणि छान दिसतात. तुम्हाला जर यामध्ये प्रिंटेड ब्लाऊज घालायचे असतील तर त्यावर तुम्ही सिल्कची अथवा शिफॉन साडी नेसू शकता. शिवाय कॉटन साडी असेल तरीही तुम्हाला त्याच्या रंगानुसार निवड करावी लागेल.

ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क... सांगतेय विद्या बालन

इक्कत ब्लाऊज

तुम्हाला बॉर्डरच्या अथवा कॉटन साडी नेसायची आवडत असेल तर तुम्हाला इक्कत ब्लाऊज हा ट्रेंड नक्कीच आवडेल. चेक्स  अथवा वेगवेगळ्या बुट्टीचे आणि गडद रंगाचे हे ब्लाऊज तुमच्या साडीची शोभा अधिक वाढवतात. मिसमॅच करून हे ब्लाऊज तुम्ही वापरू शकता. विशेषतः गडद साड्यांची शोभा वाढविण्यासाठी तुम्हाला हे ब्लाऊज उपयोगी ठरतात. सध्या हे ब्लाऊज अधिक ट्रेंडमध्ये आहेत. खून साडी अर्थात इक्कत अथवा इरकल साडीसह हे ब्लाऊज दिसायला तर चांगले दिसतातच पण त्याचबरोबर तुम्हाला अधिक कम्फर्टेबल ठेवतात  आणि तुम्हाला घामाचा अधिक त्रास होत असेल तर तुम्ही नक्की असे ब्लाऊज ट्राय करावेत. कारण घाम पटकन शोषून घेण्यास हे ब्लाऊज अधिक सोयीस्कर आहेत. 

सणाच्या दिवसात खास लुक देतील ब्लाऊजचे हे हॉट डिझाईन्स

बॅकलेस ब्लाऊज

सध्या या ब्लाऊजचाही ट्रेंड चालू आहे. बॅकलेस ब्लाऊज म्हटलं की हल्ली वेगवेगळ्या कार्यक्रमांना असे ब्लाऊज शोभून दिसतात. डिझाईनर असो वा कॉटन असो कोणतेही बॅकलेस ब्लाऊज, स्लिव्हलेस बॅकलेस अथवा नॉटवाले बॅकलेस ब्लाऊज हे सध्या ट्रेंडमध्ये आहेत. शिफॉनच्या साडीवर अथवा अगदी पैठणीवरसुद्धा हे ब्लाऊज अप्रतिम दिसतात. मुळात हल्ली साड्यांपेक्षाही ब्लाऊजचा ट्रेंड जास्त आहे. ब्लाऊज आणि साडीचे कॉम्बिनेशन योग्य असणे गरजेचे आहे.