स्वप्नात दिसत असेल सेक्स तर त्याचा अर्थ नक्की काय आहे जाणून घ्या

स्वप्नात दिसत असेल सेक्स तर त्याचा अर्थ नक्की काय आहे जाणून घ्या

स्वप्नं बऱ्याच जणांना  दिसतात आणि स्वप्नं दिसणं ही अतिशय सामान्य बाब आहे. वेगवेगळ्या स्वप्नांमध्ये सेक्सची स्वप्नंही दिसतात. पण यात काही गैर आहे असं वाटून घेऊ नका. कारण तुम्ही एकटे नाहीत ज्यांना स्वप्नात सेक्स करतानाची जाणीव होते. स्वप्न म्हणजे तुम्हाला आयुष्यात काहीतरी हवं असणं. त्यामुळे सेक्स दिसत असेल तर त्याचा अर्थही तसाच असतो. तुम्हाला आयुष्यात काहीतरी कमतरता जाणवत असते तेव्हा स्वप्नात ती कमतरता पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. पण त्या स्वप्नाचा नक्की अर्थ काय हे जाणून घ्यायचीही तुमची इच्छा असते. आपण कधीतरी स्वप्नात आपल्या एक्ससह सेक्स करताना पाहतो, तर कधी कोणी सेलिब्रिटी, कधी अनोळखी व्यक्ती तर कधी आपल्या जोडीदारासह. पण या प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो आणि तो आपल्या कुटुंबाशी, करिअरशी आणि आयुष्याशी निगडीत असतो. या लेखातून आम्ही त्याचाच अर्थ उलगडण्याचा प्रयत्न करत आहोत. 

एक्ससह सेक्स

Shutterstock

बऱ्याच जणांना स्वप्नात आपला एक्स दिसतो. पण याचा अर्थ हा नाही की अजूनही तुमच्या मनात त्याच्याविषयी काही भावना असतील. पण ज्याप्रमाणे तुमचं नातं संपलं असेल त्याचं दुःख अजूनही तुमच्या मनात असण्याची शक्यता असते. त्याच्याबरोबर अजूनही काही अशा गोष्टी असतील ज्या तुमच्या मनात राहिल्या असतील आणि त्या सोडवणं तुम्हाला जमलं नसेल. मनात तशाच राहिल्या असतील. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला एकदा फोन करून त्याच्याशी बोलून हे संपवू शकता. 

भांडण मिटवण्यासाठी उत्तम उपाय आहे मेक-अप सेक्स

सेलिब्रिटीसह सेक्स

आपल्या आवडत्या सेलिब्रिटीसह सेक्स स्वप्नात बऱ्याच जणांना अनुभवता येतं. याचा अर्थ त्याच्याविषयी तुमच्या मनात अशा काही भावना आहेत ज्या तुम्ही फक्त स्वप्नात पूर्ण करू शकता. कधी कधी आपण एखाद्या सेलेब्रिटीशी इतके गुंतलेलो असतो की त्याच्याविषयी प्रेमभावना जागृत होतात आणि त्यामुळेच स्वप्नात त्याच्यासह सेक्सची भावना निर्माण होते. तसंच तुम्हाला त्याच्याइतकीच प्रशंसा आणि प्रेम हवं असतं म्हणून तुम्हाला स्वप्नात त्याच्यासह अधिक वेळ राहायचं असतं. 

‘या’ नुकसानांपासून वाचायचं असेल तर करा प्राचीन नियमानुसार सेक्स

अनोळखी व्यक्तीसह सेक्स

Shutterstock

यामध्ये कदाचित तुम्हाला भीती वाटेल की तुम्हाला असं स्वप्नं कसं येऊ शकतं. ज्या व्यक्तीला ओळखतच नाही त्याच्याविषयी अशा भावना निर्माण होऊन तुम्ही स्वप्नात सेक्सपर्यंत पोहचता तरी कसे? आपण आपल्या जोडीदाराला फसवत तर नाही अशीही भावना मनात येऊ शकते. पण असं काहीही नाही. तुम्ही सध्या असलेल्या नात्यात तुम्ही जर सुखी नसाल आणि या नात्याविषयी तुमच्या मनात काही शंका असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे स्वप्नं  दिसू शकते. अनोळखी व्यक्ती न दिसता जर एखाद्या जवळच्या व्यक्तीसह तुम्हाला सेक्सचे स्वप्न दिसत असेल तर त्या व्यक्तीविषयी तुमच्या मनात काही वेगळ्या भावना निर्माण झाल्याचे हे लक्षण आहे. 

जोडीदाराचे कोणा दुसऱ्या व्यक्तीबरोबर सेक्स

महिलांना असं स्वप्न बऱ्याचदा दिसतं. साधारण 5 महिलांपैकी 1 महिला असं याचं प्रमाण असल्याचं म्हटलं जातं. वर्षातून एकदा अथवा अगदी सहा महिन्यातून एकदा असं स्वप्न दिसू शकतं. तुमच्या जोडीदाराबरोबर तुमचं नातं नीट नसेल  अथवा कधीतरी तुम्हाला त्याच्यावर संशय येत असेल त्यावेळी तुम्हाला असं स्वप्नं  दिसू शकतं. तुम्हाला तुमचा जोडीदार कधीतरी सोडून जाईल असं कुठेतरी वाटत असतं त्यामुळे अशा तऱ्हेची स्वप्न दिसण्याची शक्यता असते. पण ही फक्त एक भीती असते.  तुम्हाला असं काही वाटत असेल तर वेळीच जोडीदाराशी बोला.  

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

बॉससह सेक्स

Shutterstock

बऱ्याचदा काही जणींना या स्वप्नाने त्रास होतो. याचा अर्थ तुमच्या मनात बॉसविषयी काही भावना आहेत असा होतो असं नाही तर तुम्हाला आयुष्यात काहीतरी चांगलं करायचं असतं किंवा तुमच्या खांद्यावर काही विशिष्ट जबाबदारी येणार असते तेव्हा असं स्वप्नं दिसतं. बॉससह सेक्स या स्वप्नाचा अर्थ तुम्हाला लवकरच एखादी मोठी पोस्ट मिळण्याची शक्यता असते. 

सेक्स करण्याचे नक्की फायदे काय

प्रायव्हेट पार्ट्सचं स्वप्नं

तुम्हाला स्वप्नात एखाद्या पुरुषाचा प्रायव्हेट पार्ट अर्थात पेनिस दिसत असेल तर तुमच्यासह लवकरच काहीतरी आक्रमक असे घडणार आहे. तुम्हाला जर तुमची छाती अर्थात ब्रेस्ट दिसत असेल तर तुम्हाला तुमच्या पोषक अन्नावर लक्ष देण्याची अत्यंत गरज आहे. तसंच तुम्हाला तुमचा प्रायव्हेट भाग दिसत असेल तर तुमच्या सेक्सुअल इच्छा जागृत झाल्या असून वेळीच त्याकडे लक्ष देण्याची गरज  असल्याचा हा इशारा आहे.