ADVERTISEMENT
home / Fitness
परफ्युम लावत असाल तर तुम्हाला माहीत हवेत त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Perfume)

परफ्युम लावत असाल तर तुम्हाला माहीत हवेत त्याचे दुष्परिणाम (Side Effects Of Perfume)

घरातून बाहेर पडताना दिवसभर सुगंधी राहावं म्हणून आपण परफ्युम लावतो. पण काहींना परफ्युमचे एवढे व्यसन असते की, ते सतत सुगंधी राहावे म्हणून अति परफ्युमचा वापर करतात. अशा कितीतरी लोकांना तुम्ही ओळखत असाल. पण तुम्हाला माहीत आहे का? परफ्युमच्या अशा सतत वापरण्याचा परिणाम तुमच्या शरीरावर खोलवर होत असतो. परफ्युम वापरणे ही वाईट गोष्ट नसली तरी त्याच्या अतिवापराचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि एकूणच आरोग्यावर होतात. म्हणूनच आज जाणून घेऊया परफ्युम लावण्याचे दुष्परिणाम.

परफ्युमचे होणारे दुष्परिणाम (Side Effects Of Perfume In Marathi)

परफ्युमच्या अति लावण्याचे तुमच्या शरीरावर काही दुष्परिणाम होतात. हे दुष्परिणाम कोणते ते आज आपण जाणून घेऊया. म्हणजे एखाद्या परफ्युमच्या वापरानंतर तुम्हाला त्रास झाला तर त्यावर काय इलाज करायचा हे समजू शकेल.

जाणून घ्या तुमच्यासाठी कोणते डिओड्रंट आहेत बेस्ट (Best Deodorant For Women In Marathi)

ADVERTISEMENT

अस्वस्थपणा (Dizziness)

जर तुम्ही परफ्युम नेहमी वापरत असाल आणि तुम्हाला ठराविक सेंट आवडत असेल तर त्याचा त्रास तुम्हाला होत नाही. कारण दुकानात गेल्यानंतर परफ्युम निवडताना आपण असा सुगंध निवडतो जो तुम्हाला पटकन आवडतो. पण कधी कधी आपण एखादा नवा परफ्युम वापरल्यानंतर अचानक आपल्याला त्रास होऊ लागतो. आता हा नवा परफ्युम कदाचित तुमच्या रोजच्या सवयीचा नसल्यामुळे आणि त्याचा सुगंध उग्र असल्यामुळे अचानक आपली तब्येत बिघडली असे आपल्याला वाटू लागते. परफ्युमच्या वापरामुळे होणारा हा दुष्परिणाम तुम्हाला ही जाणवू लागला की, तुम्ही लगेचच त्या सुगंधापासून थोडे लांब व्हा. मस्त मोकळ्या हवेत राहा. तुमचा श्वासातून शरीरात गेलेल्या परफ्युमच्या सुगंधाला शरीरातून बाहेर जाण्यासाठी थोडा वेळ द्या म्हणजे तुम्हाला बरे वाटेल.

शरीरावर फोड येणे (Blisters On Body)

त्वचेवर फोड येणे - Side Effects Of Perfume In Marathi

shutterstock

परफ्युम हे लिक्विड आणि गॅस अशा दोन्ही रुपात मिळतात. पण गॅस फॉर्ममध्ये असेल तर आपण त्याला डिओड्रंट स्प्रे असे म्हणतो. द्रव्य रुपात असेल तर त्याला परफ्युम असे म्हणतात. साधारणपणे काखेत, छातीवर आपण परफ्युम मोठ्या प्रमाणात लावतो. आपल्या शरीरावर अनेक छिद्र असतात तुमच्या घामाचे उत्सर्जनही त्यातून होत असते. तुमच्या छिद्रांमध्ये परफ्युम गेले तर त्यामुळे तुम्हाला पुळया येण्याची शक्यता असते. अशा पुळ्यांमध्ये पू साचतो. अनेकदा तुम्हाला मोठ्या पुळ्या येत नाहीत. पण बारीक पुटकुळ्या येण्याचीही शक्यता असते. त्यामुळे परफ्युमचा असाही त्रास तुम्हाला होऊ शकतो. ज्यांची त्वचा अतिसंवेदनशील असेल तर त्या व्यक्तीला हा त्रास होण्याची शक्यता सगळ्यात जास्त असते. 

ADVERTISEMENT

मळमळणे (Nausea)

काही गोष्टींसाठी आपले शरीर कायमच आपल्याला नकार देत असते. एखादी गोष्ट शरीराला पटली नाही की, आपले शरीर या गोष्टी बाहेर टाकते. परफ्युममध्ये असलेल्या काही घटकांमुळे मळमळण्याचा त्रासही तुम्हाला होऊ शकतो. अस्वस्थपणा आणि मळमळ साधारण तुम्हाला यामध्ये सारखीच वाटू शकते. एखाद्या परफ्युमच्या वासाने तुम्हाला हा त्रास होत असेल तर तुम्ही त्याचा वापर त्याच क्षणी थांबवायला हवा. 

उदा. मोगरा किंवा काही फुलांच्या सुगंधाचे परफ्युम फार तीव्र असतात. त्याचा वास तुमच्या शरीरात इतका भिनतो की, त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.

डोकेदुखी (Headache)

डोकेदुखी - परफ्युमचे होणारे दुष्परिणाम

shutterstock

ADVERTISEMENT

अत्यंत सर्वसाधारण आणि पटकन जाणवणारा त्रास म्हणजे डोकेदुखी. एखादे परफ्युम हुंगल्यामुळे आपल्याला डोकेदुखीचा त्रास पटकन होऊ शकतो. ही डोकेदुखी काही काळासाठी जरी असली तरी त्याचे परिणाम दीर्घ असतात. जर तुम्हाला डोकेदुखीचा त्रास असेल तर तुम्ही परफ्युमचा वापर टाळा. कारण डोकेदुखी जास्त झाली की, कामावरील तुमची इच्छाही उडून जाते. त्यामुळे परफ्युमच्या अतिवापरामुळे होणारा हा त्रास अगदी स्वाभाविक आहे. 

उलटीचा त्रास (Vomiting)

एखाद्या वासाने आपल्याला मळमळायला झाले की, नक्कीच त्यामुळे तुम्हाला उलटीचा त्रास होऊ शकतो. परफ्युमचे काही वास इतके तीव्र असतात की ते तुमच्या सगळ्या शरीराची यंत्रणाच बदलवून टाकतात. डॉक्टरांच्या अभ्यासानुसार तुम्हाला परफ्युमचा तीव्र वास तुमच्या मेंदूत इतका जाऊन बसतो की, त्यामुळे तुम्हाला मळमळ जाणवत राहते ही मळमळ जास्त प्रमाणात जाणवत राहिली की, मग तुम्हाला उलटीचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला परफ्युच्या वासामुळे डोकेदुखी, मळमळ आणि उलटी होत असेल तर तुम्ही त्याचा वापर लगेचच बंद करायला हवा.  

भारतीय मुलींना आवडतील असे उत्कृष्ट परफ्युम्स

अंत:स्राव प्रणालीवर परिणाम (Effects Endocrine System)

परफ्युममध्ये हमखास असणारी गोष्ट म्हणजे पॅराबिन (Paraben) पॅराबिन हे एक सिंथेटीक प्रिझरव्हेटिव्ह असून त्याचा थेट संबध तुमच्या अंत:स्रावी प्रणालीवर होतो. आपल्या शरीरातील हार्मोन्सवरही याचा परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या अंतर्गत आरोग्यासाठीही परफ्युम वापरणे धोक्याचे आहे. त्यामुळे परफ्युम वापरताना तुम्ही तो जपून वापरायला हवा.

ADVERTISEMENT

प्रजननावरही होतो विपरित परिणाम (Effects On Reproductive System)

परफ्युमचा अत्यंत दूरगामी परिणाम प्रजननावर होतो. परफ्युममध्ये (Phthalates) असते. जे बाळाच्या वाढीला अडथळा निर्माण करते. म्हणूनच गरोदरपणात महिलांना परफ्युम किंवा असे सेटेटंड द्रव्य लावण्याचा सल्ला गरोदर महिलांना दिला जात नाही. त्याचा अति वापर करत असाल तर तुमच्या प्रजनन क्षमतेवरही त्याचा परिणाम होतो.

श्वसनाचा होतो त्रास (Effects On Respiratory System)

अस्थमाचा होऊ शकतो त्रास

Instagram

परफ्युमचा आणखी एक त्रास तुमच्या श्वसनाशी निगडीत आहे. अनेकांना परफ्युमचा वास घेतल्यामुळे श्वसनासही अडथळा निर्माण होतो. तुमच्या फुफ्फुसांवर परफ्युमचा परिणाम झाल्यामुळे तुम्हाला अस्थमासारखे त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होऊ नये असे वाटत असेल तर परफ्युमचा अतिरिक्त वापर टाळा. 

ADVERTISEMENT

ह्रदयाचे ठोके वाढवते (Elevated Heart Rate)

अनेकदा घाबरल्यानंतर आपल्या ह्रदयाचे ठोके वाढतात. पण परफ्युमच्या त्रासामुळेही तुम्हाला हा त्रास होऊ शकतो. आपण लावलेलेच परफ्युम नाही तर इतर कोणीही परफ्युम लावले असेल तर त्याचा त्रास आपल्याला होऊ शकतो. अनेकदा प्रकृती अस्थिर झाली की, हा त्रास आपल्याला होतो. आपल्या रक्तदाबावर त्याचा गंभीर परिणाम होऊ लागतो. तुम्ही अस्वस्थ झाला किंवा घाबरलात की, आपसुकच ह्रदयाचे ठोके वाढू लागतात. 

‘या’ विचित्र 12 ब्युटी टिप्स देतील तुम्हाला सुंदर लुक

योग्य परफ्युम कसे निवडावे (How To Choose The Right Perfume)

परफ्युमची निवड आहे फारच महत्वाची

ADVERTISEMENT

shutterstock

परफ्युम निवडताना तुम्हाला काही गोष्टींकडे लक्ष देणे फारच आवश्यक असते. तुम्ही नव्याने आणि चांगल्या परफ्युमच्या शोधात असाल तर तुम्हाला आमची ही गाईडलाईन मदत करेल. 

  1. सुंगधी राहण्यासाठी तुम्ही परफ्युम निवडत असाल तर तुम्ही परफ्युमचा योग्य सुगंध निवडा. कामाचे स्वरुप, तुमची      त्वचा आणि पर्सनॅलिटी या सगळ्या गोष्टीचा तुम्ही अगदी व्यवस्थित विचार करा. 
  2. परफ्युम कधीही तीव्र सुगंधाचे नसावे. तुम्हाला लाँग लास्टिंग सुगंध हवा म्हणून तो तीव्र असून चालत नाही. परफ्युममधील घटकही जाणून घेणे महत्वाचे असते. 
  3. परफ्युम माईल्ड आणि मंद सुगंध देणारे असावे. त्याच्या सुगंधाचा भपका दुसऱ्यांना त्रासदायक वाटू नये असा असावा.
  4. परफ्युम तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहे की, नाही हे तपासण्यासाठी तुम्ही परफ्युमची पॅच टेस्ट घ्या.
  5. जर तुम्ही नव्याने परफ्युम शोधत असाल अशावेळी तुम्ही एकाहून अनेक सुगंध हुंगता त्याचा वास डोक्यात बसून राहतो. अशावेळी तुमच्या जवळ कॉफी असू द्या. किंवा स्टोअरमध्ये असलेल्या कॉफी बीन्सचा वास घ्यायला विसरु नका. 

तुम्हाला पडलेत का प्रश्न (FAQ’s)

1. परफ्युममुळे कॅन्सर होण्याची शक्यता असते का?

ADVERTISEMENT

अनेक अभ्यासाअंती असे सिद्ध झाले आहे की, परफ्युमचे तुमच्या शरीरावर दूरगामी परिणाम होतात. त्यामध्ये असणाऱ्या घटकामुळे कॅन्सरसारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे कॅन्सर होण्याबाबतीत सांगितलेल्या शक्यता या खऱ्या आहेत. पण ठराविक एका परफ्युममुळेच तुम्हाला कॅन्सर होते असे सांगता येत नाही.

2. लहान मुलांसाठी परफ्युम चांगले नसते का?

परफ्युमचा वापर मोठ्यांवर इतका परिणाम करु शकते. त्याचे विपरित परिणाम लहान मुलांवर अगदी पटकन होऊ शकता. परफ्युममध्ये असलेले अल्होहल आणि सुंगधी द्रव्ये हे लहान मुलांसाठी मुळीच बनलेले नसतात. त्यामुळे लहान मुलांवर चुकूनही याचा वापर करु नये. त्या ऐवजी तुम्ही लहान मुलांसाठी फक्त बेबी पावडरचा उपयोग करा. 

3. फुफ्फुसांनाही परफ्युमचा त्रास होतो का? 

ADVERTISEMENT

परफ्युममधील घटक तुमच्या फुफ्फुसांवरही परिणाम करतात. परफ्युमच्या अति वापरामुळे  अस्थमा किंव COPD सारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. परफ्युम हे तुमच्या त्वचेतून आणि श्वसानातून आत जात असतात. त्यामुळे ते तुमच्या फुफ्फुसांवर परिणाम करतात. 

आता जर तुम्ही परफ्युमचा वापर करत असाल तर सावध आणि जपून असा याचा वापर करा. कारण त्याचा त्रास तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. 

22 Jul 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT