चष्मा लावणाऱ्या मुलींसाठी मेकअप टिप्स, डोळे दिसतील अधिक सुंदर

चष्मा लावणाऱ्या मुलींसाठी मेकअप टिप्स, डोळे दिसतील अधिक सुंदर

चष्मा लावणाऱ्या मुलींना नेहमीच 'चष्मीश' या नावाने चिडवलं जातं. लहानपणापासून तुम्ही जर चष्मा वापरत असाल तर एव्हाना तुम्हाला त्याची सवय झालेली असते. मोठं झाल्यावर मात्र या चष्म्यामुळेच तुम्हाला अभ्यासू अथवा हुशारदेखील समजलं जातं. सततच्या वापरामुळे चष्मा तुमच्या जीवनाचाच एक भाग होतो. आता तर बाजारात निरनिराळ्या स्टाईलचे चष्मे मिळतात. चष्मा असलेल्या लहान डोळ्यांसाठी मेकअप टिप्स जाणून घ्या त्यामुळे चष्मा लावूनही तुम्हाला स्टायलिश दिसता येतं. पण जेव्हा मेकअप करण्याची वेळ येते तेव्हा मात्र तुम्हाला अनेक प्रश्न पडतात. कारण मेकअपमध्ये डोळ्यांचा मेकअप अथवा आय मेकअप हा नेहमीच खास ठरत असतो. चष्म्यामुळे तुम्हाला मात्र आयमेक अप करताना अनेक मर्यादा येतात. यासाठीच आम्ही चष्मा लावणाऱ्या मुलींसाठी काही खास मेकअप टिप्स शेअर करत आहोत. ज्यांचा तुम्हाला मेकअप करण्यासाठी आणि डोळ्यांना आकर्षक करण्यासाठी नक्कीच फायदा होईल.

Instagram

चेहऱ्यावर जास्त फाऊंडेशनचा वापर करू नका -

चेहऱ्यावर थोडं जास्त फाऊंडेशन लावल्यामुळे कदाचित चष्मा न लावणाऱ्या मुलींचे काहीच नुकसान होणार नाही. मात्र जर तुम्ही चष्मा वापरत असाल तर या गोष्टीची तुम्ही नीट काळजी घ्यायला हवी. कारण चष्मा लावल्यावर अती फाऊंडेशनमुळे तुमचे गाल आणि नाकाचा लुक बिघडू शकतो. शिवाय जर तुमच्या चष्म्यावर फाऊंडेशन लागू नये असं तुम्हाला वाटत असेल तर फाऊंडेशन लावताना तुमच्या चेहऱ्यावर चष्म्याचा कुठे स्पर्श होणार हे तुम्हाला माहीत असायला हवं. यासाठी मेकअप करताना ब्युटी ब्लेंडर अथवा हाताने तुम्ही चष्मा जिथे लावता त्या भागावर फाऊंडेशन व्यवस्थित ब्लेंड करा. गालाचा वरचा भाग आणि नाक यावर जास्त फाऊंडेशन लागणार नाही याची काळजी घ्या.

Instagram

तुमच्या चष्म्याच्या फ्रेमच्या रंगानुसार आयलायनर निवडा -

आयलायनर लावणं ही एक कला आहे. त्यामुळे तुम्ही ते कसं लावता हे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या चष्म्याचा रंग आणि आयलायनरची  शेड एकसारखी असेल तर ते चांगले दिसणार नाही. यासाठी तुमच्या चष्म्याच्या फ्रेमच्या रंगसंगतीनुसार कॉन्ट्रास्ट रंगाची आयलायनरची शेड निवडा. आजकाल बाजारात विविध रंगाच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि आयलायनरच्या सुंदर सुंदर शेड्स विकत मिळतात. 

Instagram

नाकावरील व्रण लपवण्यासाठी प्रायमर आणि सेटिंग स्प्रेचा वापर करा-

चष्मा लावल्यामुळे जर तुमच्या नाकावर लालसर व्रण उठले असतील तर मेकअपने ते तु्म्ही झाकू शकता. यासाठी थोडंसं फाऊंडेशन आणि प्रायमर त्या ठिकाणी लावून तुम्हाला ते कमी करता येतील. जर तुम्हाला मेकअप सुरक्षित राहावा असं वाटत असेल तर सेटिंग स्प्रे नाकाजवळ स्प्रे करा. ज्यामुळे मेकअपवर चष्मा लावल्यावर ते पुन्हा दिसणार नाहीत. 

Instagram

आयलॅश कर्लरचा वापर करा -

तुम्हाला जर तुमच्या डोळ्यांच्या पापण्या मोठ्या आणि सुंदर दिसाव्या असं वाटत असेल तर मेकअप करताना आयलॅश कर्लरचा वापर करणं शिकून घ्या. कारण याला दुसरा काहीच पर्याय नाही. चष्मा लावणाऱ्या मुलींसाठी मेकअप करताना ही गोष्टच खूपच महत्त्वाची असू शकते. कारण याचा वापर केल्यावर तुमचा आय मेकअप चष्म्यातूनही खुलून दिसेल. 

Instagram

मोठ्या फ्रेमचा चष्मा वापरा -

तुम्हाला जर मेकअप केल्यावर चष्मा वापरायचाच असेल तर तो मोठ्या फ्रेमचा वापरा. याचं कारण मोठ्या फ्रेममुळे तुमचा आयमेकअप व्यवस्थित दिसेल. अशा फ्रेमच्या चष्म्यामध्ये तुम्ही थोडा हेव्ही मेकअप केला तरी तो तुमच्या मोठ्या फ्रेममुळे उठून दिसेल. मात्र त्यासाठी तुमच्या चष्म्याच्या फ्रेम्स स्वच्छ असतील याची मात्र नीट काळजी घ्या. 

Instagram

मस्कारा वापरण्यासाठी टिप्स -

तुम्ही जर ही मस्कारा लावण्याची युक्ती वापरलीच नाही तर आयलॅश कर्लरचा वापर फुकट जाऊ शकतो. कारण मस्काराशिवाय तुमच्या पापण्या दाट आणि सुंदर कशा दिसतील. यासाठी मस्कारा लावताना त्याचा पहिला कोट नेहमी पापण्यांच्या मुळापासून वरपर्यंत लावलेला असावा. पण दुसरा कोट लावताना तो फक्त खालच्या भागाकडेच लावा. कारण पापण्याच्या वरच्या बाजूला मस्काराचा कोट लावणं तुमच्यासाठी त्रास ठरू शकतं. कारण जर ते खराब झालं तर त्याचा इफेक्ट थेट तुमच्या चष्म्याच्या काचेवर दिसेल. यासाठी या टिप्स जरूर लक्षात ठेवा.  

कोण म्हणतं की चष्मा लावून तुम्ही मेकअप करू शकत नाही ? चष्मा लावल्यावरही मेकअप करून ग्लॅमरस दिसण्यासाठी फक्त या छोटया छोट्या टिप्स लक्षात ठेवा. तुम्ही सुंदर आहातच आता आणखी आनंदी व्हा.

Instagram