वय वाढले तरी या चार राशींचा लहानपणा संपत नाही, जबाबदारीपासून राहतात दूर

वय वाढले तरी या चार राशींचा लहानपणा संपत नाही, जबाबदारीपासून राहतात दूर

प्रत्येक माणसाला आयुष्यात काही ना काही संकटांचा सामना करावा लागतोच. त्याशिवाय प्रत्येकाला कधी ना कधीतरी आयुष्यात मोठं होऊन आपली अशी एक जबाबदारी सांभाळावी लागतेच. संकट आल्यानंतर ते सोडविण्यासाठी  आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक जण आयुष्याशी लढत राहतात. केवळ वयाची वाढच नाही तर प्रत्येक माणसाला मानसिक स्वरूपातही मोठं व्हावं लागतं. मात्र असं प्रत्येक राशीच्या व्यक्ती करू शकतातच असं नाही. काही व्यक्तींना आयुष्यात खूपच जास्त संघर्ष करावा लागतो हे खरं आहे. मात्र काही व्यक्ती वयाबरोबर अजिबात मॅच्युअर अर्थात जबाबदार होत नसतात. इतर लोकांच्या तुलनेत या व्यक्तींना संघर्षाचा सामना करत जगायला खूपच वेळ लागतो. अशा कोणत्या  राशीच्या व्यक्ती आहेत ज्यांना संघर्षाशी दोन हात करायला वेळ लागतो आणि जबाबदारीपासून दूर राहायचं असते ते पाहूया. 

मेष

Giphy

मेष राशीच्या व्यक्ती या जबाबदारी तर नक्कीच घेतात. पण त्यांच्या मनासारखी एखादी गोष्ट घडत नसेल तर अगदी  लहान मुलांप्रमाणे या राशीच्या व्यक्तींचे नखरे चालू होतात. या राशीच्या व्यक्ती नेहमीच  आवेशात असतात आणि राग त्यांच्या नाकावर असतो. त्यांच्या मनाप्रमाणे गोष्ट न झाल्यास आपला बिघडलेला मूड या व्यक्ती सांभाळू शकत नाहीत आणि त्यांचा राग लगेच दुसऱ्यावर निघतो. या सगळ्या गोष्टींमुळे वय वाढलं तरीही या व्यक्तींमधील लहानपणा निघून गेलेला दिसून येत नाही. कोणत्याही गोष्टीच्या मागे हात धुऊन लागणं या राशीच्या व्यक्तींना जमत नाही. तसंच यांना सहसा आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं शक्य होत नाही.  

आठवड्यातील कोणता दिवस आहे तुमच्यासाठी शुभ, काय सांगते तुमची रास

मिथुन

Giphy

या राशीच्या व्यक्ती या आपल्याच दुनियेत मग्न असतात. त्यांना त्यांच्याच विश्वात रममाण होणं अत्यंत आवडतं. कोणत्याही गोष्टी अगदी दूरवर विचार करून करण्यावर या व्यक्तींचा विश्वास नसतो. तसंच कोणत्याही गोष्टींचा प्रभाव या व्यक्तींच्या मनावर पटकन पडतो. या राशीच्या व्यक्ती मनाने नेहमीच तरूण राहतात आणि अगदी कितीही म्हाताऱ्या झाल्या तरी त्यांच्यातील दडलेले लहान मूल हे प्रत्येकाला जाणवतेच. आयुष्यातील कोणत्याही गोष्टीकडे या व्यक्ती अजिबातच गंभीरपणाने बघत नाहीत. त्यामुळेच त्यांना जबाबदारीची जाणीव खूपच उशिरा येते. मात्र तरीही होईल आणि जाईल अशा स्वभावामुळे या व्यक्ती कधीही घरातील कोणतीही जबाबदारी पेलू शकत नाहीत.

राशीनुसार जाणून घ्या तुमचे खरे मित्र आणि शत्रू कोण

कर्क

Giphy

कर्क राशीच्या व्यक्ती या अगदी लहान मुलांप्रमाणे असतात. तसंच लहान मुलांप्रमाणे या व्यक्ती पटकन चिडतात.  या व्यक्तींच्या मनाप्रमाणे कोणतंही काम न झाल्यास अथवा समोरची व्यक्ती त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मान्य न झाल्यास या व्यक्तींचा राग सहन करणं कठीण होतं. पण समोरच्या व्यक्तीकडून कसं काम काढून घ्यायचं आहे याचं तंत्र मात्र या व्यक्तींना उत्तम जमलेलं असतं. त्यामुळे सहसा स्वतः जबाबदारी नाही घेतली तरीही समोरच्या व्यक्तीकडून मात्र या व्यक्ती अतिशय उत्तमरित्या काम करून घेऊ शकतात. त्यांच्या अशा स्वभावामुळे त्यांच्या जवळच्या व्यक्ती त्यांच्यावर बरेचदा रागावतात आणि त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.  

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

मीन

Giphy

मीन राशीच्या व्यक्ती आपल्याच विश्वात विचार करून त्यामध्येच रममाण होताना दिसतात. त्यामुळे जगात काय चालू आहे याच्याशी त्यांचं काहीही देणंघेणं नसतं. या व्यक्तींचा जीवन जगण्याचा एक विशिष्ट दृष्टीकोन असतो आणि त्यामुळे बरेचदा व्यावहारीक न राहता भावना यांच्यावर विजय मिळवताना दिसतात. त्यामुळेच बरेचदा आयुष्यात चुकीचे निर्णय घेतले जातात. त्यामुळे जबाबदारीपासून या व्यक्ती दूर राहतात. त्यांच्या इच्छेप्रमाणे काम न झाल्यास रागावून ते काम होऊ न देण्याकडेच या व्यक्तींचा कल असतो. 

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर