जाणून घ्या त्वचेवर स्कीन केअर प्रॉडक्ट लावण्याची योग्य वेळ

जाणून घ्या त्वचेवर स्कीन केअर प्रॉडक्ट लावण्याची योग्य वेळ

सौंदर्य खुलवण्यासाठी आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण ब्युटी प्रॉडक्टचा वापर करत असतो. ही उत्पादने स्कीन तुमच्या केअर रूटीनमध्ये फार महत्त्वाची भूमिका निभावतात. आजकाल बाजारात विविध ब्रॅंडचे आणि विविध प्रकारचे स्कीन केअर प्रॉडक्ट उपलब्ध असतात. मात्र प्रत्येक स्कीन केअर प्रॉडक्ट वापरण्याची एक ठराविक वेळ असते हे तुम्हाला माहीत आहे का ? जर तुम्ही ठराविक ब्युटी प्रॉडक्ट योग्य वेळी वापरले तरच त्याचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी जाणून कोणते स्कीन केअर प्रॉडक्ट कधी वापरावे.

प्रत्येक स्कीन केअर वापरण्याची एक ठराविक वेळ असते कारण आपल्या त्वचेत दिवसभरात अने बदल होत असतात. काही ठराविक वेळी त्वचेतून नैसर्गिक तेल बाहेर पडत असते. यासाठीच तुम्हाला स्कीन केअर प्रॉडक्ट वापरण्याआधी त्याची योग्य वेळ माहीत असायला हवी. 

फेसवॉश अथवा क्लिंझर्स (सकाळी आणि संध्याकाळी) -

सकाळी उठल्यावर तुमची त्वचा सर्वात जास्त संवेदनशील असते. अशावेळी त्वचेला स्वच्छतेसोबतच योग्य निगेची गरज असते. साबणामध्ये केमिकल्सचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला असतो. सकाळी तुम्ही जर चेहऱ्यावर साबण लावला तर त्याचा तुमच्या त्वचेवर दुष्परिपणाम होऊ शकतो. यासाठी सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापू्र्वी त्वचेला फेसवॉश अथवा क्लिंझरने स्वच्छ करावे. 

हे ही वाचा -

तेलकट त्वचेसाठी हे आहेत बेस्ट क्लिंझर (Best Cleanser For Oily Skin In Marathi)

Shutterstock

मॉश्चरायझर (सकाळी आणि संध्याकाळी) -

त्वचेला जशी स्वच्छ करण्याची गरज आहे अगदी तशीच मॉश्चराईझ करण्याचीही असते. सकाळी तुम्ही फ्रेश असल्यामुळे तुमच्या त्वचेत नैसर्गिक तेलाची निर्मिती होत असते. ज्यामुळे तुमची त्वचा मऊ असते. मात्र दुपारनंतर तुमचा चेहरा थकलेला आणि निस्तेज दिसू लागतो. कारण यावेळी तुमची त्वचा कोरडी झालेली असते. म्हणूनच सकाळी, संध्याकाळी आणि रात्री झोपताना त्वचेला चांगलं मॉश्चराईझर, फेस सीरम लावणं फार गरजेचं आहे. ज्यामुळे त्वचेचा मऊपणा कायम राहील.

हे ही वाचा

कोरड्या आणि शुष्क त्वचेला मुलायम ठेवण्यासाठी वापरा ‘हे’ होममेड मॉश्चराईझर (Best Moisturizer For Dry Skin In Marathi)

सनस्क्रीन (दुपारी) -

आजकाल सनस्क्रीन हे त्वचेची काळजी घेण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरत आहे. सनस्क्रीनची आवश्यक्ता सुर्यप्रकाशात जाताना असते. त्यामुळे सुर्यप्रकाशात जाण्यापूर्वी पंधरा मिनीटे आधी तुम्ही त्वचेवर सनस्क्रीन वापरायला हवे. मात्र सुर्याच्या अतीनिल किरणांचा आणि लॅपटॉप अथवा टीव्हीमधून बाहेर पडणाऱ्या प्रकाश किरणांचा संपर्क त्वचेला सतत होत असतो. त्यामुळे दिवसभरात एक ते दोनवेळा घरातही सनस्क्रीन वापरणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकेल.

फेस मिस्ट (दिवसभरात कधीही)-

आजकाल बाजारात विविध प्रकारचे टोनर अथवा फेस मिस्ट उपलब्ध असतात. घरात अथवा ऑफिसमध्ये असतानाही एसीमुळे तुमची त्वचा कोरडी होते. ज्यामुळे तुमच्या त्वचेला वेळोवेळी हायड्रेट करणं गरजेचं असतं. यासाठी सतत पाणी पिण्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. मात्र अशा वेळी त्वचेवर पावडर थापण्यापेक्षा एखादं फेसमिस्ट  अथवा टोनर वापरणं नक्कीच फायद्याचं ठरू शकतं. ज्यामुळे तुम्हाला दिवसभरात कधीही पटकन फ्रेश वाटू शकतं.

नाईट क्रीम आणि आय क्रीम (फक्त रात्री) -

नाईट क्रीम अथवा आयक्रीम तुम्ही त्वचेवर कधीही लावू शकत नाही. रात्री झोपण्यापूर्वीच तुम्ही ते तुमच्या त्वचेवर लावायला हवं.  नाईट क्रीम आणि आयक्रीम लावण्यामुळे रात्रभर तुमच्या त्वचेला आराम मिळतो. ज्यामुळे सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं. त्वचेची काळजी घेण्यासाठी  या गोष्टींचा तुम्ही तुमच्या स्कीन केअर रूटीनमध्ये नक्कीच समावेश करायला हवा. 

shutterstock