हँड सॅनिटाझर निवडताना या गोष्टींची घ्या काळजी

हँड सॅनिटाझर निवडताना या गोष्टींची घ्या काळजी

हँड सॅनिटायझर ही सध्याची गरज झाली आहे. तुमच्या खिशात सध्या पैसे जास्त नसले तरी चालतील पण तुमच्याकडे सॅनिटायझर हा असायलाच हवा. अगदी कोणत्याही दुकानात गेल्यानंतर तुम्हाला हाताला सॅनिटायझर लावण्याचा सल्ला दिला जातो. आता सगळेच सॅनिटायझर तुमच्या त्वचेसाठी चांगले असतील असे सांगता येत नाही. कारण अनेकांनी आतापर्यंत सॅनिटायझर वापरल्यानंतर त्वचेसंदर्भात होणाऱ्या तक्रारी केल्या आहेत. सॅनिटायझरमुळे त्वचा कोरडी होणे, त्वचेचा वरील थर निघू लागतो वगैरे… म्हणूनच सॅनिटायझर निवडताना तुम्ही कोणती काळजी घ्यायला हवी ते आज आम्ही सांगणार आहोत. म्हणजे नेमके कोणते सॅनिटायझर निवडायचे हे तुम्हाला कळेल.

ऑनलाईन शॉपिंग करताना साईज नेहमी चुकते, मग वाचाच

सॅनिटायझरमध्ये असतात हे घटक

Instagram

स्प्रे आणि जेल अशा दोन्ही रुपामध्ये सॅनिटायझर मिळते. प्रत्येक सॅनिटायझरमध्ये 60 % इतके अल्कोहल असते. जर तुम्ही सॅनिटायझरची बॉटल नीट पाहिली असेल तर प्रत्येक सॅनिटायझरमध्ये  पॅराबीन ( Parabens), अल्कोहल (Alcohol), ट्रायक्लोझन (Triclosan),  

फ्रॅग्नंंस(Fragrance and Phthalates) असे काही घटक सर्वसामान्यपणे असतात. यातील प्रत्येक घटकामुळे तुमच्या त्वचेला काहीना काही त्रास होण्याची शक्यता असते. 

आलं टिकवून ठेवायचं असेल तर वापरा सोप्या युक्ती

सॅनिटायझर निवडताना आणि वापरताना घ्या ही काळजी

  • बाजारात मिळणाऱ्या प्रत्येक सॅनिटायझरमध्ये यापैकी काही घटक अत्यंत स्वाभिवाकपणे असतात. पण तरीदेखील प्रत्येक ब्रँडमध्ये याचे प्रमाण कमी जास्त असते. 
  • सॅनिटायझर हे तुमच्या हाताच्या स्वच्छतेसाठी असते. त्याचा वापर हात स्वच्छ करणे आहे तुमच्या हाताला सुगंध देणे नाही. ज्यावेळी तुम्ही सुगंधी सॅनिटायझर निवडता त्यामध्ये जास्त केमिकल्सचा उपयोग केला जातो. त्याचा त्रास तुम्हाला होऊ शकतो. 
  • सर्वसाधारणपणे अल्कोहल असलेल्या सॅनिटायझरमुळे तुमची त्वचा कोरडी होऊ शकते. पण त्याला पर्याय म्हणून  benzalkonium chloride असते. जे अल्कोहलपेक्षाही तुमच्या त्वचेसाठी खराब असते. त्यामुळे अल्कोहल असलेले सॅनिटायझर या तुलनेत बरे आहेत.
  • सॅनिटायझर म्हटले की, केमिकल्स आले तुम्ही लिक्वीड किंवा जेल अशा कोणत्याही स्वरुपातील सॅनिटायझर त्याच्या ब्रँडवरुन घेण्यापेक्षा त्यातील घटकांचा विचार करुन घेणे आवश्यक असते.
  •  ब्रँडेड असो वा नॉन ब्रँडेड कोणत्याही सॅनिटायझरचा अति वापर हा त्वचेसाठी चांगला नाही. बाहेर गेल्यानंतर बरेचदा आपल्या हातावर त्या दुकानात उपलब्ध असलेले सॅनिटायझर वापरले जाते. आता ते कोणत्या क्वालिटीचे असते हे आपणास सांगता येत नाही. अशावेळी तुम्ही तुमचे सॅनिटायझर सोबत घेऊन जा. 
  • सॅनिटायझर जंतूचा 100%  नायनाट करत नाही. उलट सॅनिटायझर लावलेला हात चुकून तोंडात गेला तर आपल्याला शारीरिक त्रास होण्याची शक्यता अधिक असते. 
  • सॅनिटायझर निवडताना तुमच्या माहितीच्या मेडिकल्समधूनच घ्या. स्वस्तात आणि बल्कमध्ये मिळणारे सॅनिटायझर घेताना थोडा विचार करा. कारण कधीही न वापरात येणाऱ्या अशा महागड्या सॅनिटायझरचा सध्या भरपूर वापर केला जात आहे. मागणी वाढल्यामुळे अनेक ठिकाणी स्वस्त आणि घातक असे सॅनिटायझरही बनवले जात आहे. 
    आता

सॅनिटायझर घेताना नेमकी काय काळजी घ्यावी ते लक्षात ठेवूनच त्याचा वापर करा. 

इन्फेक्शनमुक्त त्वचेसाठी वाफ घेणं आहे आवश्यक, मिळवा चमकदार त्वचा