आयब्रोज कलर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

आयब्रोज कलर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

काळ्याभोर आणि रेखीव भुवया तुमच्या डोळ्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालत असतात. मात्र वयानुसार आणि बदललेल्या जीवनशैलीमुळे तुमचे केस जसे पांढरे होऊ लागतात. त्याचप्रमाणे आयब्रोजचेदेखील पांढऱ्या होऊ लागतात. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर उतारवयाच्या खुणा डोकावू लागतात. बऱ्याचदा मेकअप करून तुम्ही तुमच्या भुवया  काळ्याभोर करता. मात्र हा काही यावरील कायमस्वरूपी उपाय नाही.तरूणपणीच तुमच्या आयब्रोज पांढऱ्या होऊ लागल्या असतील तर मुळीच काळजी करू नका. कारण अगदी सहज सोपे आणि नैसर्गिक उपाय करून तुम्ही तुमच्या भुवया काळ्याभोर करू शकता. 

आयब्रोज काळया करण्यासाठी नैसर्गिक उपाय -

आयब्रोज अथवा भुवया काळ्या कण्यासाठी मेकअपचा वापर नेहमीच केला जातो. आयब्रोज पेन्सिल अथवा फिलरचा वापर करून तुम्ही आयब्रोज काळ्या अथवा नैसर्गिक रंगाच्या करू शकता. मात्र तुमच्या किचनमध्ये असे अनेक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या भुवया नैसर्गिक पद्धतीने काळ्याभोर दिसू शकतात. फॉलो करा यासाठी काही सोप्या टिप्स 

आवळा -

केस आणि आयब्रोज वयाआधीच पांढरे दिसत  असतील तर आवळा तुमच्यासाठी अगदी वरदानच ठरू शकतो. कारण आवळ्यामुळे तुमचे केस नैसर्गिक पद्धतीने काळे होऊ शकतात

कसा कराल उपयोग -

- यासाठी एक ग्लास पाण्यामध्ये चार ते पाच आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करून टाका.

- पाणी उकळा आणि थंड झाल्यावर ते आयब्रोज आणि केसांवर लावा. 

- तुम्ही हे मिश्रण तयार करून ठेवू शकता.

- ज्यामुळे आठवड्यातून तीन ते चार वेळा तुम्हाला हा उपाय करता येईल.

Instagram

कॉफी -

कॉफीमुळे तुमचा मूड चांगला होतो आणि थकवा गेल्यामुळे मेंदूदेखील सक्रिय होतो. मात्र एवढंच नाही तर यामुळे तुमच्या आयब्रोजदेखील काळ्या करता येऊ शकतात. कारण कॉफीचा वापर तुम्ही नैसर्गिक हेअर कलर म्हणून करू शकता.

कसा कराल उपयोग -

- दोन चमचे थंड पाणी आणि दोन चमचे कॉफी एकत्र करा. 

- मिश्रण गॅसवर गरम करा आणि थंड होऊ द्या.

- आयब्रो ब्रशच्या मदतीने हे मिश्रण तुमच्या भुवयांवर लावा.

- अर्धा तासाने चेहरा थंड पाण्याने धुवून टाका. ज्यामुळे तुमचे आयब्रोज कलर होतील. तुम्ही हा उपाय तुमच्या केसांवरदेखील करू शकता.

Instagram

पौष्टिक आहार घ्या -

केस पांढरे होण्यामागे वयाप्रमाणे आणखी अनेक कारणे असू शकतात. जर तुमचा आहार चुकीचा असेल तर वय होण्याआधीच तुमचे केस आणि आयब्रोज पांढरे होऊ शकतात. यासाठी शरीराला योग्य आहारा घेण्याची सवय लावा. बऱ्याचदा तुम्ही जो आहार घेता त्यातून  सर्व पौष्टिक मुल्ये शरीराला मिळतातच असे नाही. केसांच्या आरोग्यासाठी शरीराला विविध व्हिटॅमिन्सची गरज असते. व्हिटॅमिन बी 12 आणि विटॅमिन डी 3 केसांच्या वाढ आणि पोषणासाठी महत्त्वाचे असते. यासाठी आहारात चिकन, मासे, अंडी, पनीर, बदाम आणि इतर व्हिटॅमिनयुक्त आहार असेल हे जरूर तपासा.