जेवणात मीठ जास्त झाले तर या सोप्या ट्रिक्स येतील कामी

जेवणात मीठ जास्त झाले तर या सोप्या ट्रिक्स येतील कामी

मीठ हा कोणत्याही खाद्यपदार्थाची चव वाढवू आणि बिघडवू शकतो. जेवणात मीठाचे प्रमाण जराही गोंधळले तरी आपल्या संपूर्ण पदार्थाची मेहनत वाया जाते. जेवण करताना कधी कधी मीठ टाकले की, नाही याचा विसर पडतो. मग काय मीठाशिवाय जेवण पूर्ण कसं होणार??... म्हणत आपण त्यात अधिकच मीठ घालतो. एखादा पदार्थ खाण्याच्या क्षमतेपलीकडे खारट झाला की, तो फेकण्याशिवाय पर्याय नसतो. पण आता तसे करण्याची काहीच गरज नाही. कारण तुम्ही काही सोप्या ट्रिक्सचा उपयोग करुन जेवणात जास्त झालेले मीठ कमी करु शकता आणि त्या पदार्थाचा आस्वाद घेऊ शकता

कोणत्याही भाजीचा स्वाद वाढवण्यासाठी सोप्या कुकिंग टिप्स

ब्रेड स्लाईस :

Instagram

कोणत्याही भाजी किंवा ग्रेव्हीमध्ये मीठ जास्त झाल्याचे लक्षात आल्यास सगळ्यात सोपी अशी ट्रिक तुम्ही करु शकता ती म्हणजे ब्रेड स्लाईसची. भाजी आणि ग्रेव्ही किती आहे ते पाहून ब्रेड स्लाईस त्यामध्ये घाला. ब्रेडची स्लाईस अतिरिक्त मीठ शोषून घेते. मीठाचे भाजीमधील प्रमाण संतुलित करते. ब्रेड स्लाईस त्यासाठी तुम्हाला साधारण 5 ते 10 मिनिटे तशीच ठेवून देणे गरजेचे आहे. ब्रेड स्लाईस बाहेर काढल्यानंर ती टाकायचीही गरज नाही. कारण काही ग्रेव्हीमध्ये बुडवलेला पाव खूपच छान लागतो. 

बटाटा :

Instagram

मीठ जास्त झाल्यास सर्वसाधारण अशी ट्रिक सांगितली जाते ती म्हणजे बटाटा.  कोणत्याही रस्सा भाजी किंवा वरणामध्ये मीठ जास्त असेल तर ही ट्रिक कामी येते. कच्चा बटाटा सोलून त्याचे काप करुन वरण किंवा रस्सा भाजीमध्ये सोडून झाकण बंद करावे. साधारण 15 मिनिटं तरी बटाटा आत असू द्या. गरम गरम पदार्थामध्येच हा बटाटा टाकायला हवा. बटाटा ग्रेव्हीमधील जास्त झालेले मीठ शोषून घेतो. बटाटा काढल्यानंतर तो फेकू नका. कारण हा उकडलेला बटाटा तुम्हाला भाजीत किंवा चाटमध्ये वापरता येईल.

नैसर्गिक पद्धतीने घर निर्जंतूक करण्याच्या सोप्या टिप्स

चण्याची डाळ

Instagram

 तुम्ही केलेल्या भाजीत  मीठ जास्त झाल्यास झटपट मीठ कमी करण्याची एक सोपी पद्धत म्हणजे  चण्याची डाळ, साधारण तासभर चणा डाळ भिजत घाला. भिजलेली चणा डाळ मीठ जास्त झालेल्या भाजीच्या रस्स्यात घालून भाजी थोडी शिजवा. चणा डाळ शिजताना रस्यात असलेले जास्तीचे मीठ शोषून घेण्यास मदत करेल. शिवाय चणाडाळीमुळे एखाद्या पदार्थाची चवही वाढण्यास मदत होईल. 

अस्वच्छ किचन सिंक स्वच्छ करायचे आहे.. मग सोप्या टिप्स येतील कामी

तूप

Instagram

तूप घातल्याने देखील पदार्थामध्ये जास्त झालेले मीठ संतुलित करण्यास मदत मिळते. तूपाला त्याची एक चव असली तरी त्यामध्ये बटरप्रमाणे मीठ नसते. तूप घातल्यामुळे मीठाचे प्रमाण संतुलित करण्यास मदत मिळते. त्यामुळे कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये तुम्ही दोन ते चार चमचे तूप घालावे. 

काजूची पेस्ट

Instagram

जर तुम्ही काही वेगळ्या रस्सा भाजी केल्या असतील. म्हणजे पालक पनीर, पनीर मसाला, कोल्हापुरी किंवा कोरमा. आणि त्यामध्ये मीठ जास्त झाले असेल तर तुम्ही काजू पेस्ट घालून मीठाचे प्रमाण कमी करु शकता. काजू पेस्ट तुमच्या ग्रेव्हीला दाटपणा आणि आवश्यक गोड चव आणण्याचे काम करते. त्यामुळे काजूची पेस्ट कुठे चालू शकेल याचा विचार करुन त्याचा वापर करावा. काजूची पेस्टही मीठ शोषून घेण्याचे काम करते. 


आता जर जेवणात चुकून मीठ जास्त झाले असेल तर काळजी करु नका तर या सोप्या ट्रिक्स करुन पाहा.