जन्म महिन्यानुसार शोधा तुमचा जोडीदार, काय सांगतो तुमचा जन्म महिना

जन्म महिन्यानुसार शोधा तुमचा जोडीदार, काय सांगतो तुमचा जन्म महिना

आपल्या जन्म महिन्याच्या आधारावर कोणत्याही व्यक्तीचे वैशिष्ट्य सांगण्याचे शास्त्र आपल्याकडे अवगत आहे. या शास्त्राचा अनेक लोकांनी अभ्यास केला आहे आणि करत आले आहेत. काही जणांना हे थोतांड वाटतं तर काही जणांना यामध्ये तथ्य दिसतं. अगदी आपल्या स्वभावापासून ते आपल्या करिअरपर्यंत अनेक गोष्टी आपल्या जन्म महिन्यानुसार सांगितल्या जाऊ शकतात. त्याचप्रमाणे जर आपल्याला कसा जोडीदार हवा आहे हे शोधायचे असेल तर तुम्ही जन्म महिन्यानुसार जोडीदार शोधू शकता. मात्र त्या जोडीदारात नक्की काय काय वैशिष्ट्य  आहेत हे  तुम्हाला कसं कळणार? तर त्यासाठी तुमचा जन्म महिना नक्की काय सांगतो हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया महिन्याप्रमाणे कसा जोडीदार तुमच्यासाठी योग्य आहे. 

जानेवारी

instagram

तुम्हाला जोडीदार म्हणून अशा व्यक्तीची साथ हवी जो तुम्हाला योग्य प्रकारे समजून तुमची साथ देऊ शकेल. कारण तुम्ही सतत धावपळ करत असता आणि तुम्हाला तुमचा जोडीदार म्हणून अगदी सावकाश काम करणारी अथवा मध्यम स्वरूपातील व्यक्ती चालणार नाही तर तुमच्या वेगाला धरून चालेल अशी व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्यात साथ देऊ शकते. तुमच्याजवळ अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्याची तुम्हाला गरज भासते आणि बऱ्याचदा तुम्हाला कोणाच्या मदतीही आयुष्यात गरज भासत नाही. मात्र तरीही तुम्ही जेव्हा जोडीदार निवडणार तेव्हा तुमच्या वेगाला साथ देऊ शकेल अशीच निवड करा. 

फेब्रुवारी

Shutterstock

तुम्हाला अशा जोडीदाराची गरज आहे जो तुमच्याजवळ अगदी शांततेने बसू शकेल आणि तुम्हाला समजून घेऊ शकेल. तुम्हाला असं वाटतं की बऱ्याचदा तुम्ही काही गोष्टी व्यवस्थित मॅनेज करू शकत नाही कारण लोक तुम्हाला तशी जाणीव करून देतात. त्यामुळे वास्तवात नक्की काय आहे आणि तुम्ही नक्की काय करू शकता हे समजावून घेणारी व्यक्तीच तुमच्या आयुष्यात तुमची योग्य साथ देऊ शकेल. तुमच्या लहान सहान गोष्टी  आणि तुमचे विचार समजून घेणारी व्यक्तीच तुमची चांगली जोडीदार होऊ शकते. त्यामुळे अशा व्यक्तींनाच तुमच्या आयुष्यात तुम्ही प्राधान्य द्या. 

मार्च

Giphy

तुम्ही एक अप्रतिम इच्छाशक्ती असणारे, प्रशंसेला पात्र आणि सर्वांना मदत करणाऱ्या आणि दूरदृष्टी असणाऱ्या व्यक्ती आहात. तुम्ही नेहमी दुसऱ्यांवर खर्च करता आणि पुढे जाता. आपल्या आसपासच्या  लोकांना नेहमी आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तुम्ही व्यक्ती आहात. त्यामुळे तुम्हाला असा जोडीदार हवा जो तुमच्याप्रमाणेच इतरांना जपू शकेल. पण तरीही तुमच्याप्रमाणे खर्चिक न राहता व्यवस्थित व्यवहार जपून ठेऊ शकेल. कारण दोन्ही बाजू व्यवस्थित समतोल राखणारी व्यक्तीच तुमची जोडीदार होऊ शकते. दोघही खर्चिक व्यक्ती एकत्र राहू शकत नाहीत. त्यापैकी कोणीतरी योग्य व्यावहारिक असावी लागते. 

एप्रिल

Instagram

एप्रिल महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अतिशय विश्वसनीय आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या असतात. तुमच्याजवळ तुमची स्वतःची अशी एक ओळख असते आणि त्यामुळेच ही गोष्ट इतरांना काही अंशी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे तुम्हाला अशा जोडीदाराची गरज भासते जो तुमचे व्यक्तीमत्व स्वीकारून तुम्हाला साथ देऊ शकेल. तुमच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अथवा तुम्हाला खाली खेचण्यासाठी कोणी व्यक्ती प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीसह तुमचं पटू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला समजून घेईल आणि तुमचं व्यक्तिमत्व सहज जपू शकेल अशाच व्यक्तींची तुम्हाला आयुष्यात गरज आहे. 

मे

Instagram

या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या फास्टट्रॅकवर चालणाऱ्या व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात. या व्यक्ती सतत आपल्याबरोबर इतरांना घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतात. एकटेपणा या व्यक्तींना अजिबात झेपत नाही आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सतत आसपासच्या लोकांसह या व्यक्ती राहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपल्या आयुष्यात सतत एकत्र राहील आणि सतत बळ देत राहील अशीच व्यक्ती या महिन्यात जन्म घेतलेल्या व्यक्तींना जोडीदार म्हणून योग्य ठरते. या व्यक्तींचा एकटेपणा घालविण्यासाठी त्यांना समजून घेणारा आणि जपणारा जोडीदार हवा असतो. 

राशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली

जून

Instagram

या महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अतिशय संवेदनशील आणि भावनात्मक असतात. त्यामुळे नाती निभावता येणाऱ्या जोडीदाराची त्यांना गरज असते. त्यांचं मन समजून घेणाऱ्या आणि त्यांना जपणाऱ्या व्यक्तींचा जोडीदार म्हणून या व्यक्ती शोधात असतात. कोणत्याही प्रकारे प्रेमातील धोका सहन करण्याची ताकद या व्यक्तींकडे कमी प्रमाणात असते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेम करणारी आणि जपणारी व्यक्ती जोडीदार म्हणून या व्यक्तींना हवी असते. 

जुलै

Shutterstock

तुम्हाला अशा व्यक्तीची जोडीदार म्हणून गरज आहे जी व्यक्ती तुमच्या कामात ढवळाढवळ न करता तुम्हाला स्वातंत्र्य देईल. तुम्हाला जे करण्याची इच्छा आहे त्यात मोडता घालणारी व्यक्ती तुम्हाला चालत नाही. तुम्हाला तुमची लाईफस्टाईल जशी हवी तशी जगू देणारी व्यक्ती तुमची योग्य जोडीदार होते. तसंच तुम्हाला नेहमी पुढे जाण्यास प्रवृत्त करणारी आणि नेहमी तुम्हाला लाईमलाईट मध्ये आणणारी व्यक्ती तुमचा योग्य जोडीदार होऊ शकते. तुमच्या प्रत्येक निर्णयात साथ देणारी व्यक्ती असेल तर तुम्ही एकमेकांसाठी पूरक आहात.

राशीनुसार जाणून घ्या तुमचे खरे मित्र आणि शत्रू कोण

ऑगस्ट

Instagram

तुम्ही नक्की काय करत आहात, ते चूक आहे की बरोबर आहे हे सांगणारी योग्य व्यक्ती तुमचा उत्तम जोडीदार होऊ शकते. तुम्ही जन्मापासूनच एक नेता आहात. त्यामुळे तुमच्याकडे लोक लगेच आकर्षित होतात. मात्र तुम्ही योग्य वागत आहात की अयोग्य हे सांगणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण तुम्ही सतत लोकांच्या गराड्यात असल्याने तुम्हाला गर्व असण्याचा धोका असतो. पण हा गर्व तुमच्या डोक्यात शिरू नये अशी व्यक्ती तुमच्या सतत आजूबाजूला असणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या आयुष्याचं काही खरं नाही. त्यामुळे अशीच व्यक्ती तुमचा योग्य जोडीदार होऊ शकते. 

सप्टेंबर

Instagram

तुम्हाला अशा जोडीदाराची आवश्यकता आहे जो तुमची ऊर्जा व्यवस्थित जपून ठेवायला मदत करू शकेल. कोणत्याही नको त्या व्यक्तीच्या मागे लागून तुम्ही त्रास करून घेणाऱ्या व्यक्ती आहात. त्यामुळे कोणत्या व्यक्तीमागे आपला वेळ घालवायचा याची जाणीव करून देणारी व्यक्ती तुमचा जोडीदार म्हणून असणं आवश्यक आहे. तुमच्या कल्पनांना बळकटी देणारा जोडीदार तुम्हाला आयुष्यात हवा असतो. त्याप्रमाणेच तुम्ही निवड करा.

राशीनुसार जाणून घ्या कोणाला कसली वाटते भीती

ऑक्टोबर

Instagram

ऑक्टोबर महिन्यात जन्म झालेल्या व्यक्ती या अत्यंत सुशील आणि सक्षम असतात यामध्ये कोणतेही दुमत नाही. या व्यक्ती दयाळू असतात. तसंच प्रत्येकाबरोबर मिळून मिसळून राहण्याचा यांचा स्वभाव असतो. पण तरीही काही वेळा यांच्या  स्पष्टवक्तेपणामुळे लोकांना त्रास होतो. त्यामुळे तुम्ही नक्की कसे आहात आणि कोणत्या क्षणी कसे वागाल हे समजून घेणारी व्यक्तीच तुमचा योग्य जोडीदार होऊ शकते. मनात काही नसलं तरीही एखाद्याचं मन दुखावू शकता त्यामुळे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे ते समजून उमजून घेणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणं गरजेचं आहे.  

नोव्हेंबर

Shutterstock

तुम्हाला नेहमीच असं वाटतं की बरेचसे लोक तुम्हाला समजून घेण्यात चूक करतात. तुम्ही अतिशय प्रेमळ आहात. तसंच  अतिशय उत्साही पण आहात. पण तरीही बऱ्याचदा तुम्ही केलेली काळजी काही जणांना कळत नाही आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा उलट त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला अशा जोडीदाराची गरज आहे जो तुम्हाला समजून घेईल आणि तुमची योग्य  प्रकारे काळजी घेऊन  तुमच्यावर प्रेम करू शकेल. तुम्हाला प्रेमाची आणि काळजीची अत्यंत गरज असते त्यामुळे अशाच व्यक्तींना आपला जोडीदार निवडा. 

राशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव

डिसेंबर

Instagram

तुमची ओळख उत्साही आणि मस्तीखोर म्हणून असते. त्यामुळे तुम्हाला तुम्ही जसे आहात तशाच स्वरूपात समजून घेणारी जोडीदार म्हणून हवी. तुमच्याबरोबर वेळ घालवायला आवडेल आणि कायम आयुष्यात शांतता आणि प्रेरणात्मक क्षण घेऊन येईल अशा तऱ्हेची व्यक्ती तुम्हाला जोडीदार म्हणून योग्य आहे.