आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा डाग दिसू नये यासाठी महिला बरंच काही करत असतात. वेगवेगळ्या मेकअपच्या ट्रिक्स, चेहऱ्यावर वाफ घेणं, चेहऱ्याची काळजी घेणं, वेगवेगळे क्रिम्स वापरणं या सगळ्या गोष्टी तर असतातच, त्याशिवाय पार्लर्सच्या फेऱ्या हे सगळंच असतं. तिथे जाऊन ब्यूटी ट्रिटमेंट्स घेतल्या जातात. पण बऱ्याचदा इतकं सगळं करूनही चेहऱ्यावरील डाग दिसतातच. तुम्हाला जर डागविरहीत चेहरा हवा असेल तर तुम्ही बडिशेपच्या फेसमास्कचा वापर करून पाहायला हवा. तुम्हाला हे वाचून नक्कीच आश्चर्य वाटलं असेल पण हे खरं आहे. आता बडिशेपचा मास्क कसा करायचा आणि त्याचा वापर कसा करायचा हेदेखील तुम्हाला जाणून घ्यायचं असेल. तर त्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. बडिशेपेमध्ये आयर्न, कॉपर, जिंक आणि कॅल्शियम असतं. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. बडिशेपेचा वापर केल्याने चेहऱ्यावरील मुरूमं, खराब झालेली त्वचा, काळे डाग आणि सुरकुत्या कमी होतात. याचा उपयोग कसा करून घ्यायचा ते पाहू.
बडिशेप ही आपल्या त्वचेला अधिक मऊ आणि मुलायम करण्यासाठी उपयुक्त ठरते. पण त्याचा फेसपॅक कसा बनवायचा हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. त्यासाठी फेसपॅक कसा बनवायचा हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. बडिशेपचा फेसपॅक बनवणं तसं तर सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घ्यावे लागत नाहीत. जाणून घेऊया कसा बनवायचा बडिशेपचा फेसपॅक
साहित्य
कृती
अर्धा कप गरम पाण्यात बडिशेप आणि ओट्स भिजवा. हे व्यवस्थित मिश्रण एकत्र करून घ्या. त्यानंतर चेहऱ्याला हे मिश्रण लावा. साधारण अर्धा तास हे मिश्रण तसंच राहू द्या. नंतर गार पाण्याने चेहरा धुवा. तुम्हाला या फेसमास्कचा उपयोग साधारण आठवड्यातून एकदा केल्यास चांगला परिणाम पाहायला मिळेल.
चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी तुम्ही बडिशेप घालून वाफही घालू शकता. बडिशेप घालून कशी वाफ घ्यायची असा प्रश्न असेल तर सर्वात पहिले एक लीटर पाणी उकळून घ्या. या पाण्यात तुम्ही 1 चमचा बडिशेप घाला. त्यानंतर पाणी उकळवा. या पाण्याने तुम्ही वाफ घ्या. वाफ घेण्यासाठी टॉवेल डोक्यावर घ्या. 5 मिनिट्स वाफ घेतल्यानंतर चेहरा नरम टॉवेलने पुसा. कोरड्या त्वचेसाठी बडिशेपेच्या पाण्याची वाफ घेणं अत्यंत उपयुक्त आहे.
Flat Belly हवी आहे, तर मग आजपासूनच ट्राय करा हे 5 Detox Drinks
यासाठी तुम्ही एक चमचा पाणी आणि एक चमचा बडिशेप पावडर घ्या. हे मिश्रण मिक्स करून पेस्ट बनवा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि मग हलक्या हाताने स्क्रब करा. स्क्रबिंगमुळे तुमचा चेहरा क्लीन होतो आणि तुमच्या चेहऱ्यावरील चमकदारपणा अधिक वाढतो.
अर्धा कप पाणी गरम करून त्यात एक चमचा बडिशेप घाला. त्यानंतर पाणी साधं होऊ द्या. पाणी साधं झाल्यावर त्यात 1 चमचा ओटमील, 1 चमचा मध मिक्स करा. हे मिश्रण तुम्ही चेहऱ्यावर लावा. साधारण अर्धा तास झाल्यावर तुम्ही कोमट पाण्याने तुमचा चेहरा धुवा. यामुळे तुम्हाला मुरूमं जाऊन डागविरहीत चेहरा मिळेल. तसंच तुम्हाला यामुळे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.