चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर या कोलॅजन बुस्टरचे करा सेवन

चेहऱ्यावर ग्लो हवा असेल तर या कोलॅजन बुस्टरचे करा सेवन

चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी ब्युटी प्रोडक्ट जितकी महत्वाची आहेत. तितकेच तुम्ही चांगल्या गोष्टीचे सेवन करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही आतून शुद्ध आणि सात्विक खात असाल तर तुमच्या त्वचेचा ग्लो हा कायम टिकून राहतो. तुमच्या त्वचेला छान ग्लो असेल पण तो कालांतराने कमी होतो असे तुम्हाला वाटत असेल तर आज आपण असे काही आर्युवेदिक पर्याय पाहणार आहोत जे तुमच्या चेहऱ्याला ग्लो आणतील शिवाय तुम्हाला त्वचेसंदर्भात असलेल्या अन्य तक्रारीही दूर होतील. चला तर मग असे काही आर्युवेदिक पर्याय कोणते ते देखील पाहुयात.

आयब्रोज कलर करण्यासाठी नैसर्गिक उपाय

क्युअरवेदा (Cureveda)

जर तुम्हाला सप्लिमेंट घेण्याची भीती वाटत असेल तर क्युअरवेदाबाबत निश्चिंत राहा. कारण यामध्ये कोणतेही केमिकल्स नाहीत. क्युअरवेदा नावाने मिळणारे हे सप्लिमेंट वेगवेगळ्या कारणांसाठी उपलब्ध आहे. केस, त्वचा आणि सुदृढ शरीर यासाठी त्याचा उपयोग होतो. तुम्ही तुमच्या त्वचेसाठी सप्लिमेंट पाहात असाल तर तुमच्यासाठी क्युअरवेदाची ग्लो नावाची सप्लिमेंट बॉटल अगदी योग्य आहे. एक ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला साधारण दोन चमचे इतकी पावडर घेऊन त्याचे सेवन करायचे असते. ग्लो पावडरची चव ही पटकन कळून येत नाही. याचा वास घेतल्यानंतर तुम्हाला तो थोडा रोझ पावडर सारखा येईल. पण यामध्ये रोझ पावडरसोबत पर्ल पावडर आणि अन्य गोष्टींचा समावेश असतो. दिवसातून कोणत्याही वेळी एकदा त्याचे सेवन करा तुम्हाला नक्कीच तुमच्या त्वचेत फरक जाणवेल.

Skin Care

Cureveda Glow – Adaptogenic Beauty Protein Powder

INR 1,395 AT Cureveda

न्युट्रोवा कोलॅजन (Nutrova collagen)

त्वचेसंदर्भात कोलॅजन हा शब्द तुम्ही अगदी हमखास ऐकला असेल. तुमच्या त्वचेतील कोलॅजनला बुस्ट करण्याचे काम करणारा आणखी एक चांगला फॉर्म्युला म्हणजे न्युट्रोवा कोलॅजन. ही एक प्रकारची पावडर आहे. याचे कोणतेही साईड इफेक्ट नाही. ही तुम्हाला पॅकेट स्वरुपात मिळते. तुम्ही ही अगदी सहज कॅरी करु शकता. एक ग्लास पाण्यामध्ये तुम्हाला याचे एक पॅकेट घालायचे असते. साधारण फिक्कट गुलाबी रंगाचे असे पाणी यातून तयार होते. दिवसातून एकदा हे पाणी प्यायलाने तुम्हाला नक्कीच फरक झालेला जाणवेल 

DIY: चेहऱ्यावर सतत अॅक्ने होत असल्यास लावा 'हा' फेसमास्क

Skin Care

Nutrova Collagen+Antioxidants

INR 2,750 AT Nutrova

ओझीवा कोलॅजन (Oziva Plant based collagen)

क्युअरवेदाप्रमाणेच आणखी एक कोलॅजन पावडर आहे ती म्हणजे ओझीवा कोलॅजन. जर तुम्ही वीगन असाल तर तुमच्यासाठी ही पावडर आहे. यामध्ये केवळ औषधी वनस्पतींचा उपयोग करण्यात आला आहे. क्युअरवेदा आणि या पावडरचा रंग साधारणपणे सारखाच आहे. पण जर तुम्ही बजेटमध्ये चांगले काही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी क्युअरवेदापेक्षा ही पावडर थोडी बजेटमध्ये आहे. साधारण चवीच्या बाबतीत हे सारखेच आहे. पण ही पावडर थोडीशी आंबट असते.

योगा मॅटची स्वच्छता आहे महत्वाची नाहीतर होतील त्वचेचे विकार

Skin Care

OZiva Plant Based Collagen Builder

INR 899 AT OZiva

या गोष्टी असू द्या लक्षात

  • कोणतेही सप्लिमेंट घेताना त्याची चव आपल्याला पटकन आवडेलच असे नाही. त्यामुळे एकदाच पिऊन त्याचे सेवन थांबवू नका. 
  • बॉक्सवर दिलेल्या माहितीप्रमाणे जर तुम्ही पाण्यामध्ये पावडर घातली असेल आणि ती तुम्हाला जास्त वाट असेल तर त्याचे प्रमाण मागे पुढे केले तरी चालू शकते. 
  • एखादी गोष्ट किंवा हे पाणी पिताना एका झटक्यात किंवा एका घोटात प्यायचे म्हणून पिऊ नका. कारण त्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. 
  • या प्रोडक्टमध्ये केमिकल्स असे नसते पण तरीसुद्धा तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही त्यावरील सगळे पदार्थ तपासून पाहा. तुम्हाला कोणत्या गोष्टीची अॅलर्जी असेल तर त्याचे सेवन टाळा.