भांडण मिटवण्यासाठी उत्तम उपाय आहे मेक-अप सेक्स

भांडण मिटवण्यासाठी उत्तम उपाय आहे मेक-अप सेक्स

जोडी म्हटली की एकेमकांबरोबर भांडण आणि रुसवा फुगवा या गोष्टी तर गृहीतच आहेत. कितीतरी वेळा हे भांडण इतकं ताणलं जातं की आठवडा आठवडा नवरा - बायको एकमेकांशी न बोलता राहतात. भांडण झाल्यानंतर सर्वात पहिले माफी कोणी मागायची हा खरं तर प्रश्न असतो. मग अशावेळी तुम्ही मेक-अप सेक्सची मदत घेऊन हे भांडण नक्कीच सोडवू शकता. भांडणातून मार्ग काढायचा असेल तर मेक-अप सेक्स हा सर्वात हॉट आणि उत्तम पर्याय  आहे. मेक-अप सेक्स अधिक चांगला बनविण्यासाठी नक्की काय करायचं आणि याचा नक्की अर्थ काय हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. बऱ्याच जणांना कदाचित याबाबत माहीत नाही. तर काही जण याचा फायदाही करून घेत असतील पण याला नक्की काय म्हणतात हे माहीत नसेल. तर जाणून घेऊया नक्की मेक-अप सेक्स काय आहे आणि तुम्ही यामध्ये कोणत्या ट्रिक्स वापरू शकता.

मेक-अप सेक्स म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे

Shutterstock

जिथे प्रेम असतं तिथे भांडणही होतात. नवरा बायकोमध्ये बऱ्याचदा टीव्हीचा रिमोट, मोबाईल, लॅपटॉपवर जास्त वेळ ऑफिसचं काम करणं, स्वयंपाकघरात जास्त वेळ असणं, नको तो खर्च, नातेवाईक यासारख्या गोष्टींवरून भांडणं होतच असतात. या भांडणातून मार्ग काढण्यासाठी तुम्ही मेक-अप सेक्सचा फायदा करून घेऊ शकता. यामध्ये कपल एकमेकांबरोबर अगदी मनमोकळेपणाने भांडतात आणि मग वाईल्ड होऊन इंटिमेट होतात. मेक-अप सेक्सची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे भांडणं तिथल्या तिथे सोडवता येतात आणि तुमचं नातं अधिक बळकट करण्यास फायदेशीर ठरते. तुम्ही जर कधी हे करून पाहिलं नसेल तर तुम्ही नक्की एकदा भांडण झाल्यावर हे करून पाहायला हवं. यामुळे तुमचं नातंही अधिक स्पाईसी आणि नेहमीपेक्षा अधिक रोमँटिक बनतं. यामध्ये नक्की कोणत्या ट्रिक्स वापराव्या हेदेखील आम्ही तुम्हाला सांगत आहोत. 

जोडीदाराला चिडवा

जोडीदाराला चिडवणे यापेक्षा अधिक चांगले काहीच असू शकत नाही. आपल्या भांडणादरम्यान तुम्ही जोडीदाराला चिडवायला सुरूवात करा. तुम्ही भांडण करता करताही अधिक मिश्किल होऊ शकता. त्यांना जितकी चीड येईल तेव्हा तुम्ही डोळा मारा अथवा तुमच्या अंगावरील एक एक कपडा कमी करून त्यांना तुमच्याकडे वेगळ्या नजरेने बघण्यास भाग पाडा. यामुळे त्यांचा राग कमी होऊन मूडही वेगळा होईल आणि तुमच्याकडे अधिक आकर्षित होऊन राग निघून जायला मदत मिळेल. 

असे 11 इशारे ज्यामुळे समजतं की, जोडीदाराला करायचं आहे सेक्स

जोडीदाराला थोडं तडपवणे

shutterstock

भांडणामध्ये ज्याची चूक आहे त्याचं थोडफार नुकसान तर व्हायलाच हवं. जर तुमच्या जोडीदाराची चूक असेल तर त्याला थोडफार तडपवण्याची गरज नक्कीच आहे. तुम्ही थोडं रागवा आणि त्यांनी तुमची समजून काढायला यावी असं काहीतरी तुम्हाला करायला हवं. तुम्ही लवकर होकार मात्र देऊ नका याची काळजी घ्या.

सेक्स करताना जोडीदार असेल बोअरिंग तर वापरा या ट्रिक्स

भांडताना ओरडा

Giphy

तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर भांडण करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही ओरडून तुमचा राग व्यक्त करा आणि असंच ओरडता ओरडता अचानक तुम्ही वाईल्डपणे त्यांचं चुंबन (kiss) घ्या. इंटिमेट होताना तुम्ही तुमची आक्रमकता तशीच ठेवा. त्यामुळे राग कमी होऊन सेक्सही चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता आणि या सेक्सचा आनंद तुम्हाला घेता येतो. यामुळे तुमच्यातील भांडणं कमी व्हायला मदत होते.

तुमचा 'सेक्स मूड' तयार होण्यासाठी ‘या’ आहेत परफेक्ट टॉप 10 ट्रिक्स!

आपल्या जोडीदाराला शिक्षा द्या

Giphy

ज्याची चूक आहे पण त्याला शिक्षा तर मिळायलाच हवी. तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी कोणतीही वेगळी शिक्षा ठरवू शकता. मग त्यामध्ये कपडे काढून झोपायला लावणं असो अथवा डोळ्यावर पट्टी बांधून त्यांना सेक्स करताना सतवणं असो. तुम्ही मेक-अप सेक्स करताना त्यांना अशा तऱ्हेने त्रास देणं हा सेक्समधील प्रेम वाढवण्यााचा एक नक्कीच चांगला पर्याय आहे. यामुळे अधिक सेक्स निर्माण होऊन समाधनही चांगल्या तऱ्हेने होते. 

सेक्स करताना सर्वात पहिले फिलिंग जाणवतं ते स्तनांना

एकमेकांबरोबर करा मस्ती

तुम्ही भांडणातही मस्ती आणू शकता. एकमेकांबरोबर अशा वेळी उशी एकमेकांवर फेकून मस्ती करणे अथवा एकमेकांशी अगदी मारामारी करणे (पण मस्तीमध्ये) हे करू शकता. या मस्तीमध्ये जो जिंकेल त्याच्या आवडीच्या पोझिशनमध्ये सेक्स करायचा असे ठरवण्यात यावे. यामध्ये तुम्ही एकमेकांच्या अधिक जवळ येता आणि भांडणं संपतात.