ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
turmeric use

मुरूमं घालवण्यासाठी करा हळदीचा 5 तऱ्हेने उपयोग

हळद ही आरोग्यासह आपल्या त्वचेसाठीही तितकीच फायदेशीर असते. महिला आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी अनेक ब्युटी ट्रिटमेंट घेतात.  पण बऱ्याचदा काही ट्रिटमेंट घेऊनही चेहऱ्यावरील मुरूमं जात नाहीत मग अशा वेळी तुम्ही काही घरगुती उपायांचा उपयोग करायला हवा. तुमच्या चेहऱ्यावर मुरूमं असतील आणि ते घालवायचे असतील आणि चेहऱ्यावर डाग पडू द्यायचा नसेल तर तुम्ही हळदीचा वापर करा. हळदीचा वापर केल्याने चेहऱ्यावर चमकही येते आणि त्वचेला कोणती बाधाही होत नाही. चमकदार आणि डागविरहीत त्वचेसाठी तुम्ही हळदीचा वेगवेगळ्या तऱ्हेने उपयोग करू शकता. मुरूमं घालविण्यासाठी तुम्हाला साधारण 5 तऱ्हेने हळदीचा उपयोग करून घेता येतो. त्याचीच माहिती लेखातून आम्ही तुम्हाला देणार आहोत. तुम्ही या पद्धतीने वापर करून पाहिल्यास, तुम्हाला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल. जाणून घेऊया कसा करायचा उपयोग. 

हळद आणि कोरफड

हळद आणि कोरफड

Shutterstock

कोरफडमध्ये मेडिक्लिनिकल घटक असतात जे त्वचेसंबंधी कोणतीही समस्या  दूर करण्यास फायदेशीर ठरतात. मुरूमांची समस्या निकालात काढण्यासाठी याचा खूपच फायदा होतो. कोरफड आणि हळदीचा फेस पॅक बनविण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर, 2 चमचे कोरफड जेल घ्या. ही एकमेकांमध्ये नीट मिक्स  करा. हा फेसपॅक तुम्ही चेहऱ्याला लावा आणि साधारण 10 मिनिट्स लाऊन ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा.  तुम्ही दर पंधरा दिवसांनी हा प्रयोग चेहऱ्यावर केल्यास तुम्हाला नक्कीच मुरूमांपासून सुटका मिळेल.

ADVERTISEMENT

हळद आणि कडिलिंब

हळद आणि कडिलिंब

Shutterstock

कडिलिंबाच्या पाल्यात अँटिबॅक्टेरियाल गुण आढळतात जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत लाभदायक असतात. हळद आणि कडिलिंबाचा फेसपॅक बनविण्यासाठी तुम्हाला ताजी कडिलिंबाची पानं घेणे आवश्यक आहे. ही पानं घेऊन  त्याची मिक्सरमधून पेस्ट तयार करा. ही पेस्ट तयार झाली की त्यात हळद पावडर मिक्स करा. हा लेप तुम्ही मुरूमं आलेल्या ठिकाणी लावा. पेस्ट चेहऱ्यावर सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा. याचा परिणाम तुम्हाला लवकर दिसून येतो. 

Pimple-free चेहरा मिळवण्यासाठी करा घरगुती उपचार

ADVERTISEMENT

हळद आणि मध

हळद आणि मध

Shutterstock

चेहरा उजळविण्यासाठी मध आणि हळद हे मिश्रण खूपच उत्कृष्ट आहे. मध आणि हळद हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास, मुरूमं तर निघून जातातच पण त्याहीपेक्षा अधिक त्वचा मऊ आणि मुलायम होते. मध  आणि हळदीचा हा फेसपॅक बनविण्यासाठी 1 चमचा हळद आणि अर्धा चमचा मध घ्या. हळद आणि मध व्यवस्थित मिक्स करून घ्या. हा लेप चेहऱ्याला लावा. सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा. तुम्हाला त्वरीत परिणाम दिसून येईल. 

हळदीच्या दुधाचे फायदे वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य, करून घ्या फायदा

ADVERTISEMENT

हळद आणि दही

हळद आणि दही

Shutterstock

दह्यामध्ये लेक्टिक अॅसिड आढळतं जे त्वचेसाठी उपयुक्त ठरतं. हळद आणि दह्याचा फेसपॅक बनविण्यासाठी 2 चमचे हळद पावडर आणि अर्धा चमचा दही घ्या. हे व्यवस्थित मिक्स करा. यात गुठळी राहू देऊ नका. ही पेस्ट चेहऱ्याला लावा आणि 20 मिनिट्सने चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यातला फरक जाणवेल. तुमचा चेहरा अधिक मऊ आणि मुलायम होईल. 

घरगुती सौंदर्यप्रसाधन वापरून घ्या त्वचेची काळजी – तज्ज्ञांचा सल्ला

ADVERTISEMENT

हळद आणि दूध

हळद आणि दूध

Shutterstock

दुधामध्ये लेक्टिक अॅसिड असतं जे त्वचेला हानी पोहचविणाऱ्या किटाणूंपासून वाचवेत. हळद आणि दुधाचा वापर केल्याने चेहऱ्यावर अधिक चमक येते आणि मुरूमं घालविण्यासाठी फायदेशीर ठरते. हळद आणि दुधाचा फेसपॅक बनविण्यासाठी 2 चमचे दूध, अर्धा चमद हळद पावडर आणि कापूस घ्या. दूध आणि हळद मिक्स करून घ्या आणि कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. सुकल्यावर थंड पाण्याने चेहरा धुवा.  तुम्हाला त्वरीत फरक दिसून येईल आणि  चेहरादेखील अधिक मऊ मुलायम होईल. 

तजेलदार त्वचेसाठी कच्च्या दुधात मिसळा पपई, मध आणि नियमित करा वापर

ADVERTISEMENT

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

10 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT