रेकॉर्ड ब्रेक ठरला तानाजी, यंदा 'या' बॉलीवूड चित्रपटांना छोट्या पडद्यावर सर्वाधिक पसंती

रेकॉर्ड ब्रेक ठरला तानाजी, यंदा 'या' बॉलीवूड चित्रपटांना छोट्या पडद्यावर सर्वाधिक पसंती

बॉलीवूडचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही महिन्यांनी टेलिव्हिजनवर पुन्हा दाखवण्यात येतात. काही चित्रपट जितके चित्रपटगृहात सुपरहिट होतात. तितकंच छोट्या पडद्यावरही आवडीने पुन्हा पाहिले जातात. या वर्षीही असे काही चित्रपट आहेत. ज्यांना थिएटरच्या स्क्रीनप्रमाणेच घरातील टिव्हीवरही लोकांनी पुन्हा पुन्हा पाहिले. लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसची भिती यामुळे सिनेमागृह बंद आहेत. मात्र छोट्या पडद्यावर काही जुनेच चित्रपट या वर्षी पुन्हा पुन्हा आवडीने पाहिले गेले. ज्यामुळे या चित्रपटांना छोट्या पडद्यावर दर्शकांची चांगली पसंती मिळाली आहे. एवढंच नाही तर यामुळे चॅनलवरील व्हिवरशिपचे अनेक रेकॉर्ड या चित्रपटांनी या वर्षी ब्रेक केले आहेत. जाणून घेऊ या या चित्रपटांबाबत...यात सर्वात टॉप रेटिंगवर आहे. तानाजी दी अनसंग वॉरियर हा अजय देवगनचा सुपरहिट चित्रपट. 

तानाजी दी अनसंग वॉरिअर -

अभिनेता अजय देवगन याचा या वर्षी सुपरहिट ठरलेला चित्रपट तानाजी सिनेमागृहाप्रमाणेच टिव्हीवरही लोकांनी पुन्हा आवडीने पाहिला आहे. स्वातंत्र्यदिनी हा चित्रपट टिव्हीवर पुन्हा दाखवण्यात आला होता. पंधरा ऑगस्टला हा चित्रपट छोट्या पडद्यावर खरंतर दुसऱ्यांदा प्रसारित करण्यात आला होता. मात्र दोन्ही वेळी हा चित्रपट खूप मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला. हा चित्रपट छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी कलाकारांनी सोशल मीडियावर स्वतःहून प्रेक्षकांना आवाहन केले होते. ज्यामुळे तानाजी मालुसरे यांची ही शोर्यगाथा पुन्हा पुन्हा पाहणे लोकांनी जास्त पसंत केले. 

 

 

तानाजीची लोकप्रियता कायम -

तानाजी चित्रपट हा शिवछत्रपतींचे आवडते मावळे आणि स्वराज्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीरयोद्धा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. यात तानाजी यांची भूमिका अजय देवगन तर त्यांची पत्नी सावित्रीबाई यांची भूमिका काजोलने साकारली होती. त्याचप्रमाणे यात शरद केळकर याने छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारली होती. तर सैफ अली खान याने मुघलांच्या बाजूने लढणारा उदयभान राठोड साकारला होता. या चित्रपटाची निर्मिती स्वतः अजय देवगनने केली असून याचे दिग्दर्शन ओम राऊत याचे आहे. 

तानाजी तोडले छोट्या पडद्यावरील रेकॉर्ड -

तानाजी दी अनसंग वॉरिअर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला तेव्हा तो बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला होता. मात्र आता  त्याची जादू टेलिव्हिजवरही कमी नाही. सूत्रांनी दिलेल्या माहीतीनुसार  पहिल्यांदा टेलिव्हिजवर प्रसारित झाल्यावर तो दीड करोडपेक्षा जास्त लोकांनी पाहिला होता. तर आता पुन्हा दुसऱ्यांदा प्रदर्शित झाल्यावर तो तीन करोडपेक्षा जास्त लोकांनी पुन्हा पाहिल्याची नोंद झाली आहे. या पुर्वी बाहुबली चा दुसरा भाग 2.6 करोड तर दंगल चित्रपट 1.6 लोकांनी पाहिला  होता. त्यामुळे तानाजीने छोट्या पडद्यावरील सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. मात्र वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमिअरमधील नोंदीत सर्वाधिक पसंती ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉरला मिळाली आहे. कारण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाने सर्व व्यूव्हरशिपचे रेकॉर्ड तोडले आहेत. या चित्रपटाने आतापर्यंत 6.8 दर्शकांना आकर्षित केलं आहे.