टीव्हीवर या कलाकारांनी निभावली आहे श्रीकृष्णाची भूमिका

टीव्हीवर या कलाकारांनी निभावली आहे श्रीकृष्णाची भूमिका

कलाकारांनी निभावलेल्या काही भूमिका अशा असतात ज्या आपल्याला काही केल्या विसरता येत नाहीत. मग ती एखाद्या व्हिलनची असो वा हिरोची ती भूमिका आपल्या मनात खास जागा करुन जाते. तर काही भूमिका अशा असतात ज्यामुळे कलाकाराला आपसुकच देवासारखे महत्व प्राप्त होते. हो आम्ही त्याच कलाकारांबाबत बोलत आहोत ज्या कलाकारांनी ऑनस्क्रिन देवांच्या भूमिका बजावल्या आहेत. विशेषत: सगळ्यांच्या लाडक्या कृष्णाची भूमिका. आतापर्यंत अनेकांनी श्रीकृष्णावर आधारीत अनेक अशा पौराणिक मालिकांची निर्मिती केली. या प्रत्येक मालिकांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या कलाकारांनी कृष्णाची भूमिका साकारली आहे. आज आपण अशाच काही कलाकारांची माहिती घेणार आहोत. 

अभिनयासाठी 'या' बॉलीवूड कलाकारांनी सोडली हातातली नोकरी

नितीश भारद्वाज

Instagram

श्रीकृष्ण अवतार म्हटला की, अगदी पहिले नाव आपल्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे नितीश भारद्वाज यांचे. बीआर चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या 90 च्या पौराणिक मालिकेत श्रीकृष्णाचे पात्र नितीश भारद्वाज यांनी साकारले होते. तो गोड लाजरा चेहरा, चेहऱ्यावरील कमालीचे भाव यामुळे श्रीकृष्ण म्हणून लोकांनी त्यांना मान्यता दिली. त्यांच्या अभिनयाचा पगडा त्यावेळी लोकांवर इतका होता की, ते कुठेही दिसले की लोक त्यांच्या पाया पडत असे, असा अनुभव त्यांनी अनेकदा सांगितला आहे. नितीश भारद्वाज यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. पण अभिनयापुरते मर्यादित न राहता त्यांनी पुढे राजकारणातही काम करायचे ठरवले. सध्या नितीश भारद्वाज त्यांच्या इन्स्टा आणि फेसबुक पेजवरुन त्यांच्या फॅन्सना भेट देत असतात.

स्वप्निल जोशी

Instagram

जसे कृष्ण म्हणजे नितीश भारद्वाज असे नाव घेतले जाते. तसेच तरुण किंवा युवा कृष्णा म्हणून अभिनेता स्वप्निल जोशी फारच प्रसिद्ध आहे. महाभारतानंतर अनेक पौराणिक मालिका येऊ लागल्या. ‘श्रीकृष्ण’ या मालिकेमध्ये तो तरुण कृष्णाच्या भूमिकेत दिसला होता. त्याने साकारलेली कृष्णाची भूमिका अनेकांना इतकी आवडली होती. आजही त्याला त्याच्या भूमिकेचा अनुभव अगदी आवर्जून विचारला जातो. स्वप्निलने श्रीकृष्णच नाही तर उत्तरामायणामध्ये छोट्या कुशची भूमिकाही साकारली आहे. स्वप्निल जोशी सिर्फ नाम ही काही है.. कारण मराठी सिनेसृष्टीतील हा महत्वाचा चेहरा आहे. त्याने हिंदी मालिका, चित्रपटांमधून महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 

सर्वदमन बॅनर्जी

Instagram

90च्या दशकामध्ये अनेक पौराणिक घटनांवर आधारीत मालिका येत राहिल्या. श्रीकृष्णाशी निगडीत अनेक मालिका या काळात येत होत्या. बालकृष्णासोबतच मोठ्या कृष्णाची भूमिका साकारणारे कलाकार अनेकांच्या लक्षात राहिले. त्यामधीलच एक नाव म्हणजे सर्वदमन बॅनर्जी. रामानंद सागर यांच्या ‘श्रीकृष्ण’ या मालिकेमध्ये त्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती. बंगाली, हिंदी, तेलगु अशा अनेक भाषांमधून त्यांनी काम केले होते. 1983 साली आलेल्या ‘आदी शंकराचार्य’ या चित्रपटात त्यांनी शंकराचार्याची भूमिका साकारली जिला अनेक पुरस्कार प्राप्त झाले. 

अभिनेत्री नसूनही या आहेत बी टाऊनच्या दमदार सेलिब्रिटी

सौरभ राज जैन

Instagram

90 च्या काळात ज्या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले त्यापैकी एक म्हणजे ‘महाभारत’ पण पुन्हा एका महाभारत ही मालिका आली. नव्या कलाकारांसह, या नव्या महाभारतात सौरभ राज जैन याने श्रीकृष्णाची भूमिका स्विकारली होती. या मालिकेने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. नवा श्रीकृष्ण म्हणून तो ओळखला जाऊ लागला. त्याने इतरही काही पौराणिक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याची ओळख श्रीकृष्ण म्हणून आजही केली जाते.

कधी काळी या अभिनेत्रींनी निभावली होती व्हिलनची भूमिका

विशाल करवाल

Instagram

MTV च्या Roadies या रिअॅलिटी शोमधून पहिल्यांदा विशालची ओळख झाली. चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या विशालला श्रीकृष्णाच्या रोलसाठी निवडण्यात आले. गालावर खळी असलेला, आधीच मुलींमध्ये प्रसिद्ध असलेल्या विशालला श्रीकृष्ण साकारण्याची संधी मिळाली. त्याने मालिकाच नाही तर चित्रपटांमध्येही काम केले आहे. विक्रम भटच्या 2016 साली आलेल्या 1920 लंडन या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत दिसला होता. पण कृष्णाची भूमिका साकारल्यामुळे त्याला एक वेगळी ओळख मिळाली होती. 

धृति भाटिया

Instagram

हल्लीच्या काळात बाळकृष्णाची भूमिका साकारणारा गोड चेहरा म्हणजे धृति भाटिया. ‘जय श्री कृष्ण’ या मालिकेत तिने बाळ कृष्णाची भूमिका साकारली होती. तिचा तो गोंडस चेहरा आजही अनेकांच्या लक्षात आहे. पहिल्यांदाच कृष्णाची भूमिका साकारणारी व्यक्ती ही मुलगी होती. त्यामुळे तिचे अधिकच कौतुक झाले होते. 


तर हे होते असे काही चेहरे ज्यांनी ऑनस्क्रिन निभावलेल्या कृष्णाच्या भूमिका फारच गाजल्या.आताही श्रीकृष्ण ही मालिका सुरु असून सध्या हे कॅरेक्टर सुमेध मुद्गाळकर साकारत आहे.