कलौंजी(Kalonji)च्या बियांना इंग्रजीमध्ये Black Seeds अथवा Nigella Seeds असंही म्हटलं जातं. भारतीय खाद्यसंस्कृतीत कलौंजीच्या बिया या अन्नाला स्वाद आणणारा एक मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखल्या जातात. भारतात सुकलेल्या कलौंजीच्या बिया भाजून त्याचा वापर निरनिराळ्या प्रकारच्या रस्साभाजी, डाळ, सांबर अथवा भाज्यांमध्ये केला जातो. समोसा, पापडी, कचोरीसारख्या खुशखुशीत पदार्थांना अधिक स्वादिष्ट करण्यासाठीदेखील कलौंजी वापरली जाते. आहारात कलौंजीच्या बिया आणि तेलाचा वापर करणे आरोग्यासाठी नक्कीच हितकारक आहे. कारण कलौंजीमध्ये अनेक पोषक घटक असतात ज्यांचा आपल्या शरीरावर आणि सौंदर्यावर चांगला फायदा होतो. यासाठी जाणून घ्या कलौैंजीचे फायदे
कलौंजीच्या बियांमध्ये अमिनो अॅसिड. प्रोटिन्स, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, आवश्यक तेल, अल्कालॉईड्स्, सॅपोनिन, फायबर्स असते. यातील कार्बोहायड्रेट्समध्ये मोनोसॅक्हेराईड, अरबीनोज, ग्लुकोज, रेम्नोज आणि झायलोज या घटकांचा समावेश असतो. त्याचप्रमाणे यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, तांबे, पोटॅशिअम आणि सोडियमही पुरेशा प्रमाणात असते. स्वयंपाकासाठी अगदी कमी प्रमाणात याचा वापर केला जातो. कलौंजीच्या बियांच्या तेलाचाही वापर एखाद्या सप्लीमेंटप्रमाणे केला जातो. कारण या तेलामध्ये या बियांमधील पोषक घटक असतात.
कलौंजीच्या बिया आणि तेलामध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. शरीराच्या अनेक आरोग्य समस्यांवर कलौंजी एखाद्या रामबाण उपायाप्रमाणे काम करते यासाठी जाणून घेऊ या कलौंजीचे फायदे
अनेकांना चुकीचे औषधोपचार, अती प्रमाणात मद्यपान, एखादा आजार अथवा इतर काही कारणांमुळे यकृताच्या समस्या निर्माण होतात. त्यांच्यासाठी कलौंजी एखाद्या वरदानाप्रमाणे करते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार कलौंजीच्या बिया आणि तेल हे यकृतासाठी अतिशय फायदेशीर आहे. कारण त्यामुळे यकृताच्या समस्या कमी तर होतातच शिवाय भविष्यात होणाऱ्या समस्या रोखण्यास मदत होते.
कलौंजी आहारात असण्याचा हा एक सर्वात महत्त्वाचा फायदा ठरू शकतो. कारण ज्यांना मधुमेह आहे त्यांच्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणं फार गरजेचं असतं. कलौंजीमुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते. यासाठी ज्यांना मधुमेह आहे त्यांनी सकाळच्या ब्लॅक टीसोबत एक चमचा कलौंजीचे तेल घ्यावे. ज्यामुळे काहीच आठवड्यांमध्ये त्यांच्या इन्शुलिनच्या पातळीत हवा तसा बदल झालेला त्यांना दिसून येईल.
आजकालच्या धकाधकीच्या जीवनात जवळजवळ सर्वांनाच डोकेदुखीचा त्रास जाणवतो. अती कामाचा ताण, चिंता काळजी यामुळे त्यात अधिकच भर पडत असते. मात्र या समस्येवर उपाय करण्यासाठी सतत डोकेदुखीच्या गोळ्या घेणे आरोग्यासाठी मुळीच हितकारक नाही. त्याऐवजी डोकेदुखी सुरू झाल्यावर थोडं कलौंजीचं तेल जर तुम्ही कपाळाला लावलं तर तुम्हाला काहीच मिनीटांमध्ये आराम मिळू शकतो.
तुम्ही वजन कमी करण्यासाठी जर कोमट पाणी, मध आणि लिंबू पित असाल तर आता त्यामध्ये चिमूटभर कलौंजीच्या बियाही टाकण्यास सुरूवात करा. कारण याचा तुमच्या वजन कमी करण्यासाठी चांगला फायदा होऊ शकतो. अनेक आरोग्य तज्ञ सांगतात की कलौंजी यासाठी इतकं फायदेशीर आहे की यामुळे काहीच दिवसांमध्ये तुम्ही तुमचं सर्व जास्तीचं वजन कमी करू शकता.
सांधेदुखीवर आजीच्या बटव्यातील उपायांमध्ये कलौंजी हे एक प्रभावी घरगुती औषध आहे. यासाठी मुठभर कलौंजीच्या बिया तिळाच्या तेलासोबत गरम करा. हे तेल थंड झाल्यावर तुमच्या दुखणाऱ्या सांध्यावर या तेलाने मसाज करा. यामुळे सांध्यामध्ये होणाऱ्या वेदना, दाह कमी होतो.
ज्यांना अती रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी दररोज कोमट पाण्यात अर्धा चमचा कलौंजीचे तेल पिण्याने त्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कारण यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रणात येऊ लागते. एवढंच नाही तर अती रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांच्या आहारात कलौंजी असल्यास त्यांना नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.
किडनी स्टोन अथवा मूतखडा ही समस्याही आजकाल अनेकांमध्ये आढळते. या समस्येला दूर ठेवण्यासाठी कोमट पाण्यात दोन चमचे मध आणि अर्धा चमचा कलौंजीचे तेल मिसळा आणि घ्या. या उपाय केल्यामुळे किडनी स्टोन, किडनीचे इनफेक्शन, त्यामुळे होणारी पोटदुखी यातून आराम मिळू शकतो. मात्र जर तुम्हाला या त्रासामुळे तीव्र त्रास होत असेल तर त्वरीत याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.
फार पूर्वीपासून कलौंजीचा वापर दातांच्या आरोग्यासाठी केला जात आहे. दातदुखी, दातांमध्ये आलेली सूज, हिरड्यांमधून रक्त येणं अशा समस्या यामुळे बऱ्या करता येतात. यासाठी दंतवैद्यांचा सल्ला घेणं नक्कीच गरजेचं आहे. मात्र दातांच्या समस्या निर्माणच होऊ नयेत आणि दात मजबूत व्हावेत यासाठी तुम्ही दही आणि कलौंजीच्या तेलाने दिवसातून दोनदा दात आणि हिरड्यांना मसाज करू शकता.
दररोज सकाळी कोमट पाण्यातून कलौंजी तेल, मध घेणं हा निरोगी राहण्याचा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे तुमची रोग प्रतिकारशक्ती चांगली होते. तुम्ही दररोज दिवसातून एकदा हा उपाय यासाठी नक्कीच करू शकता. इनफेक्शनपासून दूर राहण्यासाठी नाक आणि चेहऱ्यावर वाफ घेतानाही गरम पाण्यात तुम्ही कलौंजीचे तेल वापरू शकता. यामुळे तुमचे नाक मोकळे होते आणि सायनसच्या समस्या कमी होतात.
कलौंजीच्या तेलामुळे हानिकारक किटाणू,विषाणू आणि सूक्ष्म जीवांपासून तुमचे संरक्षण होते. अशा विषाणू आणि सूक्ष्म जीवांचे संक्रमण रोखण्यासाठी कलौंजीचे तेल फायदेशीर ठरते. त्यामुळे वातावरणातील कोणतेही इनफेक्शन दूर ठेवायचे असेल तर कलौंजीच्या बिया आणि तेलाचा वापर जरूर करा.
आजकाल प्रजननक्षमता कमी झाल्यामुळे अनेक जोडप्यांना अपत्यसुखापासून वंचित राहावे लागते. मात्र एका संशोधनानुसार कलौंजीमुळे पुरूषांच्या प्रजननक्षमतेत चांगली वाढ होते. कलौंजीच्या बिया नियमित आहारात असल्यामुळे पुरूषांच्या शूक्राणूंची वाढ आणि गुणवत्ता सुधारण्यास मदत होते. यासाठीच नेहमीच्या जेवणामध्ये कलौंजीच्या बियांचा अवश्य वापर करा.
जर तुम्हाला एक्ने अथवा पिंपल्सचा त्रास जाणवत असेल तर तुम्ही सौंदर्य खुलवण्यासाठीही कलौंजीचा वापर करू शकता. यासाठी लिंबाच्या रसात कलौंजीचे तेल मिसळा आणि पिंपल्सवर लावा. दिवसातून दोनदा तुम्ही हा उपाय करू शकता. ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील एक्ने नक्कीच कमी होतील.
केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी कलौंजीमधील घटक तुमच्या फायद्याचे ठरू शकतात. जर तुमचे केस खूप गळत असतील तर तुम्ही नारळाचे तेल अथवा ऑलिव्ह ऑईलमध्ये थोड्या प्रमाणात कलौंजीचे तेल मिसळून त्याने केसांना मसाज करा. ज्यामुळे तुमच्या स्काल्पचे आरोग्य सुधारेल आणि केसांमधील कोंडा, कोरडेपणा कमी होईल. केस मुळापासून सुरक्षित झाल्यामुळे केस गळणे कमी होईल.
कलौंजीच्या बियांची पावडर आणि तेल अनेक आरोग्य समस्यांवर उपाय म्हणून वापरण्यात येते. मात्र लक्षात ठेवा या घटकांचे प्रमाण नेहमी एखाद्या औषधाप्रमाणेच असावे. अन्नाचा स्वाद वाढवण्यासाठी अथवा एखाद्या आरोग्य समस्येवर उपाय करण्यासाठी ते प्रमाणात वापरल्यास नक्कीच धोकादायक नाही. मात्र कलौंजीचाही अती प्रमाणात वापर नक्कीच करू नये. शिवाय ज्यांना कलौंजीची अॅलर्जी आहे अशा लोकांना यामुळे अंगावर पुरळ उठणे, पोटात बिघाड होणे, उलटी, बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होऊ शकतात. काही लोकांना अती प्रमाणात कलौंजी घेतल्यास चक्करही येऊ सकते. यासाठीच अॅलर्जी असलेल्या लोकांनी, गरोदर आणि स्तनपान देण्याऱ्या मातेने, लहान मुले अथवा वृद्ध आणि आजारी लोकांनी कलौजी कमी प्रमाणातच घ्यावी. त्रास जाणवत असल्याच त्याचा वापर त्वरीत बंद करून डॉक्टरांकडे जावे.
कलौंजीच्या बिया थोड्याशा भाजून घ्यावात आणि वाटून त्याचा वापर अन्नातील स्वाद वाढवण्यासाठी करावा. तुम्ही एखादी करी, डाळ अथवा भाजीमध्ये मसाल्याप्रमाणे कलौंजीच्या बियांची पूड वापरू शकता. त्याचप्रमाणे या बियांच्या तेलाचा वापर कोमट पाण्यातून पोटात घेण्यासाठी करता येतो.
कलौंजीच्या बिया कच्च्या स्वरूपात खाण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही कोमट पाणी, अन्नपदार्थांमधून आहारात कलौंजी घेऊ शकता.
आरोग्य तज्ञ अनेक आरोग्य समस्यांवर उपाय करण्यासाठी कलौंजीचे तेल कोमट पाण्यातून उपाशी पोटी, जेवणापूर्वी अथवा झोपण्यापूर्वी घेण्याचा सल्ला देतात. त्यामुळे कलौंजी उपाशीपोटी घेण्यास काहीच हरकत नाही.