या कारणांसाठी दर आठवड्याला नाश्त्यात असायलाच हवे 'कांदेपोहे'

या कारणांसाठी दर आठवड्याला नाश्त्यात असायलाच हवे 'कांदेपोहे'

भारतीय खाद्यसंस्कृतील एक खास आणि सर्वांचाच आवडता पदार्थ म्हणजे कांदेपोहे. कांदेपोहे महाराष्ट्रात तर इतके प्रसिद्ध आहेत की लग्नासाठी स्थळ पाहण्याच्या कार्यक्रमालाच 'कांद्यापोह्यांचा कार्यक्रम' असं म्हटलं जातं. घरात कुणी पाहुणे आले की हा पदार्थ अगदी पटकन करता येतो. बऱ्याचजणांच्या घरी सकाळी नाश्तादेखील कांदेपोह्यांचाच असतो. पोह्यांपासून कांदेपोह्यांप्रमाणेच दडपे पोहे, गोड पोहेही केले जातात. तांदळापासून पोहे तयार होत असल्यामुळे त्यात भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट, फायबर, लोह, अॅंटि ऑक्सिडंट, व्हिटॅमिन असतं. शिवाय पोहे हा ग्लूटेन फ्री नाश्ता आहे. एवढंच नाही कांदेपोहे खाण्याचे शरीर आणि आरोग्यावर अनेक चांगले फायदे होतात. यासाठीच जाणून घ्या कांदेपोहे खाणं का फायद्याचं आहे.

Instagram

पचनासाठी हलके -

पोहे बरेचदा सकाळच्या नाश्यासाठी केले जातात. सकाळचा नाश्ता जरी भरपेट करणं गरजेचं असतं. कारण रात्रभर तुमचे पोट रिकामे असतं. त्यामुळे सकाळी पोह्यांसारखा हेल्दी नाश्ता केल्यामुळे तुमचे योग्य पोषण होऊ शकते. पोहे पचण्यास हलके असल्यामुळे त्यामुळे तुम्हाला अपचनाच्या समस्या होत नाहीत. 

पोट पटकन भरते -

पोह्यामध्ये कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशी शक्ती  मिळते. शिवाय त्यामध्ये फायबर्स असल्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. यासाठीच सकाळचा नाश्ता नेहमी पोह्याचा असावा.

Instagram

रक्तातील साखर वाढत नाही -

पोह्यामध्ये फायबर्स  असल्यामुळे तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहींनी नाश्त्यातून पोहे खाण्यास काहीच हरकत नाही. 

अशक्तपणा कमी होतो -

जर तुम्ही नियमित पोहे नाश्त्यातून खात असाल तर तुम्हाला यातून पुरेसे लोह मिळू शकते. ज्यांना अशक्तपणा अथवा अॅनिमिया आहे अशा लोकांना पोहे खाणे फायद्याचे ठरेल. गरोदर महिला, स्तनपान देणाऱ्या माता, लहान मुले, वृद्धांना पोह्याचा नाश्ता तुम्ही देऊ शकता. 

ग्लूटेन फ्री नाश्ता -

काही लोकांना ग्लूटेनयुक्त पदार्थांमुळे त्रास होतो. गहू, नाचणी अशा पदार्थांपासून तयार केलेल्या पदार्थांमध्ये ग्लूटेन असते. मात्र अशा लोकांना पोहे हा एक चांगला पर्याय मिळू शकतो. कारण पोह्यांमध्ये ग्लूटेनचे प्रमाण अगदी कमी प्रमाणात असते.

Instagram

कॅलरिज कमी -

जर तुम्ही हेल्थ कॉन्शिंअस असाल अथवा तुम्हाला खाण्यामुळे कॅलरिज वाढतील याची भिती असेल तर तुम्ही पोहे खाऊ शकता. कारण पोह्यांमध्ये अतिशय कमी प्रमाणात कॅलरिज असतात. 

एक उत्तम प्रोबायोटिक -

पोहे खाण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पोहे हे क चांगले प्रोबायोटिक आहे. कारण तांदळापासून पोहे तयार करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्यात पोह्यांमध्ये फर्मेंटेशन होतं आणि ते खाण्यासाठी योग्य होतात. 

Instagram

कांदेपोहे करण्याची सोपी पद्धत -

कांदेपोहे निरनिराळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात. मात्र घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने टेस्टी  कांदेपोहे तयार करण्यासाठी ही एक सोपी पद्धत आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.


कांद्यापोह्यांसाठी लागणारे साहित्य -

दोन कप भिजवलेले पोहे, एक चिरलेला कांदा, कडिपत्ता, दोन चिरलेल्या हिरवी मिरच्या, भाजलेले शेंगदाणे, उकडलेले मटार, उकडलेला बटाटा, मोहरी, जिरे, हळद, तेल, चिरलेली कोथिंबीर, किसलेले ओले खोबरे, लिंबू, साखर आणि मीठ 

कांदेपोहे करण्याची कृती -

कढईत तेल गरम करा त्यात मोहरी, जिरे टाकून ते तडतडू लागले की कडिपत्ता, चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाका.कांदा लालसर झाल्यावर त्यात हळद टातता. शेंगदाणे, मटार आणि उकडलेला बटाटा त्यात टाका. चांगले एकजीव करून  त्यात पोहे टाका आणि चांगले परतून घ्या. झाकण ठेवून एकदा वाफ येऊ द्या. गरमागरम पोहे कोथिंबीर, खोबरे आणि लिंबाच्या फोडीने सजवा. 

तेव्हा नियमित कांदेपोहे खा आणि निरोगी राहा.