चेहऱ्यावर लावा बर्फ आणि अवाढव्य चरबी करा कमी

चेहऱ्यावर लावा बर्फ आणि अवाढव्य चरबी करा कमी

बर्फाचा कोल्डड्रिंकमध्ये घालण्यासाठी आणि चेहऱ्याला लावण्यासाठीचा उपयोग आपल्या प्रत्येकाला माहीत असतो. पण बर्फाचा त्वचेसाठी किती फायदा होतो आणि इतकंच नाही तर चेहऱ्यावर वाढलेली अवाढव्य चरबी कमी करण्यासाठी फायदा होतो हे तुम्हाला माहीत आहे का? चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण वेगवेगळे फेसमास्क अथवा लेप लावतो. पण बऱ्याचदा त्याने चेहऱ्यावर हवी तशी चमक येत नाही. त्यासाठी नक्की काय करायला हवं आणि बर्फाचा वापर करून कशी चरबी कमी करता येते ते आपण या लेखातून पाहूया. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही बर्फाचा तुकडा उचलून डायरेक्ट चेहऱ्याला न लावता विशिष्ट पद्धतीने त्याचा वापर करावा. बर्फाचा तुकडा हा कॉटन कपड्यात गुंडाळून घ्या आणि त्यानंतरच तो चेहऱ्यावर फिरवा. जेणेकरून तुम्हाला त्याचा अधिक फायदा मिळू शकेल. नुसता बर्फ चेहऱ्यावरून फिरवल्यास तुमचा चेहरा अधिक लाल होऊ शकतो आणि मुळात तुमचा चेहरा नाजूक असतो त्यामुळे त्यावर रॅशही येऊ शकतात. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. पाहूया कसा फायदा  होतो. 

चरबी कमी होते

Shutterstock

चेहऱ्यावर चरबी कधीही चांगली दिसत नाही. चेहरा तेजस्वी हवा असेल तर चेहऱ्यावरील चरबी कमी होणं गरजेचं आहे. त्यासाठी तुम्ही बर्फाचा वापर करून घेऊ शकता. तुम्ही नियमित बर्फ चेहऱ्यावर फिरवल्याने चेहऱ्यावर निस्तेजता जाऊन तुमच्या चेहऱ्यावरील चरबी वितळण्यास मदत मिळते. तसंच ज्यांचं वय वाढत चालले आहे आणि चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागल्या आहेत, त्यांनाही चेहऱ्यावरून बर्फ फिरवणे फायदेशीर ठरते. नियमित तुम्ही याचा वापर केल्यास चेहरा ताजातवाना राहातो. सुरकुत्याही पडत नाहीत. चेहऱ्यावर बर्फ घासल्याने चांगला मसाज होतो. त्यामुळेच तुम्ही बघाल की जेव्हा तुम्ही पार्लरमध्ये जाता तेव्हा फेशियल अथवा क्लिनअप करताना चेहऱ्यावर नेहमी बर्फाचा वापर केला जातो. त्याचं कारण हेच आहे की, तुमची त्वचा अधिक तजेलदार होते. 

#WeightLoss : वजन कमी करण्यासाठी करा बर्फाचा वापर

मेकअप करण्याआधी बर्फ फिरवा

Shutterstock

तुम्ही कितीही महागडी मेकअप उत्पादनं वापरली तरीही तुम्हाला जर चेहऱ्यावर घाम येत असेल तर त्याचा काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर चेहऱ्यावर मेकअप टिकवायचा असेल तर तुम्ही मेकअप करण्याआधी चेहऱ्यावर बर्फ फिरवा. जेणेकरून तुमचा मेकअप जास्त काळ टिकू शकेल. असे केल्याने तुमचा चेहरा अधिक टवटवीत आणि ताजातवानादेखील राहील. तुम्हाला घामही लवकर येणार नाही. 

Beauty Tips : बर्फाच्या तुकड्यांचा वापर करा सौंदर्य मिळवा

चरबीसह काळी वर्तुळेही होतात गायब

Shutterstock

तुमच्या चेहऱ्यावर चरबी असेल तर चेहरा निस्तेज होतो आणि चेहऱ्यावर काळी वर्तुळंही जमा होतात. अशावेळी कोणत्याही महागड्या उत्पादनांचा वापर करण्याऐवजी तुम्ही बर्फाचा वापर करा. बर्फ तयार करतना गुलाबपाणी आणि काकडीचा रस पाण्यात मिसळून याचा बर्फ तयार करण्यासाठी  ठेवा आणि बर्फाचे तुकडे तयार झाल्यानंतर तुमच्या चेहऱ्याच्या त्वचेवर याचा वापर करा. नियमित तुम्ही याचा वापर केल्यास तुम्हाला उत्तम परिणाम दिसून  येईल. चेहऱ्यावर तुम्ही हा बर्फ व्यवस्थित घासल्यास,  चरबी आणि काळी वर्तुळं गायब होण्यास तुम्हाला मदत मिळते. यामुळे तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह चांगला होतो आणि चेहऱ्यावर चमकदारपणा येतो. तसंच तुमचा चेहरा तेलकट असेल आणि मुरूमं येत असतील तर त्यासाठी बर्फ हा उत्तम उपाय आहे. तुम्ही नियमित बर्फाचा उपयोग केल्यास, तुम्हाला यापासून सुटका मिळते. 

पुदीना आणि तुळशीच्या आईस क्यूबने बनवा अधिक तजेलदार त्वचा