पाण्यात डुंबायला अनेकांना आवडतं. विशेषत: तीव्र उन्हाळ्यात ही इच्छा अधिक होते. मग आपण मस्त रिसोर्ट किंवा छान नदीमध्ये डुंबण्याचा प्लॅन करतो. एक दिवस जरी आपण मनसोक्त पोहलो तरी आपल्याला त्या दिवशी इतका थकवा येतो की, आपलं अंग दुखू लागतं, खूप भूक लागते आणि कधी कधी तर स्विमिंगनंतर छान झोपही येते. तुम्ही जर पोहत असाल तर तुम्हाला पोहण्याचे अनेक फायदे मिळतील. पोहणे हा जरी मजेचा खेळ वाटत असला तरी हा एक व्यायामप्रकार आहे. ज्याचे अनेक फायदे आहेत. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत पोहण्याचे फायदे. ज्यांना व्यायामाचा कंटाळा आहे अशी लोकं तर अगदी हमखास याचा फायदा होईल. चला करुया सुरुवात आणि जाणून घेऊया पोहण्याचे फायदे
शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी ‘पोहणे’ हे उत्तम आहे हे तर आम्ही तुम्हाला सांगितले. पण आता जाणून घेऊया या पोहण्याचे फायदे नेमके आहेत तरी काय
तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल पण तुम्हाला कशाचाही फायदा होत नसेल. डाएट करताना तुम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर अशावेळी तुमच्यासाठी पोहणे हे वरदान आहे. पोहताना आपण संपूर्ण शरीराची हालचाल करत असतो. त्यामुळे साहजिकच तुमच्या प्रत्येक अवयावाचा व्यायाम होतो. ज्यावेळी आपण पोहतो. पोहताना पाणी कापत आपण पुढे जातो. असे करण्यासाठी तुमच्या शरीरात असलेली सगळी उर्जा वापरली जाते. तुमच्या शरीरातील फॅट कमी करण्यास मदत करते. तुमच्या शरीराचे अतिरिक्त वजन कमी होण्यास मदत मिळते. शिवाय तुमचा बांधा सुडौल होतो. त्यामुळे आठवड्यातून अगदी तीनवेळा तरी तुम्ही पोहायला जा. तुम्हाला शरीरात झालेला फरक नक्की जाणवेल.
अनेकांना जीममध्ये गेल्यानंतर वेगवेगळ्या दिवशी सांगितलेले वेगवेगळे व्यायाम करायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही पोहणे हे कधीही उत्तम आहे. पोहण्यासाठी हात, पाय, पोट, मांड्या या सगळ्याचा अगदी योग्य व्यायाम होतो. तुमचे संपूर्ण शरीर स्विमिंग करताना तुमच्या संपूर्ण शरीरावर ताण येतो. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण शरीराचा व्यायाम करण्यासाठी पोहणे हा उत्तम व्यायाम आहे. तुम्ही जीमला न जाता जर रोज पोहत असाल तरी तुम्हाला वेगळा व्यायाम करण्याची काहीही गरज नाही.
अनेकांचे शरीर थुलथुलीत असते. जर तुम्हाला तुमचे शरीर टोन्ड करायचे असेल तर तुमच्यासाठी स्विमिंग हा एक उत्तम व्यायाम आहे. पोहताना तुमचे शरीर चांगले स्ट्रेज होत असते. तुमची त्वचा स्ट्रेच झाल्यामुळे तुमच्या शरीरातील सेल्युलाईट कमी करण्यास स्विमिंग मदत करते. तुम्ही बॉडी टोनिंगचा विचार करत असाल तर इतर कोणतेही व्यायाम करण्यापेक्षा तुम्ही तासभर पोहा. तुम्हाला अगदी 15 दिवसात त्याचे फायदे जाणवतील. पोहताना तुम्ही वेगवेगळे स्ट्रोक करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा अजून लवकर मिळेल.
अस्थमा असणाऱ्यांसाठी पोहणे वरदान आहे. श्वसानाशी निगडीत असलेला हा आजार श्वसानासाठी लागणारे नवे टिश्यू तयार करण्यास पोहणे मदत करते. पोहण्यामुळे अस्थमा असणाऱ्यांना त्याचा त्रास कमी होतो. अस्थमाची सतत असेलेली भीती कमी करण्यास पोहणे मदत करते. त्यामुळे अस्थमा असणाऱ्यांनी अगदी हमखास पोहायला हवे. त्यांनी आठवड्यातून किमान तीन वेळा जरी तासभर पोहण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्या प्रकृतीमध्ये त्यांना फरक झालेला जाणवेल.तुम्ही सातत्य दाखवले तर तुम्हाला अस्थमाचा त्रास कालांतराने कमी झालेला जाणवेल
तुमचा मूड चांगला करण्यासाठीही पोहणे फायदेशीर आहे. ज्यावेळी आपण पोहतो. त्यावेळी आपला रक्तपुरवठा सुधारतो. मेंदूशी हा रक्तपुरवठा पोहोचल्यामुळे तुमचा मूड चांगला करण्यासही मदत मिळते. शिवाय तुमची बुद्धी तल्लख करण्यासाठीही पोहणे अत्यंत फायदेशीर आहे. तुमच्या मेंदूला ताजेतवाने करण्याचे काम स्विमिंग करते. उदास झाल्यासारखे किंवा मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठीही तुम्ही पोहू शकता. (पाण्यामध्ये पिरेड्स आले असतील तरी ब्लिडिंग होत नाही हे तुम्हाला माहीत आहे का?)
तुमचे शरीर सुदृढ असेल तर तुम्हाला कोणतेही आजार होऊ शकत नाही. तुमची प्रतिकारशक्ती चांगली हवी असेल तर तुमच्यासाठी पोहणे फारच महत्वाचे आहे. कारण पोहल्यामुळे तुमच्या अनेक व्याधी बऱ्या होतात. तुमचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते. अनेक अभ्यासांती पोहणे हे तुमच्या शरीर स्वास्थ्यासाठी चांगले असते हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे जर तुम्हाला प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही दररोज पोहायला हवे.
सध्याचं सगळ्यांचच आयुष्य फारच धकाधकीचं आहे. मानसिक तणाव हा अनेकांच्या पाचवीला पुजलेलाच असतो. कितीही रिलॅक्स व्हायचे म्हटले तरी मन:शांती मिळत नसेल तर तुम्ही मस्त पोहा. पाण्यात डुंबल्यानंतर तुमचे शरीर थंडावते. कोणत्याही प्रकारचा आलेला क्षीण कमी होऊन जातो. पोहताना आपले अधिक लक्ष पाण्याकडे असते. आपला विचारांचा गुंता कमी झालेला असतो. त्यामुळे आपल्याला आराम मिळतो. मन:शांती मिळते.
तुम्ही एक दिवस पाण्यात डुंबता त्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला गाढ झोप लागते. मुळात पोहण्यामुळे तुमच्या सबंध शरीराचा चांगला व्यायाम होतो. शरीर थकले की, आपसुकच तुम्हाला छान झोप लागते. जर तुम्ही रोज पोहत असाल किंवा तुमच्या मुलांना पोहण्याच्या क्लासेसला पाठवत असाल तर त्याच्यामध्ये झालेला हा पहिला फरक तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुम्हालाही झोप पटकन येत नसेल किंवा निद्रानाशाचा त्रास असेल तर तुम्ही अगदी हमखास पोहायला हवे. त्यामुळे नक्कीच तुमची झोप सुधारेल.
मेंदूच्या विकासासंदर्भातील हा आजार असून या आजारामध्ये एखाद्या व्यक्तिच्या मेंदूची वाढ ही मंदावलेली असते. अशी मुलं ही त्यांच्या वयापेक्षा कमी वयाच्या मुलांप्रमाणे वागतात. प्रत्येकाला वेगवेगळे त्रास यामध्ये होऊ शकतात. काहींना बोलण्यास अडथळा निर्माण होतो. काहींना कमी ऐकायला येते. अशा व्यक्तिंसाठी पोहणे अत्यंत फायद्याचे आहे. पोहण्यामुळे त्यांच्या मेंदूचा रक्तपुरवठा सुधारायला मदत होते. मुलं अधिक अॅक्टिव्ह बनतात.
पोहल्यानंतर काही काळ अंगदुखी होते, हे अगदी स्वाभाविक असले तरी तुमच्या अनेक दुखापतींपासून तुम्हाला सुटका मिळते. पोहताना आपल्या संपूर्ण शरीराचे स्ट्रेचिंग होते. त्यामुळे जर तुम्हाला काही दुखापत असेल तर ती बरी होते. पाठिचा कणा, पाय, ढोपरं या सगळ्यांना पोहण्यामुळे आराम मिळतो. त्यामुळे अंगदुखी असणाऱ्यांनी अगदी हलके हलके पोहायला काहीच हरकत नाही.
1. पोहण्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते का?
हो, मानसिक स्वास्थ सुधारण्यासाठी पोहण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. पाणी कितीही नाही म्हटले तरी अनेकांना आवडते. पाण्यात गेल्यानंतर आपल्या सगळ्या समस्या अनेकांना विसरायला होते. पाण्यात साधे डुंबून जरी राहिलात तरी शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होते. जर तुम्हाला मानसिक ताण असेल तर तुम्ही किमान 15 मिनिटं तरी शांतपणे पाण्यात डुंबून राहा.
2. पोहण्यामुळे वजन कसे कमी होते ?
पोहताना आपण पाण्यावर तरंगण्यासाठी शरीराच्या प्रत्येक अवयवाचा वापर करत असतो. तुमच्या शरीराला आवश्यक असलेला व्यायाम पोहण्यामुळे मिळतो. पोहण्यामुळे तुमच्या कॅलरीज बर्न व्हायला मदत होते. तुम्हाला भूक चांगली लागते. तुमचे पचन सुधारते. त्यामुळे तुमचे वजन कमी व्हायला मदत होते.
3. किती तास पोहल्याने त्याचे फायदे दिसतात?
तुम्ही नुकतीच पोहायला सुरुवात केली असेल किंवा पोहण्याचे क्लासेस लावले असतील. तर पहिल्या काही दिवसांमध्ये तुम्ही तासभरच याचा सराव करा. यामध्येही थांबत थांबत तुम्हाला जितके जमेल तितके पोहायचे आहे. एकदा का तुम्ही पोहण्यात निपुण झालात की, तुम्ही सलग 30 मिनिटेही पोहू शकता. आता तुमची किती वेळासाठी सहज पोहू शकता हे तपासून त्याहून थोडे अधिक करण्याचा प्रयत्न करा. तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.