लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवण्याचे फायदे

लहान मुलांना चांदीच्या भांड्यातून जेवण भरवण्याचे फायदे

प्राचीन काळी मातीची भांडी, चांदीची भांडी, केळ्याच्या पानांमधून अन्न दिलं जायचं. श्रीमंतांच्या घरी आजही चांदीच्या ताटवाटीतच अन्न वाढलं जातं. पण गरीब असो वा श्रीमंत लहान मुलांसाठी प्रत्येकाच्या घरात छोटसं का होईना चांदीचं पात्र असतंच. कारण जसं चांदीच्या दागिन्यांमुळेसौंदर्य खुलून दिसते त्याचप्रमाणे चांदीच्या ताटवाटीत जेवल्यामुळे आरोग्यही उत्तम राहतं. चांदीमुळे लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाला चालना मिळते. मुलांची रोग प्रतिकारशक्ती वाढते. लहान मुलांना अपचनामुळे होणाऱ्या पोटांच्या समस्या कमी होतात. म्हणूनच तुमच्या लहान मुलांना चांदीच्या भांड्यातूनच भरवा. अगदी तान्हा बाळालाही चांदीच्या वाटीतून दूध अथवा औषध देण्यास काहीच हरकत नाही. चांदीमध्ये असलेले गुणधर्म चांदीच्या भांड्यातून अन्नात उतरतात आणि तुमच्या मुलांच्या शरीरात जातात. यासाठीच जाणून घ्या चांदीच्या भांड्यात अन्न दिल्याने मुलांवर काय चांगले परिणाम होतात.

चांदीच्या भांड्यामुळे शरीराला थंडावा मिळतो

चांदी हा धातू थंड गुणधर्माचा आहे. चांदीच्या भांड्यातून अन्न खाण्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. जे लोक चांदीचे दागिने वापरतात त्यांना उष्णतेचा त्रास होत नाही. म्हणूनच मुलांचा स्वभाव शांत होण्यासाठी त्यांना चांदीच्या भांड्यातून अन्न दिलं जातं.

Instagram

चांदी अन्न निर्जंतूक करते

चांदीचे भांडे हे निर्जंतूक असते त्यामुळे त्यातून वाढलेले अन्नदेखील निर्जंतूक राहते. चांदीमध्ये अॅंटि बॅक्टेरिअरल गुणधर्म असतात. त्यामुळे चांदीच्या भांड्यावर जंतू जिवंत राहू शकत नाहीत. यासाठीच चांदी हा एक शुद्ध धातू समजला जातो. देवासा नैवेद्य आणि लहान मुलांना अन्न चांदीच्या भांड्यात वाढण्यामागचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.

चांदीमुळे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढते

चांदीच्या भांड्यातून अन्न जेवल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. लहान मुलांचीच प्रतिकार शक्ती कमी असते. त्यांना अन्नातून ही प्रतिकार शक्ती मिळावी यासाठी त्यांना चांदीच्या भांड्यातून अन्न जेवण द्यावे. 

Instagram

चांदीच्या भांड्यात जेवल्यामुळे मुलांना सर्दी- खोकला होत नाही

चांदीच्या ग्लासातून पाणी, औषध अथवा दूध देण्यामुळे मुलांना सर्दी खोकला होत नाही. लहानमुलांप्रमाणेच ज्यांना पित्त दोष आहे अशा लोकांनीही चांदीच्या ग्लासातून पाणी प्यावे. चांदी आजारपण आणि इनफेक्शनपासून तुम्हाला आणि तुमच्या मुलांना दूर ठेवू शकते.

चांदीच्या भांड्यात अन्न दिवसभर ताजे आणि स्वच्छ राहते

चांदी हे नॉन टॉक्सिक असल्यामुळे चांदीच्या भांड्यातील पाणी अथवा अन्न ताजे राहते. पुर्वीच्या काळी वॉटर फिल्टर अथवा फ्रीज नसत त्यामुळे तेव्हा चांदीची भांडी अन्न आणि पाण्यासाठी वापरली जाते.

चांदीमुळे मुलांची दृषी सुदृढ आणि तेजस्वी होते

लहान मुलांच्या दृष्टीचा विकास होण्यासाठी त्यांना चांदीच्या भांड्यातून अन्न पाणी देण्याचा फायदाच होऊ शकतो. डोळ्यांचे संक्रमण रोखण्यासाठी चांदी फायदेशीर ठरते. यासाठीच डोळ्यांचे इनफेक्शन झाल्यास चांदीचे भांडे डोळ्यावरून फिरवले जाते.

Instagram

चांदीच्या भांड्यातून अन्न खाण्यामुळे मुलांची स्मरणशक्ती वाढते

लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवी आणि ती बुद्धीमान व्हावीत यासाठी मुलांना चांदीच्या भांड्यातून अन्न द्यावे. चांदी थंड गुणधर्माची असल्यामुळे मुलांचा मेंदू शांत  आणि तल्लख होऊ शकतो. 

तुम्हालाही तुमच्या मुलांचे आरोग्य उत्तम राहावे आणि ती बुद्धीमान व्हावी असं वाटत असेल तर नियमित मुलांना चांदीच्या भांड्यातूनच अन्न द्या. लहान मुलांप्रमाणेच शक्य असल्यास मोठ्यांनीही चांदीच्या भांड्यातून पाणी पिण्यामुळे आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. 

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

अधिक वाचा -

कुटुंबासोबत घरीच बसून खेळता येणारे सोपे खेळ (Indoor Games To Play With Your Family)

#CoronaOutbreak : मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी आयडियाज (Activities For Kids At Home)

तुमच्या बाळासाठी नाव निवडताना लक्षात ठेवा या गोष्टी