ADVERTISEMENT
home / Mental Health
स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ खाद्यपदार्थांचा आहारात करा समावेश

तुम्ही तुमच्या वस्तू कुठे ठेवल्या आहेत किंवा एखाद्याला द्यायचा मेसेज नेहमी विसरता का ? असं असेल तर तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी वेळीच उपाय करायला हवेत. पस्तीशी अथवा चाळीशीनंतर अनेकांना सतत काहीतरी विसरण्याचा  त्रास जाणवू लागतो. खरंतर मेंदूचे कार्य सुरळीत होण्यासाठी शरीर आणि मन निवांत असणं गरजेचं आहे. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि परफेक्ट जीवनशैली तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास फायदेशीर ठरू शकते. मात्र सध्याची जीवनशैली याच्या अगदी उलट झाली आहे. असं असलं तरी आहाराचा तुमच्या शरीर आणि मनावर सारखाच परिणाम होत असतो. यासाठीच आम्ही तुमच्यासोबत असे पदार्थ शेअर करत आहोत. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती वाढण्यास नक्कीच मदत होईल.

मासे –

मासे खाणं हा स्मरणशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम उपाय आहे. कारण अनेक माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असते. तुमचा मेंदूला जवळजवळ 60 टक्के फॅटची आवशक्ता असते आणि त्यापैकी अर्धे फॅट्स हे ओमॅगा 3 फॅटी अॅसिड या प्रकारचे असतात. या फॅट्समुळे तुमच्या मेंदूचा आणि त्यातील विविध पेशींचा विकास होतो, शिवाय हे फॅट्स तुमची स्मरणमशक्ती वाढवण्यासाठी आणि एखादी नवी गोष्ट शिकण्यासाठी मदत करतात. अल्झायमर अथवा नैराश्यासारख्या आजारात तुम्हाला या फॅटी अॅसिडची नक्कीच मदत होऊ शकते. यासाठी मासे खा आणि स्मरणशक्ती वाढवा.

Shutterstock

ADVERTISEMENT

बदाम आणि अक्रोड –

सुकामेव्याबाबत करण्यात आलेल्या अनेक संशोधनानुसार यात विविध प्रकारची पोषक तत्व आढळतात. सुकामेव्यातही आरोग्यासाठी उपयुक्त फॅट्स, अॅंटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन ई असते. ज्यामुळे तुमच्या मेंदूचे चांगले पोषण होते. सुक्यामेव्यातील बदाम, अक्रोड मेंदूसाठी खूपच उपयुक्त ठरतात.  स्मरणशक्ती वाढवण्यासाठी लहानपणापासून मुलांना बदाम, अक्रोड खाण्याची सवय लावली जाते. मोठ्यांसाठीही विसरण्याचा त्रास दूर करण्यासाठी हा सुकामेवा आहारात असणं फायदेशीर ठरू शकतं.

Shutterstock

भोपळ्याच्या बिया –

भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक, लोह आणि कॉपर असतं. याचा तुमच्या मेंदूवर चांगला परिणाम होतो. झिंकमुळे अल्झायमर, नैराश्यासारख्या आजारांना दूर ठेवता  येते. लोह तुमच्या मेंदूच्या पेशींचा विकास आणि मेंदूचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी मदत करतो. कॉपर तुमच्या मेंदूचे संदेश वाहनाचे कार्य करण्यास उपयुक्त ठरतो. ज्यामुळे तुम्हाला एखादी गोष्ट समजून घेणे, ती लक्षात ठेवणे सोपे जाते. विचार क्षमता आणि निर्णय क्षमता वाढवण्यासाठी भोपळ्याच्या बिया तुमच्या आहारात असायलाच हव्या. तीळ, अळशी अशा अनेक बिया तुम्ही यासाठी आहारात समाविष्ठ करू शकता. 

ADVERTISEMENT

Shutterstock

व्हिटॅमिन सी युक्त फळे –

निरोगी राहण्यासाठी आहारात सर्व प्रकारची फळे असायला हवी. मात्र संत्री, किव्ही, स्टॉबेरी ही अशी फळे आहेत जी तुमच्या शरीर आणि मनाच्या विकासासाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण यातील व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या मेंदूला चालना मिळते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते त्यामुळे आजारपण दूर  राहते. शिवाय वयानुसार होणारी मेंदूंची झीज भरून काढली जाते आणि तुम्हाला फ्रेश वाटू लागते. याचा चांगला परिणाम तुमच्या स्मरणशक्तीवर होतो. 

ADVERTISEMENT

Shutterstock

ऑलिव्ह ऑईल-

आहारात ऑलिव्ह ऑईलचा वापर करूनही तुम्ही तुमची स्मरणशक्ती वाढवू शकता. शिवाय हा एक निरोगी राहण्याचा एक चांगला मार्ग आहे. कारण या तेलामध्ये अॅंटि ऑक्सिडंट, अॅंटि इनफ्लेमटरी घटक असतात. ज्याचा तुमच्या ह्रदय आणि मेंदूवर चागला परिणाम होतो. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी स्वयंपाकात असे हेल्दी कुकिंग ऑईल असणं नक्कीच फायद्याचं आहे. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक

अधिक वाचा –

ADVERTISEMENT

एकाच महिन्यात दोनदा मासिक पाळी येण्याची कारणे

जाणून घ्या ‘वॉकिंग मेडिटेशन’ कसं करावं आणि त्याचे फायदे

अॅपल सायडर व्हिनेगरचे उपयोग वाचून व्हाल थक्क (Apple Cider Vinegar Benefits In Marathi)

25 Aug 2020

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT