Best Waterproof Eyeliner In Marathi - तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य वाढवणारे 10 उत्कृष्ट वॉटरप्रूफ आयलायनर | POPxo

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनर, जे वाढवतील तुमच्या डोळ्यांचे सौंदर्य (Waterproof Eyeliner)

एका परफेक्ट डेटसाठी तयार होताना आपण नेहमीच सर्वात सुंदर कसं दिसू याचा विचार करतो. डेट असो वा कोणताही कार्यक्रम आपल्यासाठी आपले डोळे आणि मेकअप हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. सुंदर ड्रेस वा साडी, गुलाबी गाल, लाल लिपस्टिक, डोळ्यांसाठी स्मोकी मेकअप आणि विंग आयलायनर हा परफेक्ट लुक कोणाला नको असतो? पण हा मेकअप करून जेव्हा पावसात जायची वेळ येते आणि सर्वात जास्त ताण येतो तो म्हणजे डोळ्यांवरील आयलायनर निघून जाण्याचा. बाकी सर्व मेकअप तर आपण सेट करू शकतो. पण सर्वात जास्त दुःख होतं ते काढलेले विंग लायनर विस्कटल्याचं. केवळ पाऊसच नाही तर घाम आला, चुकून हात लागल्यास, डोळ्यातून पाणी आल्यास आयलायनर विस्कटते. मग अशावेळी आपल्याला उपयोगी पडतं ते वॉटरप्रूफ आयलायनर. ‘POPxo मराठी’ मधील या लेखातून आम्ही तुम्हाला अशाच काही उत्कृष्ट 10 वॉटरप्रूफ आयलायनरबद्दल सांगणार आहोत. तुम्हीही या आयलायनरचा वापर करून आपल्या सौंदर्यात भर घालू शकता. बिनधास्त कार्यक्रमांना हजेरी लावा आणि चेहरा खराब होण्याची भीती बाळगू नका. 

Table of Contents

    मेबिलिन हायपर ग्लॉसी लिक्विड लायनर (Maybelline Liquid Liner)

    Make Up

    Maybelline Hyper Glossy Liquid Liner

    INR 202 AT Maybelline

    अतिशय गडद अशा काळ्या रंगाचे हे मेबिलिन ग्लॉसी लिक्विड लायनर उत्कृष्ट वॉटरप्रूफ आयलायनर ही आमची पहिली आवड आहे. 

    फायदे

    • याचा ब्रश अतिशय पातळ असून तुम्ही अतिशय सहजतेने आपल्या आवश्यकतेनुसार डोळ्यांवर लायनर काढू शकता.  
    • तुम्हाला हवं तसं पातळ अथवा जाड लायनर तुम्ही डोळ्यांवर लाऊ शकता. तसंच डोळ्यांवर हे अगदी सहजपणाने स्लाईड होतं आणि तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग मिळते.
    • तसंच डोळ्यांना मेट नाही तर ग्लॉसी लुक यामुळे मिळतो. साधारण 24 तास हे आयलायनर तुमच्या डोळ्यांवर राहू शकते. 
    • तसंच हे वॉटरप्रूफ असल्याने तुम्हाला डोळे खराब होण्याचाही त्रास होत नाही. तसंच हे लायनर पटकन सुकतं 

    तोटे

    • वॉटरप्रूफ असूनही रिमूव्हरने पटकन निघतं
    • तुम्हाला नेहमी आयलायनर वापरायची सवय असेल तर हे पटकन संपतं 

    रिमेमेल लंडन एक्साररेट वॉटरप्रूफ आय डिफाईनर - डीप ओशियन (Rimmel London Waterproof Eye Definer)

    Make Up

    Rimmel London Exaggerate Waterproof Eye Definer - Deep Ocean

    INR 2,405 AT Rimmel

    रिममेल एक्जाररेट आय डिफाईनर एक पेन्सिल लायनर आहे ज्याचा उपयोग तुम्ही अतिशय सहजपणाने करू शकता. गडद रंग देण्यासह यामुळे तुम्हाला मेटालिक लुकही मिळतो. तसंच या कंपनीचा दावा आहे की, वॉटरप्रूफ असण्यासह हे आयलायनर डोळ्यांवर 10 तास टिकून राहाते. 

    फायदे 

    • सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे यासह पेन्सिलला टोक काढण्यासाठी एक शार्पनरदेखील मोफत मिळते. याचं टेक्स्चर क्रिमी आणि अतिशय स्मूथ आहे. कोणत्याही वातावरणात तुम्हाला या आयलायनरचा उपयोग करून घेता येऊ शकतो. 
    • दुसऱ्या बाजूला तुम्हाला स्मोकी लुक मिळण्यासाठी स्मजरदेखील आहे. तसंच हे लायनर तुम्हाला वेगवेगळ्या शेड्समध्ये मिळते. 
    • त्यामुळे तुम्हाला तुमच्या लुकमध्येही विभिन्नता आणता येते. हे तुम्हाला चमकदार अर्थात शाईनी आणि जेल फिनिश लुक मिळवून देते. कोणत्याही पार्टीसाठी हे वॉटरप्रूफ आयलायनर उत्तम आहे

    तोटे 

    • स्मोकी आय लुक देण्यासाठी देण्यात आलेल्या स्मजरने तितकासा परिणाम दिसून येत नाही 

    लॅक्मे अॅब्सोल्युट शाईन (Lakme Absolute Shine)

    Make Up

    Lakme Absolute Shine Liquid Eye Liner

    INR 296 AT Lakme

    मेकअपबद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा लॅक्मेचं नाव येणार नाही असं शक्यच नाही. लॅक्मेचं अॅब्सोल्युट शाईन लिक्विड आयलायनर हेदेखील उत्कृष्ट वॉटरप्रूफ लायनरच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासारखंच लायनर आहे. 

    फायदे 

    • याचा एक स्ट्रोक डोळ्यांना गडद काळा रंग देण्यासाठी फायदेशीर ठरतो. 
    • डोळ्यांवर हे बरेच तास टिकते. तसंच यामध्येही विविध रंग आहेत ज्यामुळे तुम्ही तुमच्या डोळ्यांना बोल्ड लुक देऊ शकता. 
    • हे खरंच स्मजफ्री असून सांगितल्याप्रमाणे वॉटरप्रूफही आहे.
    • पाणी लागल्यास, हे पसरत नाही. आयशेड्ससह हे उत्तम पर्याय आहे. 
    • तुम्ही याचा उपयोग तुमच्या आयलीड्ससाठीही करू शकता आणि तुमच्या डोळ्याना कोणताही त्रास यामुळे होत नाही. 

    तोटे 

    • जास्त तास राहतं असं जरी म्हटलं असलं तरीही साधारण पाच तासांपर्यंतच हे आयलायनर टिकतं

    एडीएस लाँग लास्टिंग वॉटरप्रूफ आयलायनर (ADS Long Lasting / Waterproof Black Color Eyeliner Gel)

    Make Up

    ADS Jet Black 2 In 1 Long Lasting / Waterproof Black Color Eyeliner Gel And Eye Powder

    INR 149 AT ADS

    एडीएसद्वारे बनविण्यात आलेले हे वॉटरप्रूफ आयलायनर उत्तम आहे. याचा तुम्ही दोन तऱ्हेने उपयोग करून घेऊ शकता. हे एक जेल आयलायनर आहे तसंच यामध्ये पावडरही आहे ज्याचा तुम्ही आयशॅडो म्हणूनदेखील उपयोग करून घेऊ शकता. याचा अर्थ हे एक असं उत्पादन आहे जे तुम्हाला पूर्ण स्मोकी लुक देऊ शकतं. 

    फायदे 

    • यासह आयलायनर डोळ्यांवर लावण्यासाठी एक ब्रशही येतो. जो तुम्हाला आयलायनरचा उत्तम स्ट्रोक काढण्यासाठी मदत करतो. 
    • तसंच हे डोळ्यांवर खूप वेळ टिकून राहातं आणि स्मजफ्री आहे. मुळात या आयलायनरने तुमचे डोळे अधिक सुंदर दिसतात. 
    • तुम्हाला जर डोळ्यांवर जाड आयलायनर लावायची आवड असेल तर तुम्ही नक्की याचा वापर करून आनंदी व्हाल. 
      तसंच तुम्हाला स्मोकी लुकसाठी हे उत्तम पर्याय आहे. 

    तोटे

    • तुम्हाला जर ब्रशने आयलायनर नीट लावता येत नसेल तर हे आयलायनर तुमच्यासाठी नाही 
    • स्मोकी लुक देण्यासाठी तुम्हाला याचा उत्तम वापर करता यायला हवा 

     

    यानकिना प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ लॅश आयलायनर (Yankina Precision Liquid Waterproof Lash Eyeliner)

    Make Up

    Spanking Precision Liquid Waterproof Lash Eyeliner Pencil (Black)

    INR 109 AT Yankina

    उत्कृष्ट वॉटरप्रूफ लायनरच्या यादीमध्ये पुढचं नाव आहे ते म्हणजे यानकिना प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ लॅश आयलायनरचं. 

    फायदे 

    • पेनच्या आकारात असणारे हे आयलायनर डोळ्यांवर साधारण 36 तास टिकण्याचा दावा कंपनी करते. हे पेन अतिशय शार्प असून डोळ्यांवर लायनर लावणं सोपं जातं. 
    • अजिबात न पसरता लायनर लावता येतं. तसंच हे स्मजप्रूफ असल्याने बऱ्याच जणांना याचा वापर करणं अधिक सोपं जातं. 
    • बराच वेळ टिकत असून लवकर पसरत नाही. तसंच पाण्यामुळे अथवा घामाने अजिबातच हे पसरत नाही. 
    • त्यामुळे तुम्ही ऑफिस अथवा अन्य कार्यक्रमाच्या ठिकाणी याचा उपयोग करणं उत्तम आहे. 

    तोटे

    • पेन्सिलची टोक जास्त शार्प असल्याने डोळ्यांना इजा होण्याची भीती आहे त्यामुळे लायनर लावताना धसमुसळेपणा करून चालत नाही. 
    • अतिशय सावधानता राखून लायनर लावावे लागते. घाईत कधीही वापरू नका 

    मेबिलिन न्यूयॉर्क कोलोसल बोल्ड आयलायनर (Maybelline New York Colossal Bold Eyeliner)

    Make Up

    Maybelline New York Colossal Bold Eyeliner

    INR 174 AT Maybelline

    मेबिलिन कंपनीचे काजळ आणि आयलायनर सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. जास्त वेळ टिकण्यासाठी हा ब्रँड प्रसिद्ध आहे. तसंच हे आयलायनर अतिशय गडद असून तुमच्या डोळ्यांचं सौंदर्य अधिक वाढवतं. वॉटरप्रूफ उत्पादन म्हणून याची ओळख असून हे सर्वात विश्वासाचं उत्पादन समजण्यात येतं. 

    फायदे 

    • डोळ्यांवर हे आयलायनर साधारण 24 तास टिकतं. तसंच हे डोळ्यांना सुंदर काळा रंग देऊन अधिक बोल्ड ब्लॅक लुकसाठी हा उत्तम पर्याय आहे. 
    • याचा उपयोग तुम्ही रोजच्या वापरासाठी करू शकता. तसंच तुम्हाला घाम येत असेल डोळ्यांवर तर त्यासाठीदेखील हे लायनर उत्तम आहे. कारण हे पसरत नाही. 
    • तुम्हाला विंग आयलायनर लावायची आवड असेल तर या लायनरचा खूप चांगला उपयोग होतो. 

    तोटे 

    • बाटली अतिशय लहान असून पटकन संपते

    तुम्हाला माहीत आहे का, सौंदर्यप्रसाधनांचा वापर किती वर्ष करू शकता

    कलरबार वॉटरप्रूफ लिक्विड आयलायनर (Colorbar Waterproof Liquid Eyeliner In Marathi)

    Make Up

    Colorbar Waterproof Liquid Eyeliner

    INR 317 AT Colorbar

    रोजच्या मेकअपसाठी तुम्ही कलरबारच्या या वॉटरप्रूफ लिक्विड आयलायनरचा नक्की उपयोग करून घेऊ शकता. याच्या पातळ ब्रशमुळे तुम्हाला आयलायनर लावणं अतिशय सोपं होतं आणि तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही पातळ अथवा जाड असे आयलायनर डोळ्यांना लावू शकता. 

    फायदे 

    • हे लायनर जास्त वेळ डोळ्यांवर टिकून राहातं असा दावा कंपनी करते आणि डोळ्यांच्या मधूनच हे लायनर निघूनही जात नाही असं याचं वैशिष्ट्य आहे असंही सांगितलं जातं जे खरं आहे. 
    • सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांची त्वचा संवेदनशील आहे आणि ज्या व्यक्ती डोळ्यांना लेन्स लावतात त्यांच्यासाठी हे आयलायनर उत्तम आहे. 
    • संवेदनशील त्वचा असणाऱ्यांसाठी हे आयलायनर खास बनविण्यात आले आहे. 
    • डोळ्यांवर याचा एकच स्ट्रोक तुम्ही लावलात तरीही तुम्हाला त्याचा योग्य इफेक्ट मिळतो. 

    तोटे 

    • लेन्स लावणाऱ्यांसाठीही उपयुक्त असलं तरीही त्याची व्यवस्थित काळजी घेऊनच वापर करावा 

    आयलायनरच्या 20 वेगळ्या स्टाईल्स, बदलेल तुमचा लुक Eyeliner Styles in Marathi

    लॉरिअल पॅरिस टेलिस्कॉपिक प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ आयलायनर (L'Oreal Paris Liquid Waterproof Eyeliner In Marathi)

    Make Up

    L'Oreal Paris Telescopic Precision Liquid Waterproof Eyeliner

    INR 3,078 AT L'Oreal Paris

    तुम्हाला जर लायनरमध्ये पेन्सिल अथवा जेलचा वापर करणं आवडत नसेल तर तुम्हाला लॉरिअल पॅरिस टेलिस्कोपिक प्रिसिजन लिक्विड वॉटरप्रूफ आयलायनरचा चांगला उपयोग करून घेता येईल. 

    फायदे 

    • डोळ्यांवर हे अगदी बटरप्रमाणे लावता येतं आणि जास्त वेळ टिकून राहतं. तसंच महत्त्वाचं म्हणजे या लायनरमुळे कोणालाही अलर्जी होत नाही असा दावा कंपनीने केला आहे. 
    • ज्यांची त्वचा संवेदनशील आहे आणि ज्या व्यक्ती डोळ्यांना लेन्स लावतात त्यांच्यासाठी हे आयलायनर उत्तम आहे असंही सांगण्यात आलं आहे. 
    • बऱ्याचदा लेन्स लावणाऱ्यांना लायनर लावलं तर खुपत असल्यासारखं वाटतं. मात्र या लायनरमुळे तसा फील येत नाही आणि तुम्ही कम्फर्टेबली कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. 

    तोटे

    • याची किंमत खूपच जास्त आहे
    • किमतीच्या मनाने बाटली लहान असून कमी काळ टिकतं 

    स्विस ब्युटी प्रो सुपर ब्लॅक आयलायनर (Swiss Beauty Pro Super Black Eyeliner)

    Make Up

    Swiss Beauty Pro Super Black 18 Hours Stay Eyeliner Pen, No Smudge Waterproof Non-transfer

    INR 208 AT Swiss Beauty Pro

    स्विस ब्युटी प्रो सुपर ब्लॅक आयलायनर हे स्मजप्रूफ असून जास्त वेळ टिकणाऱ्या आयलायनरपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे आयलायनर डोळ्यांना गडद काळा रंग देतं. पेनाच्या आकारात हे असल्यामुळे डोळ्यांना लावणं सोपं जातं.  

    फायदे 

    • तुम्हाला विंग आयलायनर लावण्याची आवड असेल तर तुम्हाला याचा उत्तम उपयोग होऊ शकतो.
    • तुम्हाला कोणत्याही आकारातील लायनर लावायचं असल्यास, हा उत्तम पर्याय आहे. 
    • तसंच हे पटकन सुकतं आणि तुम्हाला जास्त वेळ डोळे बंद करून वाट पाहावी लागत नाही. 
    • लवकर सुकत असल्यामुळे हे पटकन विस्कटत नाही आणि घाम आल्यानंतरही हे पसरत नाही. 

    तोटे 

    • पेन्सिल शेपमध्ये असल्याने कधी संपतं ते पटकन कळत नाही 

    डोळ्यांचे सौंदर्य खुलवणारे आयलायनर शोधत असाल (Best Eyeliners In India In Marathi)

    शुगर टोल्ड यू सो! (SUGAR Smudgeproof Eyeliner)

    Make Up

    SUGAR Cosmetics Eye Told You So! Smudgeproof Eyeliner - 01 Black Swan

    INR 699 AT SUGAR

    शुगर हा कॉस्मेटिक्समधील अगदी विश्वसनीय ब्रँड म्हणून ओळखला जातो. शुगर टोल्ड यू सो हे एक सिल्क मेट फिनिश असून डोळ्यांवर जास्त वेळ टिकून राहणारं आयलायनर आहे. 

    फायदे

    • हे पटकन स्मज होत नाही आणि लावल्यानंतर अगदी सेकंदामध्ये सुकून जातं.  
    • त्यामुळे पसरण्याची भीती राहात नाही. याचा ब्रश पातळ असल्याने कोणत्याही प्रकारचा आकार देणं अतिशय सोपं आहे. 
    • तसंच संवेदनशील त्वचेसाठीही हे उत्तम असून 100 टक्के विगन आणि अॅनिमल फ्री असण्याचा कंपनीचा दावा आहे.
    • त्यामुळे ज्यांना उत्तम आयलायनर हवं असेल त्यांनी या वॉटरप्रूफ आयलायनरचा नक्की वापर करावा. 

    तोटे 

    • किमतीच्या हिशेबाने बाटलीचा आकार लहान आहे
    • पटकन उपलब्ध होत नाही 

    घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
    आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा